येल्लोरे कुटुंबीयांना ३0 लाखांचा धनादेश सुपूर्द

0
5

गडचिरोली,दि.15ः-आरमोरी येथे गडचिरोली मार्गावर नाकाबंदी करीत असताना एका वाहनाने दिलेल्या धडकेत ठार झालेले पोलिस शिवाई केवळराम येल्लोरे यांच्या कुटुंबियांना पोलिस प्रशासनाच्यावतीने काल १३ ऑगस्ट रोजी ३0 लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
उपविभाग गडचिरोली अंतर्गत येणार्‍या आरमोरी पोलिस ठाणे हद्दीत १७ मार्च २0१९ रोजी आरमोरीचे जवान नाकाबंदी करीत असताना एका भरधाव वाहनाने पोलिस शिपाई केवळराम येल्लोरे यांना जोराची धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. केवळराम येल्लोरे यांचे वेतन खाते गडचिरोली येथील ऑक्सीस बॅंकेत असल्याने त्यांना ३0 लाख रूपये तत्काळ मिळावेत यासाठीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक बलकवडे यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली तयार करून ऑक्सीस बॅंकेकडे सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्ताव मान्य होऊन ऑक्सीस बॅंकेतर्फे ३0 लाख रूपयांचा धनादेश पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, ऑक्सीस बॅंकेचे नागपूर विभाग प्रमुख र्शृष्टी रंजन नंदा, नागपूर येथील प्रमुख शैलेश देशमुख यांच्या हस्ते केवळराम येल्लोरे यांच्या पत्नी प्रिती केवळराम येल्लोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक (प्रशासन) मोहीतकुमार गर्ग, ऑक्सीस बॅंकेचे शाखा व्यवस्थापक अभिजित डाबीर, उपव्यवस्थापक राकेश वल्लालवार, नितेश मढई, पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.