१४ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत

0
7

वाशिम, दि. १९ : जिल्ह्यात १४ सप्टेंबर २०१९ रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. न्यायालयात किरकोळ व तडजोड पात्र फौजदारी खटल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या प्रकरणात केवळ दंडाच्या रकमेवर तडजोड होवून प्रकरण निकाली निघू शकते. अशा खटल्यांमुळे पक्षकारांना वारंवार न्यायालयात यावे लागते. त्यामुळे वेळ व पैसा याचा अपव्यय होतो. परंतु, जर किरकोळ व तडजोड पात्र फौजदारी खटले जसे, मोटार वाहन कायदामधील प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून निकाली निघाल्यास आरोपींना मोठा दिलासा मिळू शकतो.

तरी अशा प्रकारची प्रकरणे लोक अदालतीत ठेवण्यासाठी संबंधित पक्षकारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे यांनी केले आहे. किरकोळ खटल्यांचा निपटारा झाल्यास न्यायालयावरील कामाचा ताण कमी होईल. याच संदर्भात सर्व पोलीस स्टेशन अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे श्री. देशपांडे यांनी कळविले आहे.