चंद्रपूर, नागपूरात भूकंपाचे धक्के

0
18

नागपूर-
दिल्लीसह महाराष्ट्रातील चंद्रपूर, नागपूर येथेही आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नेपाळमधील काठमांडूपासून ८३ किलोमीटर अंतरावर उत्तर-पूर्व परिसरातील लांजिग भागात या भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगण्यात येत आहे.मानेवाडा, रामबाग, द. नागपूर, चंद्रपूर येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पक्की घरे नसलेल्या भागात भूकंपाचा धक्का अधिक जाणवला. भूकंपाचा धक्का जाणवण्यास सुरवात झाल्यानंतर नागरिकांनी भयभीत होऊन रस्त्यावर पळ काढला. चंद्रपूर येथील जूनी इमारत एका बाजूने कलल्याचे वृत्त आहे.