विदर्भवाद्यांचा स्वतंत्र विदर्भाचा नारा

0
11

चंद्रपूर-दि. १ -राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा होत असताना विदर्भातील विविध जिल्ह्य़ांत स्वतंत्र विदर्भाची मागणी करीत विविध विदर्भवादी संघटनांनी ध्वजारोहण करून विदर्भ आंदोलनाचे रणशिंग फुकले. स्वतंत्र विदर्भाच्या आश्वासनाचा भाजपच्या नेत्यांना विसर पडल्याचा आरोप करत विदर्भवाद्यांनी शुक्रवारी महाराष्ट्र दिनी राज्य सरकार विरोधात मोर्चा काढला.
निवडणुकीवेळी स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिल्यामुळे विदर्भाच्या जनतेने भाजपच्या बाजून कौल देत विदर्भातून चाळीसहून अधिक जागांवर भाजपला यश मिळवता आले. मात्र, सत्तेत आल्यानंतर स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर राज्य सरकार आता दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विदर्भवाद्यांनी यावेळी केला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने चंद्रपुरात स्वतंत्र विदर्भाचे झेंडे घेऊन मोर्चा काढला आणि यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले.