साबांवि कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
15

चंद्रपूर : सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यात बांधकाम विभाग क्रांक एकचे कार्यकारी अधिकारी निरंजन तेलंग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (रोहयो) कार्यकारी अधिकारी वामन भावे यांचा समावेश आहे.

निरंजन तेलंग यांचे स्थानांतरण पुणे येथे याच पदावर झाले आहे. त्यांच्या रिक्त पदावर अद्याप कुणाचे नाव आले नसले तरी भंडारा जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंता धाबे चंद्रपूरला येण्याची शक्याता वर्तविली जात आहे. अद्याप कुणी अधिकारी न आल्याने निरंजन तेलंग यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक एकचे उप विभागीय अभियंता डी. के. लेहगावकर यांच्याकडे या पदाचा प्रभार सोपविला आहे. मागील तीन वर्षांपासून ते बांधकाम विभाग क्रमांक एक मध्ये कार्यरत होते. प्रामाणिक आणि संवेदनशिल अधिकारी अशी त्यांची खात्यामध्ये ओळख आहे.

बांधकाम विभागातील रोहयोचे कार्यकारी अभियंता वामन भावे यांचेही स्थानांतरण अचलपूर येथे झाले आहे. त्यांच्या रिक्त पदावर संगीता जयस्वाल या येत आहेत. भावे यांनी पदभार सोडला असून उपविभागिय अभियंता नेवारे यांच्याकडे तात्पुरता प्रभार सोपविला आहे. येत्या आठवडाभरात नवे अधिकारी रूजू होण्याची शक्यता सुत्रांकडून वर्तविली जात आहे