आयुध निर्माणीमध्ये उभारणार सौर उर्जा प्रकल्प – मनोहर पर्रिकर

0
8

भंडारा दि १९- : ज्या आयुध निर्माणीमध्ये जागा आहे, तिथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. जवाहरनगर आयुध निर्माणीमध्ये 70 ते 100 मेगावॉट वीज प्रकल्पाची उभारणी होऊ शकते, अशी माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली.जवाहरनगर आयुध निर्माणीला त्यांनी भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना श्री. पर्रिकर बोलत होते. यावेळी खासदार नानाभाऊ पटोले, आयुध निर्माणीचे महाव्यवस्थापक एस. के. सिंग, आमदार चरणभाऊ वाघमारे, बाळाभाऊ काशिवार,तारीक कुरेशी,मुकेश थानथराटे,छावा संग्रामचे निलम हलमारे आदी उपस्थित होते.श्री. पर्रिकर म्हणाले, भंडारा आयुध निर्माणीमध्ये 2014-15 मध्ये शस्त्रसाठा उत्पादनात 18 टक्के वाढ झाली असून निर्माणीच्या विकासासाठी तरतूद करण्यात आली आहे.
रेल्वे लाईनच्या प्रश्नासंदर्भात बोलताना ते म्हणाले, एकेकाळी आयुध निर्माणीमध्ये असलेली रेल्वे लाइन आता उपयोगाची राहिलेली नाही. ती रेल्वे लाईन हस्तांतरित करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाशी बोलणी सुरु आहे. रेल्वे विभागाने ती ताब्यात घेऊन त्याचा विकास करावा असेही सांगितले.रेल्वे लाईन ह्स्तातंरण सुरु प्रकिया सुरु असल्याचे सांगतानाच या मार्गावर प्रवासी रेल्वे सुरु करण्यासाठी सुध्दा प्रयत्न करण्यात येतील असे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकत्यार्ंना सांगितले.