शिक्षकांच्या आपसी बदल्या वगळता इतर बदल्यांना स्थगिती

0
13

गोंदिया,दि.19-ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्यावतीने 18 मे रोजी काढण्यात आलेल्या बदल्याविषयक पत्रानुसार राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांचे प्रश्न न्यायालयात गेल्याने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे निणर्य देण्यात आले आहेत.त्यातच मुख्याध्यापकांची पदनिमिती अद्यपही न झाल्याने तसेच आरटीई अंतगत 2014-15 चे समायोजन,संचमान्यता आदी प्रकिया पुुर्ण न झाल्याने काही शिक्षक संघटनानी आक्षेप नोंदविले आहे.त्यामुळे राज्यातील सर्व मुख्य कायर्कारी अधिकारी यांनी शिक्षकांच्या बदल्यांना थांबविण्याचे आदेश देण्यात येत असून फक्त आपसी बदली व्यतिरिक्त कुठलीही प्रशासकीय,विनंती बदली करण्यात येऊ नये असे आदेश कक्ष अधिकारी संजय कुडवे यांनी दिले आहेत.त्यानुसार शिक्षकांच्या आपसी बदलीचा मार्ग मोकळा झाला असला तरी सीईओ व शिक्षणाधिकारी हे खरच इमानदारीने आपसी बदली करतात की गोंदिया जिल्ह्यात आचारसंहिता लागू होण्याची वाट बघतात याकडे लक्ष लागले आहे.