सभेला गैरहजर राहून अधिकाèयांनी दिला पदाधिकाèयांना चाप

0
10

गोंदिया ता.२3-विकास कामाच्या आढावा बैठकीचे पूर्व नियोजन असताना आणि जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाèयांना विश्वासात घेऊनच २२ मे रोजी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.परंतु वारंवार विशेष सभा आयोजित करून अधिकाèयांची करण्यात येणाèया कोंडीला बघूनच २२ मे च्या सभेला हजर न राहण्याचा संकल्पच जिल्हा परिषदेच्या सीईओसह सामान्य प्रशासन विभागाचे कामकाज बघणारे डेप्युटी सीईओ,एडीशनल सीईओ,कार्य.अभियंता व शिक्षणाधिकाèयांनी केल्याचे चित्र बघावयास मिळाले.त्यावरून आपणच सभा बोलवायची आणि आपणच ती अधिकारी नसल्याचे कारण पुढे करून तहकूब करायची पद्धत आता सुरू झाल्याचे बोलले जात आहे.गेल्या अडीच वर्षात जिल्हा परिषद अध्यक्षांने अधिकाèयांना कायदा व शासन निर्णयाच्या आधारावर केलेल्या सहकार्यामुळे अधिकारी वरचढ झाले असून ते पदाधिकारी व सदस्यांना जुमानत नसल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे गटनेते डॉ.योगेंद्र भगत,शिवसेनेचे राजेश चांदेवार व भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केला.
जिपच्या सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु ऐनवेळी मुख्यकार्यपालन अधिकाèयांसह अनेक विभागप्रमुख अनुपस्थित राहिल्याने सभा अध्यक्षांच्या परवानगीने पुढे ढकलण्यात आली असून आता ही सभा २६ मे रोजी घेण्यात येणार आहे. परंतु यामुळे अधिकाèयांच्या मगरूरीपणा पुढे आला आहे. तर लोकशाहीत जनप्रतिनीधी की अधिकारी श्रेष्ठ या चर्चेला मात्र आज जिल्हा परिषदेच्या परिसरात उधाण आले होते. आजच्या सभेचे संचालनाची जबाबदारी घ्यावी म्हणून मुख्य लेखा वित्त अधिकारी,बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पाचारण करण्यात आले ,परंतु त्यांनीही नकार देत आजच्या सभेला अधिकारी वेळ देऊ शकत नसल्याने विभागीय आयुक्तांनीच पुढच्या सभेला हजर राहून विकास कामाचा आढावा घेण्यात मदत करावे अशापध्दतीचा ठराव पाठविण्याचे निर्देश जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर यांनी दिले.
सद्य उन्हाळ्याची दाहकता वाढतच चालली आहे. अशात जिल्ह्यातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला समोरे जावें लागत आहे. तर जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागात उन्हाच्या तीव्रतेने विविध आजार उद्भवण्याची परिस्थिती आहे. अशात काही उपाय योजना करता यावी. व पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून काही उपाय योजना राबविण्याच्या दृष्टीने व आरोग्य विषयक सेवांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान सभेत जिप अध्यक्षासह जिपेच सर्व सभापती, सदस्यांनी हजेरी लावली होती. मात्र मुखयकार्यपालन अधिकारी व इतर काही विभाग प्रमुखांनी आपली मगरुरी दाखत चक्क या सभेला येण्याचे टाळले. त्यामुळे आजची सभा अध्यक्षांच्या परवानगीने रद्द करण्यात आली. विशेषत: शासनाच्या योजना प्रशासनामार्फतच सर्वसामान्यापर्यंत पोहचत असतात. अशात सभा रद्द झाल्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत पोहचणाèया योेजनाच गुलदस्त्यात राहिल्या आहेत अशी चर्चा होती. कुठल्याही अधिकायाने मात्र अध्यक्षांची परवानगी गैरहजर राहण्यासाठी घेतली नव्हती यावरून अध्यक्षाची या अधिकाèयांसमोर कवडीचीही किमंत नसल्याचेच चित्र आजच्या सभेत होते.