महाराणांच्या पुतळ्याचे अनावरण

0
15

गोंदिया दि. २४: येथील महाराणा प्रताप मेमोरियल संस्थेच्यावतीने महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त रेलटोली येथे २१ फुट उंचीच्या कांस्य पुतळ्य़ाचे अनावरण करण्यात आले. आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेत आयोजित कार्यक्रमात खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते पुतळ्य़ाचे अनावरण करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, माजी नगराध्यक्ष दीपक नशिने, नगर परिषद बांधकाम सभापती राकेश ठाकूर, संस्था अध्यक्ष उदयसिंह प्रमर उपस्थित होते. याप्रसंगी खासदार पटेल यांनी, महाराणा प्रताप यांच्या पुतळ्य़ाची स्थापना केल्याबद्दल संस्थेचे कौतूक केले. तर आमदार अग्रवाल यांनी, महाराणा प्रताप यांच्या जीवनावर प्रकाश टाकत संस्थेला सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.
दरम्यान पुतळ्य़ाची स्थापना करण्यासाठी सहकार्य करणार्‍या संस्थाध्यक्ष प्रमर यांचा खासदार पटेल यांच्या हस्ते शाल व श्रीफळ तर आमदार अग्रवाल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तर संस्था उपाध्यक्ष विजय बैस, मनमोहनसिंह सोमवंशी, नरसिंह गहरवार, भरतसिंह तोमर, सुभषसिंह बैस, रविंद्रसिंह पवार, शिवगोपालसिंह बडगुजर, गीता गहरवार, वर्षा बडगुजर यांना प्रमर यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांची प्रतिमा भेट देण्यात आली. विशेष म्हणजे याप्रसंगी मुर्तीकार मनोज र्कुे (दुर्ग, छत्तीसगड) यांचाही पाहुण्यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्तावीक प्रमर यांनी मांडले. संचालन विजयसिंह बैस यांनी केले. आभार नरसिंह गहरवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी राजू चंदेल, सुधीर चव्हाण, दिनेश चव्हाण, सुप्रित बोस, आदित्य पवार, युवराज ठाकूर, अभिषेक बैस, कुवरसिंह भारद्वाज व समाजबांधवांनी सहकार्य केले.