डाॅ.गुज्जनवार व डाॅ.ब्राम्हणकरांची बदली

0
14

गोंदिया दि.३: जिल्ह्यातील पाच डॉक्टरांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या झाल्या आहेत.यामध्ये आरोग्य विभागातील तीन डॉक्टरांच्या विनंतीवरून तर दोन डॉक्टरांच्या प्रशासकीय बदल्या झाल्या आहेत. आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र काबराबांध येथील डॉक्टर विवेक अनंतवार यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांची बदली शासनाने शासकीय महाविद्यालय नागपूर येथे केली आहे.
डॉ.अनंतवार यांनी कावराबांध आरोग्य केंद्रात सर्वच सोयी-सुविधाची सोय करून त्या केंद्राला राज्यस्तरावर नेऊन ठेवले. याची दखल घेत त्यांची बदली नागपूर जीएमसीला करण्यात आली आहे. दरेकसा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक चिमने यांची बदली भंडारा जिल्ह्याच्या खमारी येथे करण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना-बाक्टी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांबळेयांची बदली आयुर्वेदीक दवाखाना रजेगाव ता. लाखनी येथे करण्यात आली.
अर्जुनी-मोरगावचे तालुका वै.अधिकारी डॉ.संजय गुज्जनवार यांची बदली तिरोडा तालुक्याच्या अर्जुनी येथे करण्यात आली. तर सडक-अर्जुनीचे ता.वै. अधिकारी डॉ. ब्राम्हणकर यांची बदली आमगाव तालुक्याच्या शिवणी येथील आयुर्वेदीक दवाखान्यात झाली.