मांडवाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून विनयभंग

0
9

कोरपना दि.३: कंत्राटी आरोग्य सेविकेला रजा हवी यासाठी ती वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कक्षात गेली असता तिचा कथितरित्या विनयभंग करून शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर प्रकार मंगळवारी कोरपना तालुक्यातील मांडवा प्राथमिक आरोग्य केंद्रात घडल्याची घटना घडली.
सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, कोरपना तालुक्यातील आदिवासी बहुल मांडवा प्राथमिक आरोग्य केंद्रात आज मासिक बैठक होती. या बैठकीला सदर आरोग्य केंद्रातील स्थायी तसेच कंत्राटी आरोग्य सेविका उपस्थित होत्या. बैठक संपल्यानंतर एक कंत्राटी आरोग्य सेविका येथील डॉ.दडमल यांच्या कक्षात जाऊन तिने दोन दिवसाची रजा देण्याची विनंती केली. तेव्हा डॉ.दडमल यांनी तिचा कथितरित्या हात पकडून दोन काय चार दिवसांची रजा देईन, मात्र तू मला शरीरसुख द्यायला हवे, अशी अफलातून मागणी केली. तिने डॉक्टरने पकडलेला हात झिडकावून आरडाओरड केली. ही ओरड ऐकून कक्षाबाहेर असलेल्या पाच-सहा आरोग्य सेविका धाऊन गेल्या. या झटापटीत सदर आरोग्य सेविकेच्या हातातील बांगड्या फुटल्या व ती रडत होती. इतर आरोग्य सेविकांनी तिला कक्षाबाहेर आणून विचारणा केली असता तिने हा प्रगकार सांगितला. दरम्यान, एका आरोग्य सेविकेने डॉक्टरच्या कानशिलात लगावली. इतर आरोग्य सेविकांनी तिला बाहेर काढले. त्या सेविकेने चपला काढून प्रसाद देणे सुरू केले होते.
बैठकीला बाहेर उपस्थित असलेल्या पीडित आरोग्य सेविकेच्या पतीला हा प्रकार समजताच त्याचाही पारा चढला, मात्र इतर आरोग्यसेविकांनी त्याची समजूत काढून शांत केले. या गंभीर प्रकाराबाबतची तक्रार दाखल करण्यासाठी पिडीत, तिचा पती व पाचसहा आरोग्य सेविकांनी कोरपना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. ठाणेदार कोरपना यांनी सर्वांचे बयान दाखल करून पिडीतासोबत मांडवा आरोग्य केंद्राला भेट दिली व चौकशी सुरू केली आहे.