27.4 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ होम कोरोंटाईट केलेल्या १०० ते १५० लोकांची लिस्ट आरोग्य विभागा मधुन लिक

होम कोरोंटाईट केलेल्या १०० ते १५० लोकांची लिस्ट आरोग्य विभागा मधुन लिक

गोपनिय माहिती बाहेर आली कशी, प्रशासन करते तरी काय?

0
1409

भंडारा,दि.29 एप्रिलः-भंडारा जिल्हयात एक कोरोना पॉजीटिव्ह असल्याने संपुर्ण प्रशान हे आता कोरोनाचा रोख थाम करण्याच्या उदे्दशाने त्या महिलेचा संपर्वâ कुणा कुणा सोबत आले त्यांचा डेटा आरोग्य विभागाने एकत्रीत करुन घेतला असुन त्या त्या लोकांना होम क्वारंटाईन करण्याचे काम युध्द पातडीवर काम सुरु देखील आहे. जिल्हाधिकारी यांनी देखील संबंधीत परिसर हे पुर्ण पणे सिल करुन त्या परिसराला गराडा बु., गराडा खुर्द, मेंढा, बासोर, बोरगाव बु (पुनर्वसन) हा परिसर पुढील आदेशपर्यंत प्रतिबंधित (सिल) म्हणून घोषित करण्यात आले आहे .परंतु प्रशासनाच्या वतीने त्या महिलेचा एकत्रीत केलेला हिस्ट्री हि सकाळीच सोशल मिडीयावर वायर झाल्याने संपुर्ण १०० ते १५० लोकांचे नाव मोबईल नंबर सहित वाट्अप वर अनेक गु्रपवर वायरल झाल्याने प्रशासनात मोेठी खडबळ निर्माण झाली. हि यादी अनेक ग्रुपवर आल्याने आता त्या १५० लोकांचे समाजीक जिवन आता धोक्यात आले असल्याने अनेकांना त्यांच मित्र व संबधीत फोन करुन -करुन पुन्हा पुन्हा विचारल्याने मानसिक त्रास येत असल्याचे एका लिस्ट मधील संबधीताने प्रतिनीधीशी बोलतांनी सांगीतले आहेत.गोपनीय असलेली हि १५० लोकांची लिस्ट कशी काय लिक होऊन बाहेर आली यावर मोठी चिंत व्यक्त करण्यात येत आहे.परंतु प्रशानाने अद्याप ही या घटनेवर कोणतीही कार्यवाही केली नसल्याने लोकांच्या मनात शंकेने घर केला आहे. हि लिस्ट सोशल मिडीयावर वायरल करणा-यावर त्वरीत कार्यवाही करण्याची मागणी आता या नागरीकांनी केली आहे.

*•ग्रामसेवकाची ग्रामवारी•*
कोरोनाचे भीषण संकटात कर्मचार्यानी मुख्यालयी राहण्याचे आदेश आहेत,कारण गाव कोरोना समितीत ग्रामसेवक,तलाठी,व पोलिस पाटिल यांची महत्वाची मध्यस्थी असते,पण लॉकडाऊन पासूनच बारव्हाचे ग्रामसेवक मुख्यालयाला दांडी मारुन भंडारा येथून अपडाऊन करित आहेत.भंडाराजवळच कोरोना बाधित रूग्ण सापडला,अशा परिस्थितीत त्याच परिसरातून येणार्या ग्रामसेवक साहेबांचे हातावर शिक्का मारुन त्याना होमक्वारटाइन का करण्यात येऊ नये असाही सवाल जनता करीत आहे.तर गटविकास अधिकारी हे मला विचारू नका असे म्हणून बीडीओवर ग्रामसेवक भारी असे म्हणण्याची वेळ आली आहे .