गोंदिया,दि.09:- बुद्ध जयंती निमीत्त संविधान मैत्री संघ, सर्व समाज समिती व समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने “बुद्धा आले दारी” हा ऑनलाइन उपक्रम सोत्साह सम्पन्न झाला. शनिवार दि.25 एप्रिल पासुन 7 मे पर्यंत घेण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये सोशल मीडिया वर, संविधान मैत्री संघाच्या फेसबुक ग्रुप वर बुद्ध विचारांच्या माध्यमातून घरोघरी जागृती करण्यात आली. बुद्ध जीवन चरित्र माहिती, बुद्ध संदेश, धम्म देषणा, बुद्ध बोध कथा, बुद्ध गीत, बौद्ध चर्चा, रंगोली, चित्रकला, व्यवस्थापन सजावट असे विविध कार्यक्रम धम्म्गुरु, विचारवंत, उपासक- उपासिका, अनुयायी, विद्यार्थ्यांकडुन ऑनलाइन सादर करण्यात आले. व्हाट्स ऐप्प करिता ” भगवान बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रसंगावर प्रश्नोत्तरी कार्यक्रम नागपुरचे भदंत डॉ.चंद्रकीत्ती यानी सादर केले. या कार्यक्रमात प्रतिभागिना सहभाग पूर्णत: नि :शुल्क होता. या ऑनलाइन उपक्रमात सहभागी झालेल्यात वसंता गवळी, सतिश बनसोड, उमाताई गजभिये, पौर्णिमाताई नागदेवे, शरद मानकर सर, सुनंदा रामटेके, ज्वाला मेश्राम, लक्ष्मी राऊत, समता गणवीर, प्रणाली मून, लीला राऊत प्रतिमा रामटेके, शृष्टी सोनवाने, लोपामुद्रा शहारे, पल्लवी चौहान, प्रगती मेश्राम, सतिश वानखेडे, वीणा गणवीर, सुरभी खोब्रागडे, सनोज उके,स्वाती मेश्राम,विक्की रामटेके मौसम कापसे, वंदना वाहने, निकिल मेश्राम, करण मानेकर, आकांक्षा वासनीक, अर्चना सतदेवे, पल्लवी मेश्राम, प्रतिक रामटेके, प्रणालि चौहान, सुरेंद्रकुमार खोब्रागडे, अशोक बागुल, शालू मेश्राम उज्ज्वला चन्द्रिकापूरे, नम्रता गजभीये, निर्मला मेश्राम, ज्योती फुले,अनिता मेश्राम व अन्य उपासकानी ऑनलाइन सहभाग घेतले. सर्वाना लॉकडाउन नंतर पूरस्कृत करण्यात येणार आहे. जिल्यात यंदा घरिच सादगीने जयंती साजरी करण्यात आली। या वर्षी लॉकडाउन चे पालन करून बुद्ध विहारात कार्यक्रम घेण्याचे टाळण्यात आले. हा आयोजन यशस्वी व्हावा या करिता संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे, सर्वसमाज जयंती समिती समिती संयोजक पुरुषोत्तम मोदी, सहसंयोजक अबरार सिद्दिकी, कोषाध्यक्ष डॉ राजेन्द्र वैद्य, स्वागत प्रमुख सुनिल भोंगाडे, रवि भांडारकर, सचिव प्रकाश तांडेकर, सहसचिव परेश दुरुगवार, कार्यालयीन सचिव सुरेंद्र सोनवाने, संघटक राजु नागरीकर, उमेश दमाहे दिनेश उके, अनिल गोंडाने, सांस्कृतिक प्रमुख चित्रा पाटील, आभा मेश्राम, संघटीका डॉ प्रा.दिशा गेडाम, माधुरी भेलावे, पौर्णिमा नागदेवे, नगमा शेख, संचालक मंडल मुख्याध्यापिका उमा गजभिये, माधुरी पाटील, राजकुमारी कठाने, लक्ष्मी राऊत, युवा मंडल आदेश गणवीर, सायमा खान, मीलन चौधरी, अरुण बन्नाटे, सलाहकार मंडल डॉ नामदेव किरसान, शब्बीर पठाण, वसंता गवली, महेंद्र कठाने, सैय्यद कमर अली, सी.पी.बिसेन, राजहंस चौरे इत्यादीनी प्रयास केला.





