जांभुळघाट क्षेत्रात वाघाचा मृतदेह आढळला

0
13

चंद्रपूर :दि. २४: येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जांभुळघाट क्षेत्रात एका वाघाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत वाघ हा नर असून त्याचे सर्व अवयव सुरक्षित आहेत. ही घटना कक्ष क्रमांक १0७ मध्ये मंगळवारी सायंकाळी ४.३0 वाजताच्या सुमारास उजेडात आली.
अन्य एका वाघाशी झालेल्या झुंजीत सदर वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. घटनेची माहिती मिळताच, ताडोबा कोअर झोनचे उपवन संरक्षक ए.एस. कळस्कर व बफर झोनचे उपवन संरक्षक गजेंद्र नरवणे हे घटनास्थळी रवाना झाले. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक गणपती नरड यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे. वाघाच्या मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अन्य वाघाशी संघर्ष किवा नैसर्गिकरित्या त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज गरड यांनी व्यक्त केला.