लोकजागृतीमुळे लोकसंख्या नियंत्रण शक्य – गोपालदास अग्रवाल

0
19

जागतिक लोकसंख्या दिवस साजरा
गोंदिया, दि.११ : जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाला भविष्यात चांगले शिक्षण, आरोग्याच्या सुविधा त्याचप्रमाणे इतर सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे. वर्तमान लोकसंख्या लक्षात घेऊन शासन सर्व नियोजन करीत असते परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे नियोजन अयशस्वी ठरते. वाढत्या लोकसंख्येचे दुष्परिणाम लक्षात घेऊन लोकांमध्ये जागृती निर्माण झाल्यास लोकसंख्या नियंत्रण करणे शक्य आहे. असे मत आमदार गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केले. आज ११ जुलै रोजी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील सभागृहात जिल्हा आरोग्य प्रशासन, आयएमए, अधिकारी महासंघ, अधिकारी-कर्मचारी समन्वय समिती, लॉयन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार अग्रवाल बोलत होते. अध्यक्षस्थानी नागपूर आरोग्य परिमंडळाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल होते. प्रमुख अतिथी म्हणून नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीष कळमकर, वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र जैन, परिमंडळाचे सहायक संचालक डॉ. पुरुषोत्तम मडावी उपस्थित होते.
डॉ. कळमकर म्हणाले, वाढत्या लोकसंख्येचे दुष्परीणाम लक्षात यावे यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. आरोग्याच्या सोयीसुविधांमध्ये वाढ झाल्यामुळे मृत्यूदर कमी झाला असला तरी आयुष्यमान वाढले आहे. प्रत्येकाने आता मर्यादित कुटूंबाचा विचार करुन हम दो हमारे दो याचे पालन करावे. वाढत्या लोकसंख्येमुळे आरोग्य सेवा अपुऱ्या पडत आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रबोधनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक लोकासंख्या दिनाचे औचित्य साधून रांगोळी व पोस्टर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली. रांगोळी स्पर्धेत प्रथम – महिमा अग्रवाल, द्वितीय – कृतिका अग्रवाल, तृतीय – वंचिता अग्रवाल आणि पोस्टर्स स्पर्धेत अ गटात प्रथम – अमन खान, द्वितीय – अलीशा खान, तृतीय – तन्वी जैन,ब गटात प्रथम – तृप्ती केकत, द्वितीय – प्रार्थना भूजाडे, तृतीय – अरुण रामटेके या विजेत्यांचा तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचाही मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दुधे, बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्ष डॉ. संजीव दोडके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राज वाघमारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. वाघमारे, रेडीऑलॉजिस्ट डॉ. चहांदे, बाल रोग तज्ञ डॉ. लाटणे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, डॉ. जयस्वाल, अधिकारी – कर्मचारी समन्वय समितीचे सचिव दुलीचंद बुध्दे, शासकीय नर्सिग विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती रामटेके, दिव्या भगत, शर्मिष्ठा सेंगर यांचेसह शासकीय नर्सिंग विद्यालयाच्या विद्यार्थीनी, गोंदिया पब्लीक स्कूल, लिटल फ्लॉवर स्कूलच्या विद्यार्थींनी तसेच केटिएस व बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयातील इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.