प्रत्येक फाइलीसाठी अध्यक्ष मॅडम घेऊ लागल्या मार्गदर्शन

0
11

गोंदिया, दि. २२ -जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या काँग्रेसच्या उषाताई मेंढे यांनी आपल्या कामकाजाला सुरवात केली आहे.निवडून आल्यानंतर पहिल्याच दिवशी पदभार सांभाळला.त्यानंतर लगेच आपल्या कक्षातील जुन्या बैठक व्यवस्थेत बदल करून आपल्याला योग्य अशी दिशा निवडली.दुसèया दिवशी जिल्ह्यातील सर्व प्रमुख विभाग प्रमुख,त्यांचे सहकारी अधिकारी यांच्यासोबत ओळख बैठक घेऊन चर्चा करून आपणास कशापध्दतीने काम करायचे आहे,हे अधिकाèयांना सांगितले.तशाही मेंढेताई साठी जिल्हा परिषदेचा प्रशासन काही नवीन राहिलेला नाही.जिल्हा परिषद स्थापन झाल्यानंतर २०००-२००५ च्या काळात महिला बालकल्याण विभागाचे सभापतिपद २००३-२००५ या काळात त्यांनी सांभाळले आहे.त्यामुळे त्यांना अनुभव आहे असे म्हणता येईल.परंतु त्यांनी आपल्याला जरी अनुभव असला तरी कुठलाही चुकीचा निर्णय होऊ नये. यासाठी कुठल्याही विभागाची फाईल स्वाक्षरीसाठी आली
तर आधी त्यावर वरिष्ठ असलेले आणि पहिले जि.प.अध्यक्ष अ‍ॅड.के.आर.शेंडे आणि गोंदियाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांना दाखविल्याशिवाय निर्णय घेणार नसल्याची त्यांनी भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.त्याअनुषंगानेच २० जुर्ले रोजी पहिली जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाची(लपा विभाग संबधित) फाईल स्थानिक काँग्रेस नेत्याच्या कार्यालयात पोचली.यावरून मेंढेताई समजदार असल्यातरी त्यांनाही रजनी नागपूरे यांच्या कार्यकाळाचा अनुभव बघावयास मिळणार आहे.

भाजप आत्ता मुसक्या आवळून गप्प बसणार
भारतीय जनता पक्षाचे सर्वच नेते मग ते नगरपरिषदेतील असो की जिल्हा परिषदेशी संबधित स्थानिक काँग्रेसी नेत्यावर नेहमीच आगपाखड करायचे.आपल्या घरून नगरपालिकेचा कारभार चालवितात.सीईओ,नगराध्यक्षाला घरी फाईल घेऊन बोलावतात.माजी जि.प.अध्यक्ष रजनी नागपूरे यांच्या कार्यकाळातही भाजपचे पदाधिकारी ओरडायचे.परंतु आत्ता तर भाजपच काँग्रेससोबत सत्तेत सहभागी झाली आणि नव्या अध्यक्षांनी तर स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या मार्गदर्शनाशिवाय व त्यांना फाईल दाखविल्याशिवाय कुठलाच निर्णय घेणार नसल्याची भूमिका घेतल्याची चर्चा असल्याने भाजपला याप्रकरणात आत्ता मुसक्या आवळून गप्प बसल्याशिवाय पर्यायच उरले नाही.

काँग्रेस विरोधात लिहिणाèयावर करडी नजर
गोंदिया जिल्हा परिषदेत घडलेल्या राजकीय घडामोडीवरील विश्लेष्णात्मक वृत्त लिहून जनतेला भाजप व काँग्रेसमधील अभद्र युतीची माहिती देणाèया गोंदियातील काही निर्भीड पत्रकारांवर करडी नजर ठेवली जात आहे.त्यामुुळे भविष्यात उत्तरप्रदेश,दिल्ली,मध्यप्रदेशातील पत्रकारांसोबत ज्या घटना घडल्या तशा घटनांची पुनरावृत्ती गोंदियात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा परिषदेत घडलेल्या भाजप काँग्रेसच्या युतीमुळे राज्यात खळबळ माजली असून गोंदियाच्या पत्रकारांनीही निष्पक्षपणे आपल्या लेखणीतून काँग्रेस,भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांची पोलखोल केली.परंतु एका पक्षाच्या नेत्याला ही पोलखोल चांगलीच झोंबल्याने आपल्या विरोधात लिहिणाèयांवर करडी नजर ठेवा असे फर्मान देण्यात आल्याच्या चर्चेना वेग आला आहे.