विषय समितीच्या निवडणुकीतही भाजप काँग्रेस युती!

0
6

गोंदिया, दि. २२ –जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष व काँग्रेसमध्ये ताळमेळ झाले,त्याचप्रमाणे येत्या २८ जुर्ले रोजी होऊ घातलेल्या विषय समिती सभापतिपदाच्या निवडणुकीतही भाजप काँग्रेसची युती होणार यात शंका राहिली नाही.अखेरच्याक्षणी वरच्या पातळीवर जास्तच दबाव काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून आलाच तर काँग्रेस दोन सभापतिपद राष्ट्रवादीला देऊन काँगे्रस या प्रकरणाला येथे थांबविण्याचा प्रयत्न करू शकते.
परंतु राजकीय घडामोडीकडे बघितल्यास काँगेसचे स्थानिक नेते कुठल्याच परिस्थितीत राष्ट्रवादीसोबत जाण्याच्या मानसिकतेत दिसून येत नाही.कारवाई झाली तरी चालेल पण राष्ट्रवादीला सहकार्य नाही,ही भूमिका असल्यानेच काँग्रेसला राज्यपातळीवर नाच्चक्कीला सामोरे जावे लागत आहे.तर एकीकडे सर्व काही करूनही प्रफुल पटेलांना गोंदियात भाजपला सत्तेपासून रोखण्यात अपयश आल्याने पटेल गडकरीच्या मैत्रीतही कुठेतरी हळूहळू दुरावा तर निर्माण होऊ लागला नाही ना अशा वावड्या उठू लागल्या आहेत.
सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे बघितल्यास गोंदिया जि.प.विषय समिती निवडणुकीमध्ये भाजप व काँग्रेस दोन दोन सभापतिपद वाटून घेणार आहेत.यामध्ये काँग्रेसकडे अर्थ व बांधकाम आणि महिला बालकल्याण समितीचे पद तर भाजपकडे समाजकल्याण आणि कृषी व पशुंसर्वधन समितीचे सभापतिपद राहण्याची शक्यता आहे.भाजप तसेही आपल्याला सत्तेत वाटा मिळत आहे ना कुठलेही सभापती पद मिळाले तरी समाधान मानायचे या स्थितीत असल्याने काँग्रेससोबत अधिक वाटाघाटी सभापतीच्या विषयाला घेऊन करणार नाही.त्यानुसार काँग्रेसकडून अर्थ व बांधकाम विषय समितीसाठी अग्रवालांचे खंद्दे समर्थक म्हणून पी.जी.कटरे यांचा क्रमांक पक्का मानला जात आहे.तर अध्यक्षपदासाठी आग्रही असलेल्या विमल नागपूरे यांना महिला बालकल्याण समितीचे सभापतिपद देऊन त्यांची नाराजी दूर केली जाऊ शकते.
भाजपकडून समाजकल्याण विषय समितीसाठी घोटीचे जि.प.सदस्य विश्वजित डोंगरे,सुकडीच्या रजनी कुंभरे किंवा आमगाव खुर्दचे जि.प.सदस्य देवराज वडगाये यापैकी एकाचा विचार केला जाऊ शकतो.तर कृषी व पशुसंवर्धन समितीसाठी पिडंकेपारच्या सदस्या शैलजा सोनवाणे qकवा ठाणाचे शोभेलाल कटरे यांच्यापैकी कुणाची तरी लॉटरी लागण्याची शक्यता आहे.

राँका दोन सभापतीवर होणार समाधानी?
गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या राजकीय वातावरणाकडे बघता अध्यक्षपदापासून राष्ट्रवादी काँग्रेसला दूर ठेवण्यात भाजप व काँग्रेस यशस्वी झाली आहे.त्यामुळे सर्वात मोठा पक्ष राहूनही विरोधी पक्षात राहण्याची वेळ आली आहे.परंतु काँग्रेसपक्षावर असलेल्या दबावानुसार जर विषय समितीच्या सभापती पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत बसायला तयार झाली तर फक्त २ सभापतिपदावरच राष्ट्रवादीला समाधान मानावे लागणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फक्त २ सभापतीच्या पदावर समाधानी होऊन या सत्तेच्या वाट्यात सहभागी होते की पुर्णत विरोधी पक्षात बसण्याची भूमिका पार पाडते,ते सुध्दा महत्त्वाचे आहे.कारण काँग्रेस अर्थ व बांधकाम आणि महिलाबालकल्याण विषय समित्या कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडून सोडण्याच्या मनस्थितीत नाही,अशावेळी राँकाला सत्तेत बसायचेच असेल तर काँग्रेस जे म्हणेल त्यावरच समाधानी व्हावे लागणार आहे.