41.3 C
Gondiā
Saturday, May 17, 2025
Home Blog Page 5678

एनआरएचएमच्या कर्मचार्यांनी काढला मोर्चा,जिल्हाधिकार्यांना निवेदन

0

nrhm1गोंदिया,berarimes.com दि.3- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत येणाऱ्या ग्रामीण व शहरी भागात पूर्ण वेळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासह शासनाचे लक्ष वेधण्याकरीता सुरु केलेल्या आंदोलनातर्गंत आज(दि.3) येथील सुभाष शाळेच्या मैदानापासून भव्यदिव्य अशा मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले.हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोचल्यानंतर जाहिर सभेत परिवर्तीत झाला.या मोर्च्याचे नेतृत्व सुनिल तरोणे,आयटकचे हौसलाल रहागंडाले,राज्य कर्मचारी संघटनेचे लिलाधर पाथोडे,जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे पी.जी.शहारे आणि माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.भीमराव मेश्राम,,अर्चना वानखेडे यांनी केले.यावेळी सर्वांनी मार्गदर्शन करीत एनआरएचम कुठल्याही परिस्थितीत बंद होता कामा नये यासाठी सतत आंदोलनात्मक भूमिका सुरु राहणार असल्याचे सांगितले.तर डाॅ.भीमराव मेश्राम यांनी 11 वर्ष एनआरएचएममधील कर्मचारी अधिकारी यांच्या प्रयत्नामुळे आज ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुरळीत होण्यास मदत झाली आहे.आधीच्या तुलनेत या वर्षात चांगले आरोग्य लोकांना मिळत आहे हे एनआरएचम योजनेचे यश असून केंद्र सरकार व राज्यसरकार हे अभियान 2017 मार्चमध्ये बंद करणार आहे.त्याआधी आपण मुबंई उच्च न्यायालयात यासंबधीची जनहित याचिका दाखल करणार असून ही योजना बंद करण्यापासून शासनाला रोखणे हाच उद्देश असल्याचे सांगितले.IMG-20160903-WA0174
केंद्रसरकारने मार्च 2017 पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या अभियानंतर्गत आरोग्यसेवा पुरविणारे जिल्ह्यातील सुमारे 100 डाॅक्टरसह 700 कर्मचारीवर्गाला नोकरीपासून वंचित व्हावे लागणार आहे.अभियान बंद होण्यापुर्वी राज्यसरकारने या सर्व कर्मचार्याना नियमित आरोग्य सेवेत सामावून घ्यावे या मुख्य मागणीला घेऊन 24 सप्टेंबर पासून जिल्ह्यातील कर्मचारी अधिकारी हे काळ्या फिती लावून कामकाज करीत होते. राज्यव्यापी आंदोलनातर्गंत आज शनिवारला त्यांनी मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन सादर केले.
दुर्गम भागातील जनतेपर्यंत सेवा देण्याचे काम आरोग्यसेवक करीत असतात. परंतु, त्यांची सेवा उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी कमी पडते. ग्रामीण भागात गरोदर महिला, बालके, प्रसूती झालेल्या महिला आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये, यासाठी २००५ पासून संपूर्ण राज्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबविले जात आहे. या कर्मचाऱ्यांचे २००६ पासून मासिक मानधन अत्यल्प आहे. सध्याच्या महागाईच्या काळात अल्पशा मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण आहे. नोकरीत कायम करण्यात येईल, या आशेवर हे कर्मचारी काम करीत आहेत. आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी हे कर्मचारी-अधिकारी वर्गाने काळ्या फिती लावून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे.विरोधी पक्षात असताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनआरएचम कर्मचारीला कायम करावे अशी मागणी केली होती,आता मात्र सत्तेत तेच असताना आपले शब्द विसरल्याचा आरोपही कर्मचारी वर्ग करीत आहेत. आंदोलनातर्गंत 19 सप्टेंबरला एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारणे,आक्टोबंर महिन्यात अहवालपाठविण्यासह सर्व रिपोर्टिंग देणे बंद करणे, 2 नोव्हेबंरपासून बेमुदत काम बंद आदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. जिल्ह्यातील सर्वच तालुकास्तरावर कर्मचारी अधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी-कर्मचारी महासंघाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष सुनिल तरोणे,उपाध्यक्ष अर्चना वानखेडे,सचिव संजय दोनोडे,डाॅ.मिना वट्टी,प्रदिप रहागंडाले,अविनाश वराडे,संकेत मोरघरे,राजीव येडे ,डाॅ.योगेश पटले,अजितसिंग,तिवारी, पवन वासनिक, ग्रि्ष्मा वाहने,प्रतिमा मेश्राम,संजय मेंढे,अर्चना चौधरी,राखी प्रसाद,रेखा पुराम,अर्चना कांबळे,ललीता गौतम,ममता गजभिये,शालिनि राऊत,निशांत बनसोड,अनिरिध्द शर्मा,अनिल रहमतकर,ुप्रकाश थोरात,सतिश माटे,मनोज सातपुते,विद्या रहागंडाले ,माया नागपूरे,संजय बिसेन यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.या आंदोलनाला जिल्ह्यातील बहुतांश संघटनानी आपला पाठिबां जाहिर केला होता.

गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहाराबाबत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

0

घोडाझरी कालव्यातील निकृष्ट कामांबाबत 6434 पानांचे दोषारोपपत्र
मुख्य अभियंत्यासह पाच अधिकारी व कंत्रटदारांचा समावेश
नागपूर, दि. 3 – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या खुल्या चौकशीनंतर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील घोडाझरी शाखा कालव्यातील निविदा प्रक्रिया व बांधकामात झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात शनिवारी पोलिसांनी न्यायालयात तब्बल 6434 पानांचे दोषारोपपत्र सादर केले. इतकेच नव्हे तर तपासादरम्यान अधिक पुरावे मिळून आल्यास अथवा अधिक आरोपी निष्पन्न झाल्यास पुरवणी दोषारोपपत्र सादर करण्याची तजवीजसुद्धा दोषारोपपत्रत ठेवण्यात आली आहे.

आरोपींमध्ये तत्कालीन पूर्वअर्हता मूल्यांकन समिती अध्यक्ष आणि मुख्य अभियंता गोसेखुर्द प्रकल्प नागपूर सोपान रामराव सूर्यवंशी, तत्कालीन पूर्वअर्हता मूल्यांकन समिती सदस्य सचिव आणि सध्या कार्यकारी अभियंता (नागपूर) असलेले रमेश डी. वर्धने, तत्कालीन वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी गुरुदास मांडवकर रा. नागपूर, तत्कालीन अधीक्षक अभियंता संजय खोलापूरकर, तत्कालीन कार्यकारी संचालक रोहिदास लांडगे रा. पुणो आणि कंत्रटदार एफ.ए. कन्स्ट्रक्शन मुंबईचे सक्रिय भागीदार निसार फतेह मोहम्मद अब्दुला खत्री रा. मुंबई यांचा समावेश आहे.

राज्य शासनाच्या गृह विभागाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (अॅन्टी करप्शन ब्युरो) राज्यातील सिंचन प्रकल्पांची उघड चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार ब्युरोचे महासंचालक यांनी विदर्भातील पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील झालेल्या भ्रष्टाचारासंबंधी चौकशी सुरु करण्याचे आदेश नागपूर कार्यालयाला दिले होते. त्यानुसार अॅन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांना घोडाझरी शाखा कालवा कि.मी. 4.26क् ते 8.8क्क् मधील मातीकाम ‘कट अॅण्ड कव्हर’ या कामाची निविदा प्रक्रिया व बांधकाम संबंधाने उघड चौकशी केली. चौकशीअंती पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांनी 23 फेब्रुवारी 2क्16 रोजी आरोपी लोकसेवक व मे.एफ.ए. कन्स्ट्रक्शनचे सक्रिय भागीदार निसार फतेह मोहम्मद खत्री आणि इतर 4 भागीदार यांच्याविरुद्ध नागपूर शहर येथील सदर पोलीस स्टेशन येथे अप.क्र. 3175/2क्16 कलम 13(1) (क), (ड), सह 13 (2) ला.प्र.का 1988 व सह कलम 42क्, 465, 467, 468, 471, 1क्9, 12क् (ब) भां.द.वि.अन्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक मिलिंद तोतरे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

धान खरेदी योजनेत स्पर्धात्मक ई टेंडरिंग पद्धतीचा वापर करावा- मुख्यमंत्री

0

मुंबई, दि. 2 : शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी वेळेत व्हावी आणि त्यांना त्याची रक्कम वेळच्या वेळी मिळावी, यासाठी ई-टेंडरिंगद्वारे स्पर्धात्मक पद्धतीने धान खरेदी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी येथे दिले.धान खरेदीसंदर्भात आज सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी खासदार नाना पटोले, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी.के. जैन, पणन विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, अन्न,नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक निलिमा केरकट्टा, महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डी. के. जगदाळे,भारतीय अन्न महामंडळाचे राज्यातील महाव्यस्थापक सुधीर कुमार,उपमहाव्यवस्थापक हरिष, विभागाचे उपसचिव सतीश सुपे, वित्तीय सल्लागार व उपसचिव सत्यवान उबाळे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून मार्केटिंग फेडरेशनच्या मार्फत शेतकऱ्यांच्या धानाची खरेदी करण्यात येत आहे. परंतु वेळेत धान न उचलणे, रक्कम वेळेत न मिळणे अशा
तक्रारी शेतकऱ्यांकडून येत आहेत. त्यामुळे धानाची खरेदी विकेंद्रित खरेदी पद्धतीने ई-टेंडरिंगद्वारे करावी. यामध्ये खाजगी कंपन्यांचाही सहभाग झाल्यास स्पर्धा निर्माण होऊन धान खरेदी योजना सक्षम होईल. यासाठी केंद्र
शासनाकडे आवश्यक तो प्रस्ताव पाठवावा.

श्री. पटोले म्हणाले की, धान खरेदी योजना एकाच संस्थेमार्फत राबविण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळत नाहीत. तसेच धानाचीही लवकर उचल होत नसल्यामुळे राज्य शासनास आर्थिक तोटा होतो.त्यामुळे या खरेदी योजनेत खासगी कंपन्यांनाही सहभागी करून घ्यावे.प्रधान सचिव श्री. पाठक यांनी खरेदी योजनेची माहिती दिली.

मुख्यमंत्रीच्या हस्ते लोकराज्यच्या ‘आपले पोलीस’ विशेषांकाचे प्रकाशन

0

मुंबई, 02 : लोकराज्य सप्टेंबर 2016 च्या ‘आपले पोलीस’ या
विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे
सह्याद्री अतिथीगृहात झाले. या विशेषांकात महाराष्ट्र पोलीसांच्या
सामर्थ्यशाली आणि गौरवशाली कामगिरीचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. या
अंकाचे विशेष संपादन गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी
केले आहे.

या प्रकाशन सोहळ्याला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे,
पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, आमदार सर्वश्री. आशिष शेलार, अबु आझमी,
वारिस पठाण, अस्लम शेख, अमीन पटेल, माजीमंत्री नसीम खान, गृह विभागाचे
अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी, प्रधान सचिव डॉ. विजय सतबीर सिंग,
नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सतीश माथूर,
मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता, पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर,
परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, संचालक (माहिती व प्रशासन) तथा अंकाचे
प्रबंध संपादक देवेंद्र भुजबळ यांच्यासह पोलीस व विविध विभागांचे वरिष्ठ
अधिकारी उपस्थित होते.

या अंकात सायबर सुरक्षा प्रकल्प, क्राइम ॲण्ड क्रिमीनल
ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम, फिरते न्याय सहायक वैज्ञानिक पथक, रस्ते
सुरक्षा, सीसीटीव्ही यंत्रणा, सोशल मीडियावरील बदनामी, ऑनलाइन पोलीस
सेवा, नक्षलींवर नियंत्रण, महिलांची सुरक्षा, महिला सुरक्षा पथक-दामिनी,
कैद्यांची सुधारणा व पुनर्वसन, नागरी हक्कांचे संरक्षण, सामाजिक बहिष्कार
मुक्ती, पोलिसांसाठी घरे, तंटामुक्तीचे यश, ऑपरेशन मुस्कान, पोलीस
अधिकारी घडवणारी संस्था, पोलीस दलात कसा प्रवेश घ्याल ? आदी विषयांवर
उपयुक्त व माहितीपूर्ण लेखांचा समावेश करण्यात आला आहे.

हा विशेषांक उत्कृष्ट, वाचनीय आणि अत्यंत संग्रहणीय झाल्याची
प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

शहर विकासासाठी २० कोटींचा निधी मंजूर

0

गोंदिया – गोंदिया नगरपरिषद अंतर्गत रस्ते बांधकाम व इतर विकासकामांसाठी राज्य शासनाने २० कोटींचा निधी मंजूर केला आहे. यात नगर विकास विभाग अंतर्गत विशेष रस्ता अनुदान निधी १० कोटी तर वैशिष्टयपूर्ण योजनेअंतर्गत विविध विकास कामांसाठी १० कोटीचा निधी असा एकूण २० कोटी रुपये मंजूर करण्यात आलेला आहे. गोंदिया शहराच्या विकासासाठी निधी मंजूर करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राजकुमार बडोले, खासदार नानाभाऊ पटोले, भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांचे आभार नगराध्यक्ष कशिश जायस्वाल व भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी मानले आहे.
वैशिष्टयपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर १० कोटीच्या निधीत शहरातील विविध प्रभागात प्रस्तावित कामे होणार आहेत. यात प्रामुख्याने संत रविदास महाराज सांस्कृतिक भवन, विविध दुकाने, व्यापारी संकुल, दवाखाना इमारत, जनकनगर ग्राऊंड, लायब्ररी मल्टिप्लेक्स इमारत, गौतमनगर प्ले ग्राऊंड, मनोहर म्युनिसिपल हायस्कुल, प्रभाग क्रमांक ६ मध्ये टाकी, मराठी व हिंदी प्राथमिक शाळा, जयस्तंभ चौकात बसस्थानक आदींचा समावेश आहे. तर विशेष रस्ता अनुदान निधी अंतर्गत मंजूर १० कोटीतुन नगर परिषद क्षेत्रातील विविध प्रभागात रस्ते बांधकाम करण्यात येणार आहेत. या संदर्भातील शासन निर्णय २४ ऑगस्ट रोजी निघाले आहे. नगराध्यक्ष कशिश जायस्वाल यांच्या नेतृत्वात शहरातील विकासकामांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते.

जलयुक्त शिवार : लोकसहभागातून काढला ४.४६ लक्ष घनमीटर गाळ

0

चंद्रपूर : जलयुक्त शिवार अभियान गेल्या दोन वर्षात संपुर्ण राज्यात लोकचळवळ म्हणून उभी राहिली आहे. समाजातील सर्वच क्षेत्रातील नागरिकांचा या अभियानात सक्रीय सहभाग लाभत आहे. जिल्ह्यातही अभियानास चांगला प्रतिसाद लाभत असून त्यामुळेच केवळ एका वर्षात लोकसहभागातून तब्बल ४ लक्ष ४६ हजार घनमिटर इतका गाळ तलाव, बंधारे, शेततळ्यातून काढण्यात आला आहे.

जनकल्याणकारी कुठलेही अभियान किंवा योजना ही लोकांच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. लोकांना सदर अभियान आपले वाटले तरच ते यशस्वी होते. त्यामुळेच गेल्या काही वर्षात शासनाने लोकसहभागावर भर दिला आहे. लोकांचा सहभाग लाभलेल्या योजना यशस्वी झाल्याची अलिकडच्या काळातील अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळेच जलयुक्त शिवार अभियान राबविताना लोकसहभागावर भर देण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात करोडो रुपए किंमतीची हजारो कामे अभियानांतर्गत लोकसहभागातून झाली आहे. या चळवळीत जिल्ह्यानेही आपला भरीव लोकसहभागाचा वाटा दिला आहे.

पहिल्या वषार्साठी जिल्ह्यातील २१८ गावे अभियानासाठी निवडण्यात आली होती. या गावांमध्ये ठिकठिकाणी काही कामे लोकसहभागातून करण्यात आली. लोकसहभागातून करण्यात आलेल्या या कामांची संख्या तब्बल ५४४ इतकी आहे. विशेष म्हणजे या कामातून ४ लक्ष ४६ हजार घनमिटर इतका गाळ तलाव, बंधारे, नाले, शेततळे यातून काढण्यात आला आहे. तलाव, नाला, बंधाऱ्यात गाळ साचल्याने, त्यात पाणीसाठा अल्प प्रमाणात होतो. पाणी संचय क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढणे फार महत्वाचे असते. त्यामुळे या कामासाठी लोकसहभाग घेतल्याने ही कामे होऊ शकली.

कॅन्सर इन्स्टिट्यूट : औरंगाबादचा विचार

0

नागपूर दि.३: राज्य शासनातर्फे कॅन्सर इन्स्टिट्यूट स्थापन करण्यासाठी नागपूरला डावलून औरंगाबादचा विचार करण्यात येत आहे, असा दावा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रेडिओथेरपी विभागाचे प्रा. डॉ. कृष्णा कांबळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून केला आहे. न्यायालयाने गुरुवारी ही बाब लक्षात घेता शासनाला यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्यास सांगितले.

कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागपुरात कॅन्सर इन्स्टिट्यूट स्थापन करण्यात यावे व एम. डी. (रेडिओथेरपी) अभ्यासक्रमाला ‘एमसीआय’ची मान्यता मिळण्यासाठी सर्व त्रुटी दूर करण्यात याव्यात अशा विनंतीसह डॉ. कांबळे यांनी दाखल केलेली जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. दरम्यान, शासनाने औरंगाबाद येथे कॅन्सर इन्स्टिट्यूट स्थापन करण्याची भूमिका घेतली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कर्करोग वेगाने वाढत आहे.

२०१२ मध्ये देशभरात ६ लाख ८२ हजार ८३० कर्करोग रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुरुषांमध्ये फुफ्फुस, तोंड, अन्न नलिका व पोटाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आहे. कर्करोगाच्या विविध प्रमाणात नागपूर हे मुंबई, पुणे व औरंगाबादच्या तुलनेत फार पुढे आहे. यामुळे नागपुरात कॅन्सर इन्स्टिट्यूटची स्थापना करणे आवश्यक आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अनिल किलोर यांनी बाजू मांडली.

एनआरएचएम कर्मचार्‍यांचा आज गोंदियात मोर्चा

0

गोंदिया दि.३: राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचार्‍यांना शासनाच्या सेवेत रिक्त पदांवर बिनशर्त समायोजनाकरिता सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून दि.३ रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता सुभाष मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात काळ्या फिती लावून काम करण्यात आले. मात्र शासनाने त्या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे दुसर्‍या टप्प्यात दि.३ ला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे.

राज्य कर्मचाèयांच्या लाक्षणिक संपाला उत्स्र्फुत प्रतिसाद

0

गोंदिया दि. २ : विविध मागण्यांना घेऊन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने आज २ सप्टेंबर रोजी देशव्यापी लाक्षणिक संप पुकारला होता.या संपाला गोंदिया जिल्ह्यातही उत्स्र्फुत प्रतिसाद मिळाला आहे.जिल्हा मुख्यालयातील सर्वच कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने जिल्हाधिकारी,जिल्हा परिषद,महाराष्ट्र राज्य़ विज वितरण कंपनी, वनविभागसह इतर शासकीय कार्यालय ओसाड पडले होते.तान्हापोळ्याचा दिवस असतानाही कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्याने सर्व कार्यालये ओसाड पडली होती.सरकारच्या कारवाईच्या धाकाला सुध्दा आंदोलनकर्ते कर्मचारी घाबरले नसल्याचे आंदोलनावरुन दिसून आले.
जिल्ह्यातील सुमारे हजारावरच्या वर कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुत्रांनी दिली. त्याचप्रमाणे तालुकास्तरावर सुध्दा कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.पंचायत समिती व तहसिल कार्यालयासमोर कर्मचारी संघटनांच्यावतीने आंदोलन करण्यात आले.तर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुध्दा धरणे आंदोलन करुन शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यात आला.गोंदिया जिल्ह्यात राज्य कर्मचारी संघटनेचे निमंत्रक लिलाधर पाथोडे,जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष पी.जी. शहारे,जी.एस.पवार,ग्रामसेवक संघटनेचे कार्तिक चव्हाण,लेखा संघटनेचे शैलेष बैस,अपंग संघटनेचे जी.जे.बिसेन,लोहबरे,अर्चना आयचित,मनिषा चौधरी,वनिता दखने,अंगनी उपरीकर,तेजेस्विनी चेटुले, नरेंद्र रामटेककर, नेवारे, गजभिये, राणे, आर.आर.मिश्रा,चर्तुथ श्रेणी कर्मचारी संघटनेचे लिलाधर तिबुडे, के.व्ही.नागफासे, संजय धार्मिक, रविंद्र नागपुरे, विठ्ठल भरणे, डॉ. एल.यु.यादव,महाराष्ट्र राज्य लिपीक वर्गीय कर्मचारी संघाचे गुणवंत ठाकूर,प्रमोद काळे,संतोष तोमर,अजय खरवडे,अभियंता संघटनेचे वासुदेव रामटेककर, प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षीत व जिल्हा सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे ,टी.टी.पटले,सुभाष खत्री,संतोष तुरकर,मनोज मानकर,विस्तार अधिकारी संघटनेचे जी.टी.सिंगनजुडे,,के.एच.चौरावार,रमेश ब्राम्हणकर,डाॅ.मुळे,फनेंद्र हरिणखेडे,संजय भाष्कर,किशोर चौरावार,आत्माराम वंजारी,डाॅ.भांडारकर,निलकंठ शिरसाठे,महेंद्र मोटघरे,सौरभ अग्रवाल, आदी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यां आंदोलनात सहभागी झाले होते.या बँदमध्ये बँकासह पोस्ट युनीयन,दुरसंचार विभाग,पाटबंधारे विभाग,लालबावटा,भारतीय कम्युनिस्टसह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.

मंगल पटले यांचे निधन

0

गोंदिया,दि.2-येथील कुडवा मार्गावरील श्यामबाबा घोडीवाले व डेकोरेशनचे संचालक मंगल पटले यांचे आज शुक्रवारला मध्यप्रदेशातील उज्जैन येथे विजेचा शाॅक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.मंगल पटले हे उज्जैन येथे लग्नसमारंभासाठी लागणारी नवी गाडी तयार करण्यासाठी गेले असता तिथे काम सुरु असताना त्यांना विजेचा शाॅक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या मृ्त्यूची माहिती गोंदिया शहरात कळताच त्यांच्या चाहत्यासह नातेवाईक व मित्रमंडळीनी त्यांच्या घरी एकच गर्दी केली होती.पवार नवयुक मंडळाचे मंगल पटले हे सक्रीय सदस्य होते.त्यांच्या निधनाबद्ल हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्यावर उद्या शनिवारी सकाळी 10 वाजता येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे.