35 C
Gondiā
Tuesday, May 7, 2024

Daily Archives: Sep 28, 2018

थकबाकीदार ग्राहकांचा जनमित्रांवर हल्ला;वर्धा आणि भंडारा येथील घटना

गोंदिया,दि. २८:- थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या जनमित्रांवर प्राणघातक हल्ला झाल्याच्या घटना समोर आल्या असून यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वर्धा येथे...

तारिक अन्वरचा राष्ट्रवादीला रामराम,पवारांच्या मोदी समर्थनाचा विरोध

नवी दिल्ली,दि.28(वृत्तसंस्था)- राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव खासदार तारिक अन्वर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, लोकसभेतल्या खासदारकीचाही राजीनामा दिला आहे. शरद पवारांनी राफेल करारावरून पंतप्रधान मोदींना...

वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी जाळे पसरविणार्‍या सहा आरोपींना अटक

गडचिरोली,दि.28ः-वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी जंगलामध्ये जाळे फसरविणार्‍या सहा आरोपींना कोनसरी वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकार्‍यांनी, कर्मचार्‍यांनी अटक केल्याची घटना  कोनसरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणार्‍या कक्ष क्रमांक १९३ मध्ये घडली. आशुतोष...

अंनिसने केला जादूटोणा व भूतबाधेसंबंधी गैरसमज दूर

नवेगावबांध(सतिश कोसरकर)दि.28ः- जादूटोणा व भूतबाधोचे कारण सांगून लोकांकडून उपचाराच्या नावावर पैसे उकळणार्‍या मांत्रिकाचा अंधर्शध्दा निर्मूलन समितीने भांडाफोड केला. जवळील ग्राम ब्राम्हणटोला येथे अनिसने हा यशस्वी...

रेती माफियांचा तहसीलदारांवर हल्ला

पवनी,दि.28ः- अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेले पवनीचे नायब तहसीलदार हेमंत कांबळे यांच्यावर रेती माफियांनी हल्ला केला. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. नायब तहसीलदार...

आजच्या केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्टच्या बंददरम्यान नागरिकांनी औषधासाठी संपर्क साधावा

वाशिम, दि.28 : ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट यांनी प्रस्तावित ई-पोर्टलवर नोंद करुन औषध खरेदी-विक्री करावी या प्रस्तावाच्या   विरोधात 28सप्टेंबर रोजी सर्व रिटेल व होलसेल औषध विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तसे प्रशासनाला या संघटनेने कळविले आहे. तथापी तातडीच्या परिस्थीतीत रुग्णांना औषधे उपलब्ध व्हावीत म्हणून महत्वाच्या दूरध्वनी क्रमांकाबाबत जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन, इंडियन मेडिकलअसोसिएशन, नॅश्नल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन यांना माहिती देण्यात आली असून वैद्यकीय व्यवसायीकांनी एक दिवस पुरेल ऐवढा औषध साठा त्यांच्याकडे उपलब्धकरण्याबाबत विनंती करण्यात आली आहे.       प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे, जेनेरिक मेडिकल स्टोअर्स, हॉस्पीटलशी संलग्न काही दुकाने व शासकीय रुग्णालयांशी संबंधित औषध दुकाने बंदमध्ये सहभागीनसल्याने त्यांना त्यांच्याकडे अतिरिक्त औषध साठा ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांना नियमितपणे लागणाऱ्याऔषधांचा साठा औषध विक्रेत्यांचा बंद सुरु होण्याआधिच त्यांच्याकडे करुन घ्यावा. जेनेकरुन गैरसोय टाळता येईल. जनतेला आवश्यक वेळेत व नियमित औषध उपलब्ध करणेहे परवाना धारकाचे, प्रशासनाचे व शासनाचे कर्तव्य आहे. औषध विक्रेत्यांच्या बंदच्या काळात औषध उपलब्धतेबाबत ग्राहकांना अन्न व औषध प्रशासन विभागाच्या 0724-2420277 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा औषध निरिक्षक तथा सहायक आयुक्त (औषधे) श्री एच. वाय. मेतकर यांच्या 9730155370 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
- Advertisment -

Most Read