राज्याने अॅट्रासिटी कायद्यात बदल करण्याच्या केंद्राला शिफारशी कराव्यात – विनायक मेटे
मनसेचा विदर्भवाद्यांची पत्रकारपरिषद उधळण्याचा प्रयत्न
१८ सप्टेंबरला नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सभा
गोंदिया: राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने येत्या १८ सप्टेंबर रोजी धनवटे नॅशनल कॉलेज नागपूरच्या सभागृहात दुपारी १ वाजता पदाधिकारी, कार्यकर्ते व विद्यार्थी अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत येत्या डिसेंबर महिन्यात नागपूर विधान भवनावर काढण्यात येणाèया मोच्र्याबद्दल चर्चा करण्यात येणार आहे. सोबतच ओबीसी महिला मेळावा, ओबीसी विद्यार्थी मेळावा, ओबीसी अधिकारी-कर्मचारी मेळावा आदी आयोजित करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनावरील मोच्र्या संदर्भात प्रत्येक जिल्हास्तरावर जाऊन ओबीसी संगठना व पदाधिकाèयांची चर्चा करण्याचे ही नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक प्राचार्य डॉ.बबनराव तायवाडे, सचिन राजूरकर, शरद वानखेडे,खे‘ेंद्र कटरे विनोद उलीपवार, भूषण दडवे, रमेश पिसे, सुषमा भड, मनोज चव्हाण, निकेश पिणे, गुणेश्वर आरीकर, गोपाल सेलोेकर आदींनी दिली आहे.
तेढवा प्रकरणातील हल्लेखोरांचा वन्यप्राण्यांच्या तस्करीत हात?
वन्यप्राण्यांचे केस जप्त : पोलीस व वनविभागाची कारवाई
महेश येळे
रावणवाडी,दि.१३ :गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत येणाèया मरारटोला (तेढवा) येथील गणेशोत्सवादरम्यान गावकèयांवर हल्ला चढविणाèया आरोपींच्या स्कार्पिओ वाहनात वन्यप्राण्यांचे केस आढळल्याने ङ्कतेङ्क वन्यप्राण्यांची तस्करीत सहभागी असावे असा संशय पोलिसांना आल्याने वनविभागाच्या मदतीने वाहनातील वन्यप्राण्यांचे सात केस जप्त केले आहे. तसेच ते केस कुठल्या प्राण्याचे आहे तपासासाठी प्रयोगशाळेला वनपरिक्षेत्राधिकारी अजय मेश्राम यांनी पाठविले असून श्वानपथकाच्या माध्यमातून शोध मोहिम हाती घेतली आहे.
आरोपी गणीखान जब्बारखान (१९)रा. न्यू लक्ष्मीनगर, गोंदिया, इमरान महफूज खान (२८) टी.बी.टोली गोंदिया, बंदे सब्बीर खान (२४)रा. रेलटोली पालचौक गोंदिया, राहूल सुनील नेवारे (२४) न्यू लक्ष्मीनगर गोंदिया, दुर्गेश लक्ष्मण विठोले (१९) रा. अंगूरबगीचा गोंदिया हे आता दुसèया प्रकणात अडकले. त्यांच्या वाहनात मिळालेले वन्यप्राण्यांचे केस काळवीटाचे असल्याची चर्चा आहे. परंतु ईदकरीता आपण बोकड आणला असून ते केस बोकडाचे असल्याचे आरोपी गणीचे म्हणणे आहे. या केसांना तपासणीसाठी हैदराबादच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. त्या अहवालानंतर ते केस कोणत्या प्राण्याचे याचा खुलासा होईल.
गोंदिया तालुक्याच्या मरारटोला तेढवा येथे सार्वजनिक गणेशोत्सवात ९ सप्टेंबर रोजी कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धेनंतर १० वाजताच्या सुमारास एक खाली टड्ढॅक्टर भरधाव वेगात गावातून धावत होता. यावेळी रस्त्यावर बालके असल्याने अपघात होऊ नये यासाठी नागरिकांनी त्या टड्ढॅक्टरच्या दिशेने धाव घेतली. मात्र टड्ढॅक्टर चालक इमरान महफूज खान याने फोन करुन सदर आरोपींना बोलाविले होते. गोंदियातील आरोपी एक पिस्तूल, दोन तलवारी व लोखंडी रॉड घेऊन रात्री १०.३० वाजता दाखल झाले. यावेळी त्यांनी गावकèयांवर हल्ला चढविला होता.
या प्रकरणातील स्कॉर्पिओ क्र.एमएच ३५ पी ८८०३, टड्ढॅक्टर एमएच ३५ एफ ४८२९ टड्ढॉली एमएच ३५, जी ८१३८ व मोटारसायकल एमएच ३५, एल ७८२३ हे तीन वाहनाही जप्त केले होते. तपासात आरोपींनी वापरलेल्या वाहनात वन्यप्राण्यांचे केस मिळाल्याने हे वन्यप्राण्यांची तस्करी करीत असावे असा संशय पोलिसांना आला. सहायक पोलीस निरीक्षक महाडिक, पोलीस निरीक्षक संजीव गावळे, पोलीस उपनिरीक्षक सतीश घुगे, लक्ष्मण किर्तणे, सहायक उपवनसंरक्षक नरेंद्र शेंडे, वनपरिक्षेत्राधिकारी आनंद मेश्राम, क्षेत्र सहायक अरुण साबळे, राजू नागपुरे यांनी श्वान पिटरच्या माध्यमातून त्या वाहनातील केसांचा सुगावा लागला.
कुंटणखाना चालविणाèया महिलेसह तिघांना अटक
भंडारा दि.१३: गरीब कुटुंबातील मुलींना हेरून त्यांना पैशाचे प्रलोभण देऊन वेश्या व्यवसाय करणाèया एका महिलेसह तिघांना पोलिसांनी अटक केली. यात नागपूरच्या २१ वर्षीय युवतीसह एका इसमाचा समावेश आहे. ही कारवाई भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांच्या भरारी पथकाने सोमवारला दुपारी २ वाजता राजगोपालाचारी वॉर्डातील झोपडपट्टी वसाहतीत केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या कारवाईत पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाèया सरीता नामक (४२) या महिलेसह नागपूरची २१ वर्षीय युवती व कोथुर्णा येथील अरविंद गुरव (३२) याला अटक केली. शहरातील राजगोपालाचारी वॉर्डातील शासकीय वसाहतीमागे असलेल्या झोपडपट्टी वसाहतीतील सरीता नामक ही महिला मागील १६ वर्षांपासून याठिकाणी वास्तव्याला आहे. पतीच्या निधनानंतर ही महिला दोन मुलांसह राहत आहे. दरम्यान, ती गरीब कुटुंबातील मुलींना हेरून त्यांना पैशाचे आमिष दाखवून स्वत:च्या झोपडीवजा घरातच तिने कुंटनखाना सुरू केला होता. याठिकाणी ती वेश्या व्यवसाय करीत होती. या महिलेच्या संपर्कात नागपूर येथीलही तरूणी आहेत. संपर्कातील मुलींना बोलावून दलाली करीत होती.
वॉर्डातील वेश्या व्यवसायामुळे परिसरातील नागरिकांना नानाविध त्रासांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे हा प्रकार बंद करण्याची तिला अनेकांनी तंबी दिली. मात्र, तिने त्याकडे दुर्लक्ष करून हा प्रकार सुरूच ठेवला. त्यामुळे वॉर्डातील नागरिकांनी याची दोन महिन्यापूर्वी भंडारा पोलिसात तक्रार दिली होती. परंतु पोलीस येईपर्यंत त्यांना कुणी सापडत नव्हता. त्यामुळे मागावर असलेल्या लोकांनी एक मुलगी व दोन मुले या घरात जात असताना दिसताच पोलिसांना सांगितले. पोलिसांचा ताफा पोहोचण्यापूर्वी एक तरूण निघून गेला होता. दुसरा तरूण, एक मुलगी व कुंटणखाना चालविणारी महिला सापडली.
याप्रकरणी भंडारा पोलिसांनी सदर महिला, तरुणी व त्या इसमाविरूद्ध गुन्हा नोंदविला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बंडीवार, मिलींद कोटगले, सुरज शिंदे, रेहान खान, प्रदीप गरडे, हरिशाम केंद्रे, शमा शेख यांनी केली.
गोंदिया जिल्ह्यात होणार दोन हजार विहिरींचे बांधकाम-पालकमंत्री बडोले
शासन आदेश जारी : प्रतिविहीर मिळणार २.५० लाख अनुदान
१ डिसेंबर ते १४ फेबुवारीला होणार पर्यटनमहोस्व
berartimes.comगोंदिया,दि.१३: पूर्व विदर्भातील जिल्ह्यामध्ये शेततळ्यांना मिळालेला अल्प प्रतिसाद आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर शासनाने विहिरींचे कमी प्रमाण आणि पाण्याची पातळी लक्षात घेता शेततळ्यांऐवजी जास्तीत जास्त सिंचन विहिरी तयार करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारला झालेल्या नागपूर येथील आढावा बैठकित घेत ११ सप्टेंबरला त्यासंदर्भातील शासन आदेश जारी केला. यात नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ११ हजार विहिरी तयार करण्याचे लक्ष्य असून गोंदिया जिल्ह्यासाठी २ हजार विहिरीचे लक्ष्य ठेवण्यात आल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.सोबतच येत्या १ डिसेंबर ते १४ फेबुवारीपर्यंत जिल्ह्यात पर्यटनमहोत्सवाचे आयोजन होणार असून याच काळात तीन दिवसाचे गोंदिया महोत्सव सुध्दा आयोजित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.सोबतच येत्या ३१ मार्चपर्यंत जिल्हा हागंणदारीमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला १२ हजार रुपये ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांना शौचालय बांधकामासाठी उपलब्ध होणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी सांगितले.
अनियमित व अपुèया पावसामुळे गेल्या काही वर्षात दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. याचा विपरित परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासनाकडून २००० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येईल, असे शासनाने २०१५ च्या हिवाळी अधिवेशनात जाहीर केले होते. त्याच कालावधीत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विधानभवनात विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या आढावा बैठका घेतल्या होत्या. त्याच्या इतवृत्तांतावर कार्यवाहीबाबतचा आढावा घेताना पूर्व विदर्भातील जिल्ह्यात भूगर्भात पाण्याची उपलब्धता असूनही विहिरींची संख्या कमी असल्याने सिंचनाची सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांना दिसले. त्यानुसार शेततळी देण्याऐवजी सिंचन विहिरी देण्याचे सुचविण्यात आले. ११ सप्टेंबरला यासंदर्भातील बैठकीत शिक्कामोर्तब करून शासन आदेश काढण्यात आला. या सिंचन विहिरींसाठी लागणारा निधी मदत व पुनर्वसन विभागांतर्गत दृष्काळ निवारण उपाययोजनेतून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. शासन निर्णयानुसार नागपूर विभागातील गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक ४५०० विहिरींची निर्मिती केली जाणार आहे. त्याखालोखाल चंद्रपूर जिल्ह्यात ३०००, गोंदिया जिल्ह्यात २०००, भंडारा १००० तर नागपूर जिल्ह्यात ५०० विहिरी अशा ५ जिल्ह्यात ११,००० विहिरी बांधल्या जाणार आहेत. सिंचन विहिरींसाठी प्रति लाभार्थी २.५० लाख रुपये मिळणार आहेत. ही रक्कम विहिर बांधकामाच्या टप्प्याटप्प्यानुसार दिली जाईल. विहिरीसाठी अर्ज करणाèया शेतकèयाकडे किमान ०.६० हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेनुसार जमीन विहिरीसाठी तांत्रिकदृष्ट्या पात्र असावी, तसेच यापूर्वी अर्जदाराने शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचर, बोडी व विहीर या घटकांचा शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा.
समाजकल्याण विभागाचे लेखणीबंद आंदोलन
गोंदिया : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व विविध मागण्यांना घेवून सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने सोमवार(दि.१२) पासून लेखणीबंद आंदोलन सुरू केले. शासनाने नियुक्त केलेल्या एसआयटीला आणि त्यांच्या कारवाईला विरोध दर्शविण्यासोबतच इतर मागण्यांसाठी हे लेखणीबंद आंदोलन राज्यभर सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांची कामे होऊ शकली नाही. वसतिगृहातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया बंद राहीली. विद्यार्थ्याच्या सोयीसुविधेवर परिणाम झाला असून जात पडताळणी प्रमाणपत्र तयार करण्याचे काम बंद राहीले. तसेच शिष्यवृत्तीचे काम होऊ शकले नाही.
मागण्यांमध्ये भारत सरकार मेट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क तसेच इतर सर्व योजनांचा फेरआढावा घेवून कामाची व्याप्ती पाहून अधिक मनुष्यबळाची नियुक्ती करावी. शिष्यवृत्ती योजनेत केंद्र शासनाची अधिसूचना, राज्य शासन निर्णय आणि आयुक्तालयाचे परिपत्रक यामध्ये तफावत असल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. सुधारीत शासन निर्णय तत्काळ काढण्यात यावे, शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्काचे प्रदान, एसआयटीमार्फत होत असलेल्या चौकशीत सामाजिक न्याय विभागाच्या कर्मचारी, अधिकार्यांच्या छळ करण्यात येत आहे ते थांबविण्यात यावे, गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात यावी, संस्थाचालक व संबंधित अधिकारी यांचे मत मांडण्यासाठी नैसर्गिक न्यायाची संधी द्यावी, अनियमितता आढळल्यास अतिप्रदानाची रक्कम संबंधित संस्थेकडून वसुलीची कार्यवाही करण्यात यावी, मागासवर्गीय विद्यार्थी, संस्था आणि अधिकारी यांचा छळ होणार नाही याची खबरदारी घ्यावी, सामाजिक न्याय विभागासाठी क्षेत्रिय कार्यालयांना अधिकारी कर्मचारी पदसंख्येच्या सुधारित आकृतिबंद मंजूर करण्यात यावा, तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रस्ताव निकाली काढावा, सामाजिक न्याय विभागातील ४0 टक्के जागा रिक्त असल्याने कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचार्यांवर कामाचा ताण पडत आहे, सरळ सेवेने पदे तत्काळ भरण्यात यावी, जिल्हास्तरावरील जात पडताळणी समितीचे गठण करण्यात यावे, प्रादेशिक उपायुक्त हे पद सहआयुक्त दर्जाचे करण्यात यावे, तीन वर्षाचा सहआयुक्त म्हणून अनुभव असलेल्या व्यक्तीला जात पडताळणी प्रमाणपत्राच्या समितीचे अध्यक्ष म्हणून नेमावे तर उपायुक्त दर्जाच्या अधिकार्यांना पाच वर्षाचा अनुभव असल्यास त्यांना पात्र समजण्यात यावे अशा विविध मागण्यांना घेवून १ सप्टेंबरपासून ११ सप्टेंबरपर्यंत काळ्या फितीलावून काम करण्यात आल्या. परंतु आजपासून लेखनी बंद आंदोलन पुकारण्यात आले.
या आंदोलनात सहायक आयुक्त प्रभाकर निकोडे, वानखेडे, विशाल कळमकर, राजेश निखोले, अजय वावणे, मनोहर सोनटक्के, राहुल राठोड, राजेश मेश्राम, राजेश नागुलवार, रामसिंग जाधव, समिक्षा दुधलकर, योगेश कडव, अनिल बोडे व इतर कर्मचार्यांचा आंदोलनात सहभाग होता. जिल्ह्यातील १00 कर्मचारी या लेखनीबंद आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन शासनाच्या नावे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
पुराच्या पाण्यातूनच ते घराकडे निघाले
ऍट्रॉसीटी ऍक्टचे संरक्षण ओबीसी-बलुतेदार जातींनाही मिळावे!-प्रा. देवरेची मागणी
नाशिकः- ‘‘ दलित व आदिवासींवरील जातीय अन्याय अत्याचार रोखण्यासाठी ‘ऍट्रॉसिटी विरोधी कायदा’ करण्यात आला आहे. पुर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातींच्या व आदिवासींच्या संरक्षणासाठी हा कायदा वापरण्यात येतो. परंतू गावगाड्यातील अस्पृश्य नसलेल्या न्हावी, धोबी, कुंभार, सुतार, पिंजारा, वडार, मनियार यासारख्या सर्व धर्मातील कनिष्ठ व अल्पसंख्य बलुतेदार-ओबीसी जातींवरही मोठ्या प्रमाणात जातीय अत्याचार होत असतात. म्हणून या जातींच्या संरक्षणासाठी ऍट्रॉसिटी ऍक्ट चा विस्तार करावा’’, अशी मागणी ओबीसी संघटनेचे अध्यक्ष प्रा. श्रावण देवरे यांनी आज एका पत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, ‘गावाकडील बलुतेदार जाती आजही दयनीय अवस्थेत जगत आहेत. औद्योगिकरणामुळे त्यांचे रोजी-रोटीचे व्यवसाय नष्ट झाले असून ओबीसींसाठी असलेले आरक्षणही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यांच्या या असहाय व लाचार परिस्थीतीचा गैरफायदा घेत गावातील धनदांडगे व जातदांडगे त्यांना अत्यंत हीन व अमानास्पद वागणूक देतात. जातीवाचक अपशब्द वापरून वारंवार मानहानी करतात. या सर्वधर्मीय अल्पसंख्य व कनिष्ठ बलुतेदार-ओबीसी जातींवर होणार्या अन्याय-अत्याचारांना रोखण्यासाठी ऍट्रॉसिटी ऍक्ट चा विस्तार होणे गरजेचे आहे’, असे स्पष्टीकरणही प्रा. देवरे यांनी या पत्रकात केले आहे.
‘शिक्षणाच्या प्रचार-प्रसारामुळे सर्व जाती शहाण्या होतील व जातीय द्वेष नष्ट होईल, अशी रास्त अपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केली होती. तसेच स्वातंत्र्यानंतरच्या राज्यकर्त्या जाती आपला शाहू महाराजांचा व सयाजीरावांचा पुरोगामी वारसा चालू ठेवतील, या विश्वासापोटी बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना बनवितांना ऍट्रॉसिटी ऍक्टचा समावेश केला नाही. मात्र राज्यकर्त्या जातींनी प्रत्यक्ष व्यवहारात बाबासाहेबांच्या या विश्वासाला तडा देण्याचेच काम केले. जातीय अन्याय-अत्याचाराची परिसीमा झाल्यावर 9 सप्टेंबर 1989 रोजी तत्कालीन पुरोगामी प्रधानमंत्री व्हि.पी. सिंगांनी दलित व अदिवासी जाती-जमातींच्या संरक्षणासाठी जातीय अत्याचार विरोधी कायदा म्हणून ऍट्रॉसिटी विरोधी ऍक्ट लागू केला. माजी प्रधानमंत्री व्ही. पी. सिंग हे छत्रपती शिवरायांचे सच्चे वारसदार असल्यानेच ते ऍट्रॉसिटी ऍक्ट लागू करण्याचे काम करू शकले. आज व्ही. पी. सिंग प्रधानमंत्री राहीले असते तर या जातीय अत्याचारविरोधी कायद्याचे संरक्षण बलुतेदार-ओबीसी जातींनाही मिळाले असते.
‘बदलत्या परिस्थीतीत हा कायदा अधिक मजबूत करण्यासाठी त्यातील काही तरतुदी बदलल्या पाहिजेत व काही नव्याने समाविष्ट करण्याची गरज आहे. यासाठी शासनाने दलित व ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची व्यापक बैठक बोलववावी’ असे आवाहनही पत्रकात करण्यात आले आहे.
व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार १७ सप्टेबरपर्यंत प्रस्ताव
गोंदिया,दि.१२ : व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा, संस्थांचा गौरव करण्यासाठी तसेच व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करीत असलेल्या कार्यकर्ते व संस्थांच्या कार्याला दाद देण्यासाठी व इतर कार्यकर्त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी ज्यामुळे व्यसनमुक्ती कार्याच्या उत्थानासाठी कार्यकर्त सरसावून पुढे येतील व व्यसनमुक्ती प्रचार कार्याचा दर्जा वाढवितांना सर्वसमावेशकता निर्माण करण्यासाठी त्यांच्या कार्याची दखल घेवून राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीला १५ हजार रुपये व संस्थेला ३० हजार रुपये तसेच सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ पुरस्काराने गौरविण्यात येईल. व्यसनमुक्ती कार्यकर्त्यासाठी लेखक, कवी, पत्रकार/संपादक व साहित्यिक यांना प्रत्येकी एक असे पाच पुरस्कार, सामाजिक कार्यकर्त्यांना दहा पुरस्कार, किर्तनकार, प्रवचनकार चार पुरस्कार, पारंपारीक लोककला उदा.शाहीर, गोंधळी, भारुडकार, पोतराज, वासुदेव, लोकनाट्यकार यांना प्रत्येकी एक असे सहा पुरस्कार, शासकीय अधिकारी/कर्मचारी, निमशासकीय अधिकारी/कर्मचारी असे तीन पुरस्कार. सामाजिक सेवाभावी संस्थांसाठी उदा. सेवाभावी संस्था तीन पुरस्कार, युवक मंडळे, महिला मंडळे, भजनी मंडळे, बचतगट व क्रीडा मंडळे यांना तीन पुरस्कार, शाळा व महाविद्यालयासाठी प्रत्येकी एक असे तीन पुरस्कार. मिडिया उदा.वृत्तपत्रांना (हिंदी,इंग्रजी व मराठी) प्रत्येकी एक असे तीन पुरस्कार, इलेक्ट्रॉनिक मिडिया यांना दोन पुरस्कार. उद्योग कारखाने यांना तीन, उद्योग व्यवस्थापन यांना तीन व मजूर संघटना यांना तीन पुरस्कार. असे विविध गटातून एकूण ५१ पुरस्कारासाठी व्यसनमुक्ती क्षेत्रात भरीव व मौलिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांकडून शिफारसी व कागदपत्रासह प्रस्ताव मागविण्यात येत आहे.
व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक/भरीव कार्य करणारी व्यक्ती/संस्था असावी. व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी वयाची अट नाही. या क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती/संस्था राज्यात कार्यरत असावी. या पुरस्कारासाठी व्यक्ती/राज्य/जिल्हा/तालुका पातळीवर किमान १५ वर्ष व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य केलेले असावे. . या पुरस्कारासाठी एकापेक्षा अधिक वेळा पात्र समजण्यात येणार नाही. व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणारे खासदार, आमदार, नगरसेवक, जि.प.सदस्य किंवा इतर कोणतेही लोकप्रतिनिधी या पुरस्कारासाठी पात्र राहतील. संस्था नोंदणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. संस्था किमान १५ वर्ष जुनी असावी. संस्थेने किमान १० वर्ष व्यसनमुक्ती क्षेत्रात अधिक कार्य केलेले असावे. संस्थेने मागील पाच वर्षात लेखा अहवाल/वार्षिक अहवाल जोडणे आवश्यक आहे. या पुरस्कारासाठी विविध अर्जाचे नमूने जिल्हा समाज कल्याण अधिकारी जि.प.गोंदिया या कार्यालयात १७ सप्टेबरपर्यंत सादर करावे. असे आवाहन प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलिंद रामटेके यांनी केले आहे.