कुंटणखाना चालविणाèया महिलेसह तिघांना अटक

0
21

भंडारा दि.१३: गरीब कुटुंबातील मुलींना हेरून त्यांना पैशाचे प्रलोभण देऊन वेश्या व्यवसाय करणाèया एका महिलेसह तिघांना पोलिसांनी अटक केली. यात नागपूरच्या २१ वर्षीय युवतीसह एका इसमाचा समावेश आहे. ही कारवाई भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांच्या भरारी पथकाने सोमवारला दुपारी २ वाजता राजगोपालाचारी वॉर्डातील झोपडपट्टी वसाहतीत केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या कारवाईत पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाèया सरीता नामक (४२) या महिलेसह नागपूरची २१ वर्षीय युवती व कोथुर्णा येथील अरविंद गुरव (३२) याला अटक केली. शहरातील राजगोपालाचारी वॉर्डातील शासकीय वसाहतीमागे असलेल्या झोपडपट्टी वसाहतीतील सरीता नामक ही महिला मागील १६ वर्षांपासून याठिकाणी वास्तव्याला आहे. पतीच्या निधनानंतर ही महिला दोन मुलांसह राहत आहे. दरम्यान, ती गरीब कुटुंबातील मुलींना हेरून त्यांना पैशाचे आमिष दाखवून स्वत:च्या झोपडीवजा घरातच तिने कुंटनखाना सुरू केला होता. याठिकाणी ती वेश्या व्यवसाय करीत होती. या महिलेच्या संपर्कात नागपूर येथीलही तरूणी आहेत. संपर्कातील मुलींना बोलावून दलाली करीत होती.
वॉर्डातील वेश्या व्यवसायामुळे परिसरातील नागरिकांना नानाविध त्रासांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे हा प्रकार बंद करण्याची तिला अनेकांनी तंबी दिली. मात्र, तिने त्याकडे दुर्लक्ष करून हा प्रकार सुरूच ठेवला. त्यामुळे वॉर्डातील नागरिकांनी याची दोन महिन्यापूर्वी भंडारा पोलिसात तक्रार दिली होती. परंतु पोलीस येईपर्यंत त्यांना कुणी सापडत नव्हता. त्यामुळे मागावर असलेल्या लोकांनी एक मुलगी व दोन मुले या घरात जात असताना दिसताच पोलिसांना सांगितले. पोलिसांचा ताफा पोहोचण्यापूर्वी एक तरूण निघून गेला होता. दुसरा तरूण, एक मुलगी व कुंटणखाना चालविणारी महिला सापडली.
याप्रकरणी भंडारा पोलिसांनी सदर महिला, तरुणी व त्या इसमाविरूद्ध गुन्हा नोंदविला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बंडीवार, मिलींद कोटगले, सुरज शिंदे, रेहान खान, प्रदीप गरडे, हरिशाम केंद्रे, शमा शेख यांनी केली.