तेढवा प्रकरणातील हल्लेखोरांचा वन्यप्राण्यांच्या तस्करीत हात?

0
16

वन्यप्राण्यांचे केस जप्त : पोलीस व वनविभागाची कारवाई
महेश येळे
रावणवाडी,दि.१३ :गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत येणाèया मरारटोला (तेढवा) येथील गणेशोत्सवादरम्यान गावकèयांवर हल्ला चढविणाèया आरोपींच्या स्कार्पिओ वाहनात वन्यप्राण्यांचे केस आढळल्याने ङ्कतेङ्क वन्यप्राण्यांची तस्करीत सहभागी असावे असा संशय पोलिसांना आल्याने वनविभागाच्या मदतीने वाहनातील वन्यप्राण्यांचे सात केस जप्त केले आहे. तसेच ते केस कुठल्या प्राण्याचे आहे तपासासाठी प्रयोगशाळेला वनपरिक्षेत्राधिकारी अजय मेश्राम यांनी पाठविले असून श्वानपथकाच्या माध्यमातून शोध मोहिम हाती घेतली आहे.
आरोपी गणीखान जब्बारखान (१९)रा. न्यू लक्ष्मीनगर, गोंदिया, इमरान महफूज खान (२८) टी.बी.टोली गोंदिया, बंदे सब्बीर खान (२४)रा. रेलटोली पालचौक गोंदिया, राहूल सुनील नेवारे (२४) न्यू लक्ष्मीनगर गोंदिया, दुर्गेश लक्ष्मण विठोले (१९) रा. अंगूरबगीचा गोंदिया हे आता दुसèया प्रकणात अडकले. त्यांच्या वाहनात मिळालेले वन्यप्राण्यांचे केस काळवीटाचे असल्याची चर्चा आहे. परंतु ईदकरीता आपण बोकड आणला असून ते केस बोकडाचे असल्याचे आरोपी गणीचे म्हणणे आहे. या केसांना तपासणीसाठी हैदराबादच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. त्या अहवालानंतर ते केस कोणत्या प्राण्याचे याचा खुलासा होईल.
गोंदिया तालुक्याच्या मरारटोला तेढवा येथे सार्वजनिक गणेशोत्सवात ९ सप्टेंबर रोजी कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धेनंतर १० वाजताच्या सुमारास एक खाली टड्ढॅक्टर भरधाव वेगात गावातून धावत होता. यावेळी रस्त्यावर बालके असल्याने अपघात होऊ नये यासाठी नागरिकांनी त्या टड्ढॅक्टरच्या दिशेने धाव घेतली. मात्र टड्ढॅक्टर चालक इमरान महफूज खान याने फोन करुन सदर आरोपींना बोलाविले होते. गोंदियातील आरोपी एक पिस्तूल, दोन तलवारी व लोखंडी रॉड घेऊन रात्री १०.३० वाजता दाखल झाले. यावेळी त्यांनी गावकèयांवर हल्ला चढविला होता.
या प्रकरणातील स्कॉर्पिओ क्र.एमएच ३५ पी ८८०३, टड्ढॅक्टर एमएच ३५ एफ ४८२९ टड्ढॉली एमएच ३५, जी ८१३८ व मोटारसायकल एमएच ३५, एल ७८२३ हे तीन वाहनाही जप्त केले होते. तपासात आरोपींनी वापरलेल्या वाहनात वन्यप्राण्यांचे केस मिळाल्याने हे वन्यप्राण्यांची तस्करी करीत असावे असा संशय पोलिसांना आला. सहायक पोलीस निरीक्षक महाडिक, पोलीस निरीक्षक संजीव गावळे, पोलीस उपनिरीक्षक सतीश घुगे, लक्ष्मण किर्तणे, सहायक उपवनसंरक्षक नरेंद्र शेंडे, वनपरिक्षेत्राधिकारी आनंद मेश्राम, क्षेत्र सहायक अरुण साबळे, राजू नागपुरे यांनी श्वान पिटरच्या माध्यमातून त्या वाहनातील केसांचा सुगावा लागला.