नवी दिल्ली, 8 : दिक्षा भूमी, ड्रॅगन पॅलेस आणि चिंचोली या
भागांना जोडणारा नागपुरात प्रस्तावीत असलेल्या बुध्दिस्ट सर्कीटसाठी
केंद्र शासनाच्या ‘स्वदेश दर्शन योजने’तून 100 कोटींचा निधी देण्यात
येणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन राज्य मंत्री डॉ. महेश शर्मा
यांनी दिली.
परिवहन भवन येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी
मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बुध्दिस्ट सर्कीट संदर्भात
बैठक झाली. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा, महाराष्ट्राचे
पर्यटनमंत्री जयकुमार रावल, उर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांच्यासह केंद्र व
राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकरी यावेळी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह धर्मांतर केलेले
नागपुरातील दिक्षा भूमी हे ठिकाण, जपानीस्थापत्य शैलीवर आधारीत
नागपुर-कामठी मार्गावरील ड्रॅगन पॅलेस आणि नागपूर परिसरातील डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूंचे संग्रहालय असलेले चिंचोली यांना
जोडण्यासाठी बुध्दीस्ट सर्कीट उभारण्यात येणार आहे. नागपुरात
देश-विदेशातून येणारे पर्यटक व बुध्द धर्माचे अनुयायी यांना दिक्षा भूमी,
ड्रॅगन पॅलेस आणि चिंचोलीला सुलभरित्या भेट देता यावी यासाठी ही योजना
तयार करण्यात आली आहे. बुध्दीस्ट सर्कीटसाठी राज्य सरकार आर्थिक मदत
करणार असून केंद्र शासनानेही या प्रकल्पास मदत करावी अशी मागणी यावेळी
राज्यशासनाच्यावतीने करण्यात आली. ही मागणी मान्य करत डॉ. महेश शर्मा
यांनी पर्यटन मंत्रालयाच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेअंतर्गत बुध्दिस्ट
सर्कीटसाठी 100 कोटींचा निधी देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने दि. 21 ते 23 सप्टेंबर
2016 दरम्यान आयोजित करण्यात येणा-या ‘अतुल्य भारत गुंतवणूक परिषदेत’
महाराष्ट्र शासनाच्यावतीने बुध्दिस्ट सर्कीटबाबत मांडणी करावी.त्यामुळे
परदेशी कंपन्यांकडूनही आर्थिक मदत मिळेल अशी सूचनाही डॉ. महेश शर्मा
यांनी यावेळी केली.
नागपुरातील बुध्दिस्ट सर्कीटसाठी केंद्र शासन देणार 100 कोटी- डॉ. महेश शर्मा
शाळांमध्ये वाचन-आनंद उपक्रमात विद्यार्थांचा सहभाग
गोंदिया,दि.8- राज्य शासनाने डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती १५ ऑक्टोबर २0१६ रोजी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्याच्या निर्णय घेतला आहे.त्याची पूर्वतयारी व राज्यासाठी एक पथदश्री प्रकल्प म्हणून शिक्षण विभागातर्फे आज ८ सप्टेंबरला जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून वाचन-आनंद दिवस (दफ्तरविरहित दिवस) जिल्हा परिषदेसह खासगी शाळांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.या उपक्रमाला चांगला प्रतिसाद शाळांनी दिला.पंचायत समिती सभापतीपासून केंद्रप्रमुख आणि शिक्षण विभागातील अधिकारी यांनी शाळांना भेटी देऊन उपक्रमाची माहिती घेतली.गोरेगाव तालु्क्यातील मोहगाव(बु.)येथील परशुराम विद्यालयातही केंद्रप्रमुख भगत यांच्या उपस्थितीत वाचन-आनंद दिवस साजरा करण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी.डब्लू.कटरे,सहाय्यक शिक्षक डी.डी.चौरागडे,पी.एम.चुटे,कु.भारती बिसेन(कटरे),बी.सी.गजभिये,टि.एफ.इळपाचे,व्ही.एस.मेश्राम,एल.वाय.पटले,पी.व्ही.पारधी,मुन्ना पारधी,दिनेश बोपचे विद्यार्थी उपस्थित होते.शाळेतील सुमारे 200 विद्यार्थांनी यात सहभाग घेतला.प्रत्येकांने 10 पुस्तकाच्या जवळपास वाचन केले आहे.एका पुस्तकातील 16 पानाचे वाचन म्हणजे 1 पुस्तक असा नियम शिक्षण विभागाने तयार करुन दिला होता.यावेळी केंद्रप्रमुख भगत यांनी विद्यार्थांना दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी दोन विद्यार्थ्यांनी मिळून अर्धे अर्धे पुस्तके घेऊन आल्यास ओझे कमी होईल असे सांगितले.
जिल्ह्यातील २ लाख ६0 हजार विद्यार्थी प्रती विद्यार्थी किमान १0 पुस्तके या प्रमाणे २६ लक्ष पुस्तकांचे वाचन करतील असे नियोजन करण्यात आले होते. कोणीही विद्यार्थी शाळेत दफ्तर घेऊन येणार नाही. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना चित्रमय पुस्तके पुरविण्यात आली होती. शाळेत पुस्तक प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. गोंदिया तालुक्यातील उच्चप्राथमिक जिल्हा परिषद शाळा पांढराबोडी,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंगपूरा,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मरारटोला येथेही वाचन आनंद दिवस अंतर्गत विद्यार्थीनी ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन केले.
महिला व बालकल्याण सभापतींने म्हटले जि.प.सदस्याला ”गेटआऊट”
सभेत प्रश्न विचारणाèया राष्ट्रवादीच्या महिला सभासदांना अपमानित करून सभागृहाबाहेर हाकलले
गोंदिया,दि.8- गोंदिया जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या आज गुरुवारला तहकुब मासिक सभेत राष्ट्रवादीच्या महिला सदस्याने सभेच्या आयोजनावरून मुद्दा उपस्थित केल्याचा राग म्हणून सभापती विमल नागपुरे यांनी त्या सदस्याला सभागृहाबाहेर हाकलले. परिणामी, राष्ट्रवादीच्या महिला सदस्यांनी या प्रकरणाची तक्रार केल्याने जि.प. अध्यक्ष यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्नसुद्धा नागपुरे यांनी धुडकावून लावल्याने जि.प. परिसरात तणावाचे वातावरण पसरले.तर महिला बालकल्याण सभापती यांनी आपण असे बोललो नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
सविस्तर असे की, जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागाची मासिक सभा गेल्या २६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. ती सभा जन्माष्टमीनिमित्ताने वेळेवर तहकूब करण्यात आली.ती तहकुब सभा ही सात दिवसांच्या आत आयोजित करणे नियमान्वये आवश्यक होते. मात्र, सभापतींनी आपल्या प्रभावाचा गैरवापर करून ही सभा आज दि. ८ रोजी दुपारी 1 वाजता आयोजित केली होती. सदस्यांना दिलेल्या नोटीसमध्येही सभेची वेळ १ वाजता असल्याची माहिती जि.प.सदस्य खुशबू टेंभरे,ललीचा चौरागडे व सुनिता मडावी यांनी बेरार टाईम्सला दिली.परंतु, सभेची वेळ बदलवून वेळेवर सकाळी 11 वाजताची करुन सदस्यांना फोन करून सदर सभेची वेळ बदलून ११ ठेवल्याचे सांगण्यात आले.या प्रश्नाला घेऊन राष्ट्रवादीच्या कुडवा जि.प. क्षेत्राच्या सदस्या खुशबू टेंभरे यांनी सभेचे सदस्य सचिव असलेले महिला बालविकास अधिकारी अंबादे यांना सभेची वेळ का बदलली असा प्रश्न विचारताच सभापती श्रीमती नागपुरे या श्रीमती टेंभरे यांच्यावर चांगल्याच भडकल्या. तुम्हाला काहीही विचारण्याचा अधिकार नाही,सभेला सुरवात करा आणि अधिकार्यांना सुध्दा तुम्हाला काही सांगायची गरज नाही असे म्हणत आपणास गेट आऊट म्हटल्याचे श्रीमती टेंभरे यांनी सांगितले. अधिकारी,कर्मचारी व समिती सदस्यांसमोर अपमानास्पद भाषेचा वापर करुन आपणास अपमानित करीत अधिकाराचा हनन केल्याची तक्रार विभागीय आयुक्तांना लेखी स्वरुपात पाठविली.त्या अगोदर राष्ट्रवादी काँँग्रेसच्या महिला सदस्यानी महिला बालकल्याण समितीच्या सभेचा बहिष्कार करीत जि.प.अध्यक्ष श्रीमती उषा मेंढे यांचे कार्यालय गाठले.त्यावेळी खुशबू टेंभरे,ललीता चौरागडे,सुनिता मडावी व वीणा बिसेन यांनी जि.प अध्यक्षांना झालेल्या प्रकाराची सविस्तर माहिती दिली.यावेळी काँग्रेसचे काही जि.प.सदस्यही उपस्थित होते.
त्यामुळे अध्यक्षांनी महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती यांच्याकक्षाकडे स्वत जाऊन झालेल्या प्रकरणाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.परंतु, सभापती त्यांचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे समोर आले.अध्यक्षांनाच सभापतींनी सदर सदस्या या बैठकीसाठी बनूनठणून आल्याचे सांगितल्याचे श्रीमती टेंभरे यांनी सांगितले.अध्यक्ष श्रीमती मेंढे यांनी मात्र प्रकरण शांत करण्यासाठी प्रयत्न केले,परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.आरोग्य व शिक्षण सभापती पी.जी.कटरे यांनीही समाधानकारक मार्ग काढण्याबाबत सदस्यांची अध्यक्षांच्या कक्षात चर्चा केली. उल्लेखनीय म्हणजे विरोधी पक्षाचे गटनेते गंगाधर परशुरामकर यांचाही एका साधारण सभेत नागपुरे यांनी एकदा पाणउतारा केल्याचे स्वत परशुरामकर यांनी बेरारटाईम्सला सांगितले.राष्ट्रवादीचे जि.प.सदस्य कुंदन कटारे यांनीही सदर प्रकरण योग्य नसल्याची प्रतिक्रिया दिली. प्राप्त माहितीनुसार, महिला व बालकल्याण विभागामार्फत सायकल व अलमारी खरेदी प्रकरणात सभापतींचे नातेवाइकांच्या असलेल्या हितसंबंधीविषयी सर्व सदस्यांत नाराजीचा सूर असल्याचे बोलले जाते. त्याचा राग सभापतीनी राष्ट्रवादीच्या सदस्यांवर काढल्याची चर्चा आहे.
गोंदिया जिल्हा बँकेच्या व्यवहाराची चौकशी करा
हायकोर्टाचा आदेश : विभागीय सहनिबंधकांकडे जबाबदारी
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आर्थिक अफरातफरीच्या आरोपाची दखल घेऊन गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवहाराची तीन महिन्यांत चौकशी पूर्ण करण्याचा आदेश नागपूर विभागीय सहनिबंधक (लेखा) यांना दिला आहे. चौकशीत गैरप्रकार आढळून आल्यास दोषी व्यक्तींवर योग्य कारवाई होण्यासाठी सक्षम प्राधिकरणाकडे अहवाल सादर करावा असे सहनिबंधकांना सांगण्यात आले आहे.
न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी हा आदेश देऊन संबंधित जनहित याचिका निकाली काढली आहे. यासंदर्भात महेशकुमार अग्रवाल व जगदीशप्रसाद अग्रवाल यांनी याचिका दाखल केली होती. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभाजन होऊन गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अस्तित्वात आली.बँकेच्या मुख्यालयासाठी जमीन खरेदी करण्यास मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी १७ ऑगस्ट २00९ रोजी हिरवी झेंडी दाखविली. यानंतर अर्जुनी मोरगाव येथील गंगादेवी अग्रवाल यांची जमीन २ कोटी २ लाख ५0 हजार रुपयांत खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यावेळच्या बाजारभावानुसार या जमिनीची किंमत केवळ २१ लाख २१ हजार रुपये होती. असे असताना अधिक किंमत मोजून जमीन खरेदी करण्यात आली. या व्यवहारात १ कोटी ९४ लाख रुपयांची अफरातफर झाली. यासंदर्भात २५ जून २0१४ रोजी सहकार विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. विभागीय सहनिबंधकांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते.
केजरीवालांना महिलांनी दाखविल्या बांगड्या
वृत्तसंस्था
नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री व अरविंद केजरीवाल यांना आज (गुरुवार) सकाळी दिल्ली रेल्वे स्थानकावर भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी घेराव करण्याचा प्रयत्न करत बांगड्या दाखविल्या. केजरीवाल यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
दिल्लीतील मंत्री संदीप कुमार हे सेक्स व्हिडिओ क्लिपमध्ये दिसल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. चार दिवसांसाठी पंजाब दौऱ्यासाठी केजरीवाल रवाना होत असताना, महिलांकडून आंदोलन करण्यात आले. केजरीवाल हाय हाय, अशा घोषणा महिलांकडून देण्यात आल्या.
महिलांनी केजरीवाल यांना घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. या आंदोलनानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांनी दिल्ली पोलिस आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे.
केवळ हिंदू धर्मालाच लक्ष्य का करता?- हायकोर्ट
नागपूर, दि. 8 – एक याचिकाकर्ता वारंवार केवळ हिंदू धर्माशी संबंधित गोष्टींनाच विरोध करीत असल्याचे पाहून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. तुमचा उद्देश प्रामाणिक आहे तर, तुम्ही केवळ हिंदू धर्मालाच लक्ष्य का करता, इतर धर्मांतील गोष्टींना विरोध का करीत नाही, असा सवाल न्यायालयाने संबंधित याचिकाकर्त्याला विचारला. याचे समाधानकारक उत्तर याचिकाकर्त्याला देता आले नाही.
न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष हे प्रकरण सुनावणीसाठी आले होते. भारताचा सर्वधर्मसमभाव व माणवतेवर विश्वास आहे. येथील प्रत्येक नागरिकाने स्वत:च्या धर्मासह इतरांच्या धर्मांचाही आदर केला पाहिजे. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला स्वत:च्या धार्मिक परंपरा व प्रथेचे पालन करण्याचे आणि उपासना करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. अशा परिस्थितीत केवळ हिंदू धर्मालाच लक्ष्य करण्यात काहीच तथ्य दिसून येत नाही असे मौखिक मत न्यायालयाने नोंदविले.
जनार्दन मून असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते नागरी हक्क संरक्षण मंचाचे केंद्रीय अध्यक्ष आहेत. लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांनी दिलेल्या स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या घोषणेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. शासनाने घोषणेचे शताब्दी वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान व लोकमान्य उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत गणेशोत्सव सजावट स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाव – बेटी पढाव, दारुबंदी व जल संवर्धन ही स्पर्धेची थीम आहे. विभागीय स्तरावर २ लाख, १ लाख ५० हजार व १ लाख रुपये, जिल्हास्तरावर १ लाख, ७५ हजार व ५० हजार रुपये तर, तालुकास्तरावर २५ हजार, १५ हजार व १० हजार रुपये असे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देण्यात येणार आहेत. २५ सप्टेंबर रोजी विजेत्यांची नावे घोषित करण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाने २७ जुलै २०१६ रोजी जीआर जारी केला आहे. या निर्णयावर याचिकाकर्त्याचा आक्षेप होता.
पोलीसांनी अटक केलेले निंबार्तेसह 31 जण 10 तासापासून उपाशी
भंडारा,दि.8-पवनी तालुक्यातील विरली गावाजवळ मंगळवारच्या रात्री झालेल्या घटनेत एका ट्रकचालकासह क्लिनरचा मृत्यू हा पोलीसांच्या बेजाबबदारपणामूळे झल्याने त्यांच्यावर त्वरीत कारवाई करण्याच्या मागणीला घेऊन रास्तारोको आंदोलन करणारे काँग्रेसचे युवा नेते महेंद्र निंबार्तेसहित 31 लोकांना भंडारा पोलिसांनी बुधवराल अटक केली.त्या 31 लोकांना अद्याप जामीन मिळालेला नसून कालपासून त्यांना फक्त एकदा चहा देण्यात आले आहे.आज सकाळी 10 वाजेपर्यंत त्यांना जेवण किंवा नास्तासुध्दा मिळाला नसल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे.अटक कुणालाही गेली असली तरी मानवाधिकार आयोगाच्या निर्देशानुसार त्यांना उपाशी ठेवता येत नाही.परंतु पोलीसानी आपल्याच पोलीसांच्या विरोधात आंदोलन करणार्या आंदोलकांना मात्र रात्रभर उपाशी ठेवले आहे.अजून पर्यंत कुणालाही जामीन दिला नाही, ह्याचा अर्थ त्या सगळ्यांना आज कोर्टात हजर करून नंतर कोर्टातून जामीन मिळू शकतो. पोलिसांच्या वागणुकीमुळे ट्रक चालक टायर खाली आला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. हि घटना दुर्दैवी असून संबंधित पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा ह्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेले महेंद्र निंबार्ते व इतर 31 लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.
कोपर्डीसह विविध मुद्यावर ओबीसी संघर्षसमितीचे निवेदन
गोंदिया,दि.8- गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती व शास्त्री वॉर्ड ओबीसी कृती संघर्ष समितीच्यावतीने अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी घटनेचा निषेध नोंदविणारे निवेदन मु्ख्यमंत्र्याचे नावे उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत पाठविण्यात आले.नायब तहसिलदार वाहने यांनी ओबीसी संघर्ष कृती समितीच्या शिष्टमंडळसोबत सविस्तर चर्चा करुन निवेदन लगेच मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविण्याचे आश्वासन दिले.
या निवेदनात कोपर्डी प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा करुन पिडित कुटुबांना न्याय व सुरक्षा देण्यात यावे,.पुरोगामी महाराष्ट्रात कोपर्डी सारख्य़ा घटना काळीमा फासणार्या असल्याने याप्रकरणात आरोपी कुणीही असो त्यास कुठल्याच प्रकारचे सरंक्षण न देता अशा घटनांवर आळा घालण्यासाठी त्वरीत कारवाईची मागणी करण्यात आली.तसेच गेल्या अनेक दिवसापासून राज्यात ओबीसी समाजावर अन्याय करणार्या घटनामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने ओबीसी समाजात एकप्रकारे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच ओबीसी समाजातील व्यक्तींना खोट्या गुन्ह्यात अडकविणार्यावर सुध्दा कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.सोबतच गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे संघटक राजेश नागरीकर याच्यावर झालेल्या हल्याप्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा देण्यात यावे. भाजप ओबीसी आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड.मुकेश रहागंडाले यांचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावे अादी मागण्यासह नंदुरबार येथील उपविभागीय अधिकारी यांनी सुनिल विठोबा चौध़री यांना नॉनक्रिमिलेयमर प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर निलबंनाची कारवाई करण्यात यावी.तसेच केंद्रसरकारप्रमाणे क्रिमिलेयरची मर्यादा नाॅन क्रिमिलेयरला राज्यात लागू करण्यात यावे या मागणीचा समावेश होता.निवेदन देतेवेळी कार्याध्य़क्ष अमर वराडे,सयोंजक खेमेंद्र कटरे,संघटक कैलास भेलावे,शास्त्री वार्ड अध्यक्ष खुशाल कटरे,कार्याध्यक्ष प्रा.रामलाल गहाणे,भारत पाटील,प्रमेलाल गायधने,आर.के.कारंजेकर,बंशीधर शहारे,शिशिर कटरे,रामकृष्म गौतम,डाॅ.संजीव रहागंडाले,राजेश कापरे,ओमप्रकाश सपाटे,महेंद्र बिसेन,संजय राऊत आदी उपस्थित होते.
डाॅं.बेंबाळगेच्या मानसिक त्रासामुळेच डाॅ.आत्राम यांचा मृत्यू
berartimes.comगोंदिया,दि.8- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्गंत सडक अर्जुनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र खोडशिवनी येथील कार्यरत डाॅ शालीकराम आत्राम यांचा नागपूरच्या एका रुग्णालयात झालेला मृत्यू हा स्थानिक वैद्यकीय अधिकारी बेंबाळगे यांच्या मानसिक त्रासामुळे झाल्याचे बोलले जात आहे.डाॅ.आत्राम यांच्यावर बुधवारला त्यांच्यागावी अंत्यसंस्कार करण्यात आले.खोडशिवनी येथून त्यांची बदली भंडारा जिल्ह्यात झालेली असतानाही डाॅ.बेबाळंगे यांनी त्यांनी रिल्हीव करण्यास टाळाटाळ केली.त्यामुळे आत्राम यांना मानसिक त्रास झाल्याने ते आजारी पडले आणि औषधौपचार दरम्यान त्यांचा मंगळवारला नागपूरच्या मिडास रुग्णालयात वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाले.बेंबाळगे यांनी केलेल्या टाळाटाळीप्रकरणात आदिवासी समाजात तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी बहुसंख्य डाॅक्टर उपस्थित होते.
मांगली ग्रामसेवक जाधव मारहाणप्रकरणी मोर्चा
भंडारा,दि.8 :पवनी तालुक्यातील मांगली येथील ग्रामसेवक दत्ता जाधव यांना झालेल्या मारहाण प्रकरणी आरोपींना कठोर कारवाई करण्यास्तव बुधवारला जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय कृती समिती व ग्रामसेवक युनियने जिल्हा परिषदवर संयुक्त धडक मोर्चा काढून अधिकार्यांना घेराव घातला.
ग्रामसेवक दत्ता जाधव यांना ग्रामपंचायत मांगली ता.पवनी येथील ग्रामसभा सुरु असताना मारहाण करून शासकीय दस्तावेज फाडले. या प्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. आरोपीवर कारवाई करण्यात न आल्यामुळे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामसभेला उपस्थित पोलीस कर्मचार्यावर कारवाई करावी, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे कामकाजावर कामबंदी करण्यात यावे, आदी मागण्यासंदर्भात जिल्हाभर कामबंद आंदोलन करण्यात आले. त्यासंबंधी योग्य ती कार्यवाही व्हावी, याकरिता जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. त्यानंतर जिल्हा परीषदेच्या आवारात आयोजित सभेत कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर कळंबे, कार्याध्यक्ष सतीश मारबते, सरचिटणीस टी.आर. बोरकर, मुख्य संघटक अतुल वर्मा, मार्गदर्शक गोपाल कारेमोरे, ग्रामसेवक संघटनेचे संयुक्त सचिव अनिल कोहळे, जिल्हाध्यक्ष शिवपाल भाजीपाले, सरचिटणीस श्याम बिलवणे, विभागीय सचिव विलास खोब्रागडे, कोषाध्यक्ष जयेश वेदी, उपाध्यक्ष विवेक भरणे, तालुका अध्यक्ष प्रदीप लांजेवार, सचिव दत्ता जाधव, जयंत गडपायले, पवनीचे सोनुले, किशोर लेंडे, अजय राऊत, एन.सी. बिसेन, लाखांदूरचे नरेंद्र गजभिये, मनोज वरुडकर, तुळशीदास कोरे, अनिल धमगाये, दिगांबर गभणे, नरेंद्र सौदागर, फुलचंद बडवाईक, पंकज काटेखाये, नरेश शिवनकर, शामराव नागदेवे, विनोद भांडारकर, विलास मुंडे व ग्रामसेवक हजर होते.