शाळांमध्ये वाचन-आनंद उपक्रमात विद्यार्थांचा सहभाग

0
16

गोंदिया,दि.8- राज्य शासनाने डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती १५ ऑक्टोबर २0१६ रोजी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्याच्या निर्णय घेतला आहे.त्याची पूर्वतयारी व राज्यासाठी एक पथदश्री प्रकल्प म्हणून शिक्षण विभागातर्फे आज ८ सप्टेंबरला जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून वाचन-आनंद दिवस (दफ्तरविरहित दिवस) जिल्हा परिषदेसह खासगी शाळांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.या उपक्रमाला चांगला प्रतिसाद शाळांनी दिला.पंचायत समिती सभापतीपासून केंद्रप्रमुख आणि शिक्षण विभागातील अधिकारी यांनी शाळांना भेटी देऊन उपक्रमाची माहिती घेतली.गोरेगाव तालु्क्यातील मोहगाव(बु.)येथील परशुराम विद्यालयातही केंद्रप्रमुख भगत यांच्या उपस्थितीत वाचन-आनंद दिवस साजरा करण्यात आला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी.डब्लू.कटरे,सहाय्यक शिक्षक डी.डी.चौरागडे,पी.एम.चुटे,कु.भारती बिसेन(कटरे),बी.सी.गजभिये,टि.एफ.इळपाचे,व्ही.एस.मेश्राम,एल.वाय.पटले,पी.व्ही.पारधी,मुन्ना पारधी,दिनेश बोपचे विद्यार्थी उपस्थित होते.शाळेतील सुमारे 200 विद्यार्थांनी यात सहभाग घेतला.प्रत्येकांने 10 पुस्तकाच्या जवळपास वाचन केले आहे.एका पुस्तकातील 16 पानाचे वाचन म्हणजे 1 पुस्तक असा नियम शिक्षण विभागाने तयार करुन दिला होता.यावेळी केंद्रप्रमुख भगत यांनी विद्यार्थांना दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी दोन विद्यार्थ्यांनी मिळून अर्धे अर्धे पुस्तके घेऊन आल्यास ओझे कमी होईल असे सांगितले.index1
जिल्ह्यातील २ लाख ६0 हजार विद्यार्थी प्रती विद्यार्थी किमान १0 पुस्तके या प्रमाणे २६ लक्ष पुस्तकांचे वाचन करतील असे नियोजन करण्यात आले होते. कोणीही विद्यार्थी शाळेत दफ्तर घेऊन येणार नाही. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना चित्रमय पुस्तके पुरविण्यात आली होती. शाळेत पुस्तक प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते. गोंदिया तालुक्यातील उच्चप्राथमिक जिल्हा परिषद शाळा पांढराबोडी,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंगपूरा,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मरारटोला येथेही वाचन आनंद दिवस अंतर्गत विद्यार्थीनी ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन केले.