40.8 C
Gondiā
Sunday, May 18, 2025
Home Blog Page 5686

पोटनिवडणुकीत भाजपाचे वर्चस्व कायम

0

आमगाव : तालुक्यातील बनगाव येथील रिक्त झालेल्या प्रभाग ३ मधील जागेसाठी २४ ऑगस्टला मतदान झाले. २६ ऑगस्टला मतगणना झाली. यात भाजपचे दिनदयाल थेर यांनी राष्ट्रवादीची कायम असलेली जागेवर विजय संपादन केले.
बनगाव ग्रामपंचायतच्या प्रभाग तीन मधील राष्ट्रवादीकडे असलेली जागा रिक्त झाल्याने या जागेकरिता पोटनिवडणुक घेण्यात आली. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राष्ट्रवादी नेत्यांनी सदर जागा स्वत:कडे कायम असावी यासाठी मुकेश ग्यानीराम शिवणकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर उमेदवार जिंकण्यासाठी जि.प. सदस्य सुखराम फुंडे, राष्ट्रवादीचे नेते नरेश माहेश्‍वरी, विजय शिवणकर यांनी धुरा सांभाळली होती. भाजप उमेदवार दिनदयाल सुखराम थेर यांच्या प्रचारात तुलसीदास भुजाडे, मोनज सोमवंशीे, सुषमा भुजाडे, बाळा ठाकूर, काशिराम हुकरे या तरुण कार्यकर्त्यांनी सदर निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
सदर निवडणुकीत एकूण ६४३ मतदान झाले होते. यात दिनदयाल थेर यांना ३४५ मते तर मुकेश शिवणकर यांना २९३ मत मिळाली. ५ मते नोटाला मिळाली. थेर यांनी ५२ मतांनी निवडणूक जिंकली.
निवडणुक निकाल लागताच भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून विजयी मिरणवणुक काठली. यात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

‘टफ युनिव्हर्सिटी’कडून पाणी नमुन्यांची तपासणी

0

चंद्रपूर दि.27: टफ युनिव्हर्सिटी युएस, युनिसेफ व निरी नागपूरची चमू चंद्रपूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आली आहे. ही चमू पाणी पुरवठा योजना नसलेल्या व पाणी पुरवठा योजना असलेल्या अशा चार तालुक्यांतील १0 गावांमधील पाणी नमुने तपासणी करीत आहे. पाणी नमुन्यांमध्ये आढळलेले दोष दूर करण्यासाठी ही चमू शासनाला अहवाल सादर करणार आहे.
टफ युनिर्व्हसीटी युएस व युनीसेफच्या गॅब्रेला स्टींग, निरी नागपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. खडसे, सहाय्यक म्हणून सतीश सावळे यांचा या चमूत समावेश आहे. ही चमू दहा दिवस चंद्रपूर जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील विविध गावांना भेटी देणार आहे. शासनस्तरावरुन चार तालुक्यातील दहा गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये ज्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना आहे व ज्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना नाही, असे गावे निवड करण्यात आलेली आहेत.
या दौर्‍यामध्ये ही चमू प्रत्येक गावात जाऊन प्रथम ग्रामपंचायत मध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष-सचीव व सदस्य , जलसुरक्षक, आशावर्कर तसेच गावकरी यांच्यासोबत चर्चा करुन पाणी वापर कसे करतात, याबाबत विस्तृत माहिती जाणून घेत आहे. त्यानंतर ते गावांमध्ये काही महिलांसोबत चर्चा करून तेथील पाणी नमुने तपासणी केली जात आहे.

हा तर कुंभार व्यवसाय नष्ट करण्याचा शासनाचा डाव

0

गोंदिया,(berartimes.com)दि.26- मातीपासून लाल वीटा उत्पादन करणार्या व्यवसायावर शासनाने प्रतिबंध लावून फ्लायअ‍ॅश पासून बनविण्यात येणार्या विटाचा वापर बंधनकारक केले आहे.एकंदरीत हा निर्णय म्हणजेच कुंभार व्यवसाय नष्ट करण्याचा शासनाचा कुटील डाव आहे.असा आरोप महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाने केला आहे.तसे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांच्यामार्फेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज २६ ऑगस्ट रोजी शिष्टमंडळाने पाठविले आहे.
केन्द्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाच्या ३ नोव्हेंबर १९९९ च्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र शासनाने भूपृष्ठावरील उपजावू मातीपासून लाल वीटा तयार करणार्या उत्पादकांना प्रतिबंध करण्यात आला असून कोळसा किंवा लिग्नाईटवर चालणार्या औष्णिक विद्युत केन्द्रापासून ३०० कि.मी.च्या त्रिज्येच्या क्षेत्रात बांधकामात फ्लायअ‍ॅशपासून बनविण्यात येणार्मा वीटाचा वापर करणे बंधनकारक केले आहे.यामुळे संपूर्ण कुंभार समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. समाजाच्या छोटेखानी वीटभट्ट्या बंद पाडून कुंभार व्यवसाय बंद करण्याचा कुटील डाव शासनाने रद्द करावा.अन्यथा महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ शासनाविरूद्ध तिव्र आंदोलन करेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदन देतांना महासंघाचे राज्य संघटक गोविंद वरवाडे,शंकर मोहरीया,युवा जिल्हाध्यक्ष हितेश चक्रवर्ती,सुनील प्रजापती,कैलाश प्रजापती,रामनाथ प्रजापती,संजय आमदे,रामगोपाल प्रजापती,राजेद्र प्रजापती,महेश प्रजापती,कैलाश प्रजापती,प्यारेलाल प्रजापती,विनोद प्रजापती,सुनिल प्रजापती,रवि प्रजापती,संजय प्रजापती,सुरेश प्रजापती,भोलेश्वर चक्रवर्ती,प्रेमकुमार चक्रवर्ती,ईश्वर चक्रवर्ती,राजेश पाठक,ओबीसी संघर्ष कृती समितीचे सयोजक खेमेंद्र कटरे आदींनी शिष्टमंळाचे नेतृत्व केले.शासनाने त्वरीत निर्णङ्म मागे न घेतल्यास तिव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे.

जि.प.उपाध्यक्षांच्या गावात राष्ट्रवादीला बहुमत

0

गोंदिया,दि.26-राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या काही निवडणुकासोबतच गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध ग्रामपंचायतीची निवडणुक सुध्दा पार पडली.विशेष म्हणजे सिरेगाव बांध हे गाव गोंदिया जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष व भाजपच्या वरिष्ठ पदाधिकारी श्रीमती रचनाताई गहाणे यांचे गाव.परंतु श्रीमती गहाणे यांना आपल्याच गावात ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता स्थापन करता आली नसल्याने अर्जुनी मोरगाव तालुक्यात चर्चेचा विषय झालेला आहे.सिरेगावबांध ग्रामपंचायतीच्या 9 सदस्यासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जागा जिंकत ग्रामपंचायतीवर कब्जा मिळविला.तर भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळावे यासाठी दिवसभर गहाणेताई या तळ ठोकून होत्या.परंतु मतदारांनी त्यांच्या कार्याला सहकार्य करण्याएैवजी राष्ट्रवादीला मदत केल्याचे दिसून आले.राष्ट्रवादी काँग्रेसची पॅनल ही लोकपाल गहाणे यांच्या नेतृत्वात लढविण्यात आली.विशेष म्हणजे लोकपाल गहाणे हे रचनाताईंचे सख्खे दीर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

कोपर्डीच्या निषेधार्थ उस्‍मानाबाद एकवटले, लाखोंचा विशाल मोर्चा

0

उस्मानाबाद – कोपर्डी घटनेतील आरोपींना फासावर लटकवा, या मागणीसह मराठा समाजाच्या विविध मागण्या घेऊन आज (शुक्रवारी ) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये लाखो अधिक समाजबांधव सहभागी झालेत. दरम्यान, शहरातील सर्व शाळा शुक्रवारी बंद ठेवण्यात आल्‍या होत्‍या. शिवाय शहरही कडकडीत बंद होते.कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर हिंस्र पद्धतीने अत्याचार करण्यात आल्याने मराठा समाजामध्ये असंतोष असून, ही खदखद मराठा समाजाच्या आंदोलनाच्या माध्यमातून बाहेर पडत आहे.मराठाक्रांती मोर्चासाठी पोलिसांनी 600 पोलिस कर्मचारी, 70 अधिकारी नियुक्त केले होते. लातूर, जालना, बीड येथून 50 अधिकारी – कर्मचाऱ्यांची कुमक मागविली होती तर राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या, दंगल नियंत्रण पथकांची नेमणूक केली होती.

जिल्हा परिषदेच्या परिसरात भरली वारल्याची शाळा!

0

वाशिम, दि. २६ – इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या २०७ विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता केवळ ५ शिक्षक कार्यरत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तथापि, रिक्त असलेल्या शिक्षकांची पदे भरण्याकडे दुर्लक्ष करणा-या प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी चक्क जिल्हा परिषद कार्यालयासमोर विद्यार्थ्यांची शाळा २६ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान भरविण्यात आली. यासंदर्भात तालुक्यातील वारला येथील पालकांनी प्रशासनाला अवगत सुध्दा केले होते मात्र त्याची दखल न घेतल्याने हे आंदोलन करण्यात आले.

शेंगाच्या भाजीतून ३ मुलींना विषबाधा

0

अकोला, दि. २६ – पोपटखेड येथील तीन मुलींनी सकाळी 10 वाजताच्या सुमारास मूगाच्या शेंगांची भाजी खाल्ली. त्यातून त्यांना विषबाधा झाली. या तीनही मुली मैत्रिणी आहेत. भाजी खाल्यानंतर त्यांना उलट्या, मळमळ व्हायला लागली. पोटदुखू लागले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. विषबाधा झालेल्या मुलींची नावे- छकुली उर्फ साक्षी भीमराव बनसोड (14), लक्ष्मी रवी गावंडे (12), आरती तिरतुक उईके(14) आहेत. घटना घडली. त्यावेळी तीनही मुलींचे आईवडिल शेतावर मजुरीसाठी गेले होते.

रोगराई मुक्तीसाठी जिल्हा हागणदारी मुक्त करा – डॉ.विजय सूर्यवंशी

0

जिल्हास्तरीय कार्यकारी समिती सभा
गोंदिया,दि.२६ : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या राष्ट्रीय कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी सुरु आहे. स्वच्छता असेल तर समृध्दी येते तेथे आरोग्य निरोगी राहते. कोणत्याही व्यक्तीने उघड्यावर शौचास बसू नये. प्रत्येकाने आपल्या घरी शौचालय बांधून रोगराई मुक्तीसाठी जिल्हा हागणदारी मुक्त करा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले.
२३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची सभा संपन्न झाली. यावेळी डॉ.सूर्यवंशी बोलत होते. सभेला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राजकुमार पुराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) राजेश बागडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राजेश देशमुख, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ.सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यात पाणी मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे शौचालय बांधण्यास अडचण नाही. कोल्हापूर व पालघर येथे शौचालय बांधण्याची योजना राबविण्यात आली. त्याच धर्तीवर या जिल्ह्यात जास्तीत जास्त शौचालय बांधून जिल्हा हागणदारीमुक्त करावा. कोणताही अधिकारी शाळेत भेटीला गेला तर त्यांनी मुलांना प्रथम शौचालयाबाबत विचारावे. शाळेत हँडवॉश स्टेशन निर्माण करुन विद्यार्थ्यांमध्ये हात धुण्याच्या सवयी लावाव्यात. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी वाहनाची नोंदणी करतांना त्यांच्याकडे शौचालय असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक करावे. पोलीस विभागाने गुड मॉर्निंग पथकास सहकार्य करावे. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्याकडे शौचालय बांधणे बंधनकारक करुन महिला बचतगटांना १०० टक्के शौचालय असल्याशिवाय स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा पुरवठाच करु नये. सर्व ग्रामपंचायत सदस्यांकडे शौचालय बांधले आहे काय याची खात्री करुन घ्यावी.
शौचालय बांधकामाला वेग येण्यासाठी ग्रामसेवकांच्या स्पर्धा निर्माण कराव्यात असे सांगून डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांना शौचालयाचे महत्व व त्यामुळे होणाऱ्या आजाराची माहिती दयावी. जिल्ह्यातील माविमच्या महिला बचतगटातील ६० सहयोगीनींच्या स्पर्धा निर्माण करुन ग्रामसभेच्या माध्यमातून शौचालय बांधकामाला वेग आणण्याचे काम करावे. महिला बचतगटांच्या ज्या सहयोगीनी शौचालय बांधण्याबाबत उत्कृष्ट काम करतील त्यांचा २६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. शौचालय बांधण्याबाबत स्थानिक केबलवरुन क्लीप दाखविण्यात यावी. शौचालय बांधण्याबाबतचे पॉम्पलेटस् छापून गावागावात वितरीत करावे. गवंड्यांची गावनिहाय यादी तयार करावी. गोंदिया शहरातील मामा तलावाच्या शेजारी कोणीही शौचास बसू नये. जिल्ह्यात नविन तयार होणाऱ्या घरात वीज जोडणी देतांना शौचालयाची खात्री करुन घ्यावी. ज्या घरात शौचालय नसेल त्या घरी नव्याने वीज जोडणी देवू नये. जिल्ह्यातील प्रत्येक गावात घरोघरी शौचालय बांधलेच पाहिजे असा आग्रह डॉ.सूर्यवंशी यांनी केला.
सभेला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.चव्हाण, जि.प.वरिष्ठ लेखा अधिकारी श्री.जवंजाळ, महाराष्ट्र जिवनोन्नती अभियानाचे व्यवस्थापक अनिल गुजे, सहायक पोलीस निरीक्षक श्री.वाबळे, महिला व बालकल्याण विभागाचे अधिक्षक डी.एस.लोहबरे,यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे आभार मानले.

भटक्या समाजातील नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवा- राजकुमार बडोले

0

गोंदिया,दि.२६ : शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत. या योजनांचा लाभ घेता यावा यासाठी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या मांग गारुडी, बहुरुपी, नाथजोगी व भिंगी या भटक्या समाजातील नागरिकांचे प्रश्न संबंधित जिल्हा प्रशासनाने तातडीने सोडवावे, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
२४ ऑगस्ट रोजी नवेगावबांध येथील लॉगहट विश्रामगृह येथे गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील भटक्या समाजातील नागरिकांच्या समस्यांच्या आढावा बैठकीत श्री.बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, भंडारा जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, जि.प.उपाध्यक्ष श्रीमती रचना गहाणे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
श्री.बडोले पुढे म्हणाले, भटक्या समाजाला कुठेतरी स्थायी केले पाहिजे. त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. या समाजातील महिलांना वसंतराव नाईक महामंडळामार्फत गृह उद्योग उभारण्यासाठी सहकार्य करावे. त्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न देखील मार्गी लावले पाहिजे.
पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच व कोतवाल यांचा स्थानिक चौकशी अहवाल प्राप्त करुन त्यांच्या जात प्रमाणपत्राचा प्रश्न सोडविण्यात यावा असे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, हा भटका समाज घरे नसल्यामुळे कापडी पालाचे घरे तयार करुन राहतो. त्यांच्या पालावरच्या शाळाअंतर्गत पालावर जावून विद्यार्थ्यांना दोन तास शिकविण्यात यावे. यासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच त्यांना रमाई घरकुल योजनेअंतर्गत सौर कंदील दिले पाहिजे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा. तसेच त्यांच्या वन जमिनीच्या पट्टयांबाबतचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा असेही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले, शासनाच्या अनेक लोककल्याणकारी योजना आहेत. या समाजाच्या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेवून त्यांच्या समस्या लवकरच सोडविण्यात येतील असेही ते म्हणाले.
भंडारा जिल्हाधिकारी डॉ.चौधरी म्हणाले, या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच कृती आराखडा तयार करुन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
या बैठकीला गोंदिया जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी सर्वश्री सुनिल सूर्यवंशी (तिरोडा), सिध्दार्थ भंडारे (अर्जुनी/मोर), के.डी.मेश्राम (गोंदिया), मोहन टोनगावकर (देवरी), गोंदिया तहसिलदार सर्वश्री अरविंद हिंगे, रविंद्र चव्हाण, साहेबराव राठोड, कल्याणकुमार डहाट, प्रशांत सांगडे, विठ्ठल परळीकर, संजय नागटिळक, भंडारा जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी सर्वश्री डॉ.संपत खिल्लारी, शिल्पा सोनाळे, दिलीप तलमले, तहसिलदार सर्वश्री संजय पवार, राजीव शक्करवार यांचेसह अन्य तहसिलदार उपस्थित होते. यावेळी गोंदिया समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, भंडारा समाज कल्याणचे सहायक आयुक्त देवसूदन धारगावे, वसंतराव नाईक महामंडळाचे अधिकारी, भटक्या जमाती संघटनेचे अध्यक्ष श्री.चव्हाण उपस्थित होते. सभेचे प्रास्ताविक दिलीप चित्रीवेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार शिवा कांबळे यांनी मानले.

२८ ऑगस्टला नागपूरात ओबीसी विद्यार्थ्यांची कार्यशाळा

0

गोंदिया,दि.26-राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे येत्या २८ ऑगस्टला सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत , धनवटे नॅशनल कॉलेज काँग्रेसनगरच्या नागपूर येथील सभागृहात ओबीसी समाजाचे सवैंधानिक अधिकार ,नॉनक्रिमिलेअर ,फ्रिशीप भारत सरकार स्कॉलरशिप आणि रोजगार स्वंयमरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ओबीसी विद्यार्थीसांठी करण्यात आले.ओबीसी समाजातील ५०० विद्यार्थांना तसेच त्यांच्या पालकांना व बेरोजगारांना या शिबिरात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य बबनराव तायवाडे राहणार आहेत. मार्गदर्शक म्हणून नागपूरचे उपजिल्हाधिकारी निशीकांत सुके, कमला नेहरु महाविद्यालय नागपूरचे प्रा. रमेश पिसे, ओबीसी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर मार्गदर्शन करणार आहेत.तरी विदर्भातील इच्छुक ओबीसी विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन युवा समितीचे प्रमुख मनोज चव्हाण , विद्यार्थी संघटना प्रमुख निकेश पिणे,प्रा.गजानन धांडे, निलेश खोडे, उज्वला महल्ले, हजारे यांनी केले आहे.तसेच अधिक माहितीसाठी ९४२३३९०९०९ मनोज चव्हाण, ९१९८६०७१५१२१ निकेश पिणे, ९१९५६१३४५३९८ उज्वला महल्ले, ९१८८०५९५१८७९ निलेश खोडे ,९१७७७६८२१३२७ विनोद हजारे यांच्याशी संपर्क करावे असे आवाहन निमंत्रक सचिन राजुरकर,शरद वानखेडे,खेमेंद्र कटरे,प्राचार्य टाले,श्री आरीकर,गोपाल सेलोकर,मंगेश कामोने,शामल चन्ने,नाना लोखंडे,गजानन चौधऱी,संस्कृती कोरडे,श्वेता मालेकर,प्रा.मनोहर तांबेकर,डाॅ.राजू गोसावी,भुषण दडवे,सुषमा भड,शुभांगी मेश्राम आदींनी आवाहन केले आहे.