हा तर कुंभार व्यवसाय नष्ट करण्याचा शासनाचा डाव

0
31

गोंदिया,(berartimes.com)दि.26- मातीपासून लाल वीटा उत्पादन करणार्या व्यवसायावर शासनाने प्रतिबंध लावून फ्लायअ‍ॅश पासून बनविण्यात येणार्या विटाचा वापर बंधनकारक केले आहे.एकंदरीत हा निर्णय म्हणजेच कुंभार व्यवसाय नष्ट करण्याचा शासनाचा कुटील डाव आहे.असा आरोप महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाने केला आहे.तसे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांच्यामार्फेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज २६ ऑगस्ट रोजी शिष्टमंडळाने पाठविले आहे.
केन्द्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाच्या ३ नोव्हेंबर १९९९ च्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र शासनाने भूपृष्ठावरील उपजावू मातीपासून लाल वीटा तयार करणार्या उत्पादकांना प्रतिबंध करण्यात आला असून कोळसा किंवा लिग्नाईटवर चालणार्या औष्णिक विद्युत केन्द्रापासून ३०० कि.मी.च्या त्रिज्येच्या क्षेत्रात बांधकामात फ्लायअ‍ॅशपासून बनविण्यात येणार्मा वीटाचा वापर करणे बंधनकारक केले आहे.यामुळे संपूर्ण कुंभार समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. समाजाच्या छोटेखानी वीटभट्ट्या बंद पाडून कुंभार व्यवसाय बंद करण्याचा कुटील डाव शासनाने रद्द करावा.अन्यथा महाराष्ट्र कुंभार समाज महासंघ शासनाविरूद्ध तिव्र आंदोलन करेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.निवेदन देतांना महासंघाचे राज्य संघटक गोविंद वरवाडे,शंकर मोहरीया,युवा जिल्हाध्यक्ष हितेश चक्रवर्ती,सुनील प्रजापती,कैलाश प्रजापती,रामनाथ प्रजापती,संजय आमदे,रामगोपाल प्रजापती,राजेद्र प्रजापती,महेश प्रजापती,कैलाश प्रजापती,प्यारेलाल प्रजापती,विनोद प्रजापती,सुनिल प्रजापती,रवि प्रजापती,संजय प्रजापती,सुरेश प्रजापती,भोलेश्वर चक्रवर्ती,प्रेमकुमार चक्रवर्ती,ईश्वर चक्रवर्ती,राजेश पाठक,ओबीसी संघर्ष कृती समितीचे सयोजक खेमेंद्र कटरे आदींनी शिष्टमंळाचे नेतृत्व केले.शासनाने त्वरीत निर्णङ्म मागे न घेतल्यास तिव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे.