वृत्तसंस्था
रायपूर- छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांबरोबर झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (बुधवार) दिली.सुकमा जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक इंदिरा कल्याण इस्लेला यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दोरानपल पोलिस स्टेशनच्या हद्दित असलेल्या पोंगा भेजी गावाच्या हद्दीत नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलाचे जवान व पोलिसांनी संयुक्तरित्या आज सकाळी शोध मोहिम सुरू केली होती. यावेळी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी जागीच ठार झाला. त्याच्याकडील शस्त्रास्त्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. परिसरात शोधमोहिम अद्याप सुरू आहे.‘
छत्तीसगडमध्ये चकमकीत नक्षलवादी ठार
बिहारमध्ये नाव उलटून आठ जण बुडाले
वृत्तसंस्था
पाटणा – बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील पुनपुन नदीत नाव उलटून नऊ प्रवासी बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. नदीपलीकडील खुंडवा बाजारातून खरेदी करून कालेन गावातील 18 ग्रामस्थ नावेतून घरी परतत असताना ही घटना घडली. शाळेतून घरी जाणारे काही विद्यार्थीही नावेत होते. राज्य आपत्ती निवारण दलाने (एसडीआरएफ) घटनास्थळी बचावमोहिम सुरू केली आहे. नऊ प्रवाशांना वाचविण्यात “एसडीआरएफ‘ला यश आले असून एका महिलेची मृतदेहही सापडला आहे. अन्य नऊ प्रवाशांचा शोध अद्याप लागलेला नाही.
या दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार ही नाव एका काटेरी झाडाला धडकल्याने फुटली. प्राण वाचविण्यास सर्व प्रवासी नावेच्या एका बाजूला केले. त्यामुळे नाव पाण्यात बुडाली. काही दिवसांपासून बिहारमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने नद्यांना पूर आलेला आहे. गंगा, सोने, पुनपुन आदी नद्यांमुळे राज्यातील सुमारे 12 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे.
‘जय’ वाघाची चौकशी सीबीआईने करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
नवी दिल्ली,दि.24- महाराष्ट्राचे अर्थमंत्री व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन ‘जय’ वाघाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवावा अशी विनंती केली. यासंबंधीचे निवेदन ही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे सुर्पूत केले.
काल खासदार नाना पटोले यांनी ‘जय’चा कुठेच थांगपत्ता लागला नसल्याने तो जिवंत नसून मारला गेला असल्याचे विधान केले होते. हे विधान अतिशय गंभीर असल्याने हा तपास सीबीआय मार्फत करण्यात यावा व सीबीआय ने खासदार नाना पटोल यांच्याकडून पुरावे प्राप्त करून घेऊन ‘जय’ वाघाचा तपास करावा यासाठी ही विनंती करण्यात आल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. वनमंत्र्यांनी आपल्या निवेदनात ‘जय’ वाघासंबंधी माहिती देतांना म्हटले आहे की, उमरेउ कऱ्हांडला अभयारण्यातील ‘जय’ नावाने ओळखला जाणारा वाघ बऱ्याच काळपासून दिसत नसल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर हा तपास महत्वाचा ठरणार आहे.
जय वाघाचा शोध घेण्यासाठी वन विभागाने कॅमेरा ट्रॅपस लावले आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी एक चमू पाठवण्यात आला आहे. अद्याप जय च्या अस्तित्त्वाबाबत ठोस पुरावा मिळालेला नाही. तथापि, या संदर्भात प्रसिद्धी माध्यमातून उलटसुलट बातम्या प्रकाशित होत आहेत. तसेच भंडारा-गोंदिया मतदार संघाचे खासदार नाना पटोले यांनी ही यासंदर्भत जयचा कुठेच थांगपत्ता लागत नसल्याने तो जिवंत नसून मारला गेल्याचे विधान केले आहे. हे विधान अतिशय गंभीर असल्याने आपण जयचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
जय प्रकरणाची सीआयडीच्या माध्यमातून चौकशी करण्याबाबत उद्या मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना निवेदन सादर करणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
राज्यात होणार नवा कायदा : विनापरवानगी लग्न, वाढदिवस कराल तर जेलमध्ये जाल !
गोंदिंयांं,दिं.24- कुठल्याही धार्मिक, सामाजिक किंवा कौटुंबिक कारणासाठी 100 पेक्षा अधिक पाहुण्यांना बोलावयचे असेल तर पोलिस परवानी अनिर्वाय करण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. त्यासाठी नवीन नियमावली तयार केली जाणार असून, कायद्यात बदलही केला जाईल. तसे झाले तर यापुढे लग्न सोहळा, वाढदिवस, वास्तुपूजन, खेळांच्या स्पर्धा, धार्मिक कार्यक्रम यांच्यासाठी पोलिस परवानगी घ्यावी लागणार आहे.जेव्हापासून केंद्रात व राज्यात नवे सरकार आले तेव्हापासून जनसामान्यांना वेठीस धरण्याचे काम सुरु केले आहे.त्यात असा कायदा आल्यास पोलिसांवरील कामाचा ताण वाढणार आहे. शिवाय सर्वसामान्य नागरिकांना ही परवानगी गैरसोईची ठरण्याची दाट शक्यता आहे.आणि घरगुती कार्यक्रमासाठी ही अट घालणे म्हणजे नातेवाईकांनाही आता कुणी बोलावू नये असा जणू फतवाच राज्यसरकार काढण्याचा तयारीत आहे
राज्य सरकारने तयार केला मसुदा
> या नव्या कायद्याचा मसुदा राज्य सरकारने तयार केला आहे.
> आयोजकांच्या कार्यक्रमाला 100 पेक्षा अधिक व्यक्ती असतील आणि त्याची परवानगी घेतली गेली नसेल तर आयोजकांना 3 वर्ष कारावास आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद या मसुद्यात करण्यात आली आहे.
> 19 ऑगस्ट रोजी राज्य सरकारच्या वेबसाइटवर तो प्रसिद्ध करण्यात आला आहे.
सर्वसामान्य नागरिकांमध्ये रोष
घरात एखादा लहान कार्यक्रम करायचा म्हटला तरी शंभर एक पाहुणे सहज जमतात. अशा वेळी त्याची वारंवार पोलिस परवानगी घेणे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरु शकते. शिवाय पोलिसांकडे जायचे म्हटले तर लवकर परवानगीसाठी चिरीमिरी देण्याचा प्रश्न समोर येतो. म्हणजेच हा कायदा भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देऊ शकतो. शिवाय लोकांचा वेळही यासाठी वाया जाऊ शकतो.
गृहविभागाने तयार केलेला हा मसुदा राज्य सरकारने वेबसाइट प्रसिद्ध केला असून, या बाबत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. त्याला मान्यता मिळाली नाही. पण, सरकार तो लागू करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे त्याला मोठा विरोध होत आहे.राज्यात कायदा व सुव्यवस्था अधिक चोख व्हावी, यासाठी सरकार हा कायदा तयार करण्याच्या विचारात आहे. मात्र, विरोधी पक्षाने यावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या मसुद्यावर आक्षेप घेतला आहे.या मसुद्याला कायद्याचे स्वरुप देण्यासाठी 7 सदस्यांची एक समिती गठित केली जाणार असून या समितीचे अध्यक्ष स्वत: गृहमंत्री असणार आहेत. तसेच या समितीत गृहराज्यमंत्री, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त आणि गुप्तचर विभाग प्रमुख असणार आहेत. विशेष म्हणजे या या समितीत विरोधी पक्षाचा नेता किंवा इतर कुणीही प्रतिनिधी नसेल. ही समिती अंतर्गत सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार आहे.
एनआरएचएमच्या कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून केले काम
गोंदिया,berarimes.com)दि.२४- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत येणाऱ्या ग्रामीण व शहरी भागात पूर्ण वेळ सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासह शासनाचे लक्ष वेधण्याकरीता आज(दि.२४) पासून काळ्या फिती लावून कामकाज आंदोलन सुरु केले आहे.केंद्रसरकारने मार्च 2017 पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या अभियानंतर्गत आरोग्यसेवा पुरविणारे जिल्ह्यातील सुमारे 100 डाॅक्टरसह 700 कर्मचारीवर्गाला नोकरीपासून वंचित व्हावे लागणार आहे.अभियान बंद होण्यापुर्वी राज्यसरकारने या सर्व कर्मचार्याना नियमित आरोग्य सेवेत सामावून घ्यावे या मुख्य मागणीला घेऊन आज बुधवारपासून राज्यव्यापी आंदोलनाला सुरवात करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी-कर्मचारी महासंघाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष सुनिल तरोणे,उपाध्यक्ष अर्चना वानखेडे,सचिव संजय दोनोडे,डाॅ.मिना वट्टी,प्रदिप रहागंडाले,अविनाश वराडे,संकेत मोरघरे,राजीव येडे यांनी दिली.आज गोंदिाय जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर निदर्शने करुन सीईओ व जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
दुर्गम भागातील जनतेपर्यंत सेवा देण्याचे काम आरोग्यसेवक करीत असतात. परंतु, त्यांची सेवा उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी कमी पडते. ग्रामीण भागात गरोदर महिला, बालके, प्रसूती झालेल्या महिला आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये, यासाठी २००५ पासून संपूर्ण राज्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबविले जात आहे. या कर्मचाऱ्यांचे २००६ पासून मासिक मानधन अत्यल्प आहे. सध्याच्या महागाईच्या काळात अल्पशा मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण आहे. नोकरीत कायम करण्यात येईल, या आशेवर हे कर्मचारी काम करीत आहेत. आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी हे कर्मचारी-अधिकारी वर्गाने काळ्या फिती लावून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे.विरोधी पक्षात असताना विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनआरएचम कर्मचारीला कायम करावे अशी मागणी केली होती,आता मात्र सत्तेत तेच असताना आपले शब्द विसरल्याचा आरोपही कर्मचारी वर्ग करीत आहेत.या आंदोलनातर्गंत 31 आॅगस्टपर्यंत काळ्याफिती लावून आंदोलन करणे,29 आॅगस्ट ते 31 आॅगस्ट दरम्यान खासदार,आमदार,लोकप्रतिनिधी यांच्या घरासमोर मोर्चा काढणे,2 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणे,19 सप्टेंबरला एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारणे,आक्टोबंर महिन्यात अहवालपाठविण्यासह सर्व रिपोर्टिंग देणे बंद करणे, 2 नोव्हेबंरपासून बेमुदत काम बंद आदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.आज गोंदिया जिल्ह्यातील सर्वच तालुकास्तरावर कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून काम केले त्यानंतर तहसिलदार,बीडीओ व तालुका वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन सोपविले.आंदोलनात ग्रि्ष्मा वाहने,प्रतिमा मेश्राम,संजय मेंढे,अर्चना चौधरी,राखी प्रसाद,रेखा पुराम,अर्चना कांबळे,ललीता गौतम,ममता गजभिये,शालिनि राऊत,निशांत बनसोड,अनिरिध्द शर्मा,अनिल रहमतकर,ुप्रकाश थोरात,सतिश माटे,मनोज सातपुते,विद्या रहागंडाले ,माया नागपूरे,संजय बिसेन यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.
नागतलावाच्या परिसरात करा जि.प.सदस्यांच्या निवासासाठी इमारत
तलावातील अतिक्रमण काढून सौंदर्यींकरणाचीही जि.प.सदस्य पटले यांची मागणी
गोंदिया,(berartimes.com)दि.२४-जिल्हा परिषद गोंदियाच्या सदस्यांकरीता निवासस्थानाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असलेल्या गोqवदपूर भागातील नागतलाव परिसरात शासकीय निवासस्थान तयार करण्यात यावे.त्यासोबतच या जिल्हा परिषदेच्या तलावाचे सौंदर्यिकरण करण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य व समाजकल्याण समितीचे सदस्य शेखर पटले यांनी केली आहे.
पटले यांनी यासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्षासह बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना २३ ऑगस्ट रोजी पत्र दिले.या पत्रात गोंदिया जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्हा असून जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी म्हणून काम करताना अनेकदा वेळ होते.त्यावेळी मुख्यालयात मुक्काम करण्यासाठी कुठलीच व्यवस्था उपलब्ध नसते.आणि रात्रीच्यावेळी दुर्गम व नक्षलग्रस्त भागात जाण्यासाठी सोय उपलब्ध होत नाही.त्यामुळे आमदारांसाठी ज्यापध्दतीने आमदार निवासाची सोय केलेली असते ,त्याच धर्तीवर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद सदस्यासांठी जि.प.सदस्य निवास इमारत उपलब्ध करून द्यावे असे म्हटले आहे.पटले यांनी यासाठी जिल्हा परिषदेच्या मालकीचा गोqवदपूर भागातील साई मंदिराला लागून असलेल्या नागतलाव परिसरात ही इमारत तयार करून नागतलावाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे असे म्हटले आहे.पाच ते सहा एकर क्षेत्रफळ असलेला जिल्हा परिषदेचा हा नागतलाव आज राईसमिलर्स सह अनेकांनी अतिक्रमण करून नष्ट करण्यास सुरवात केली आहे.त्यासोबतच या तलावात दूषित पाणी सोडले जात असल्याने मत्स्यव्यवसायही मोडकळीस आला आहे.त्यामुळे या तलावातील अतिक्रमण तातडीने काढून जि.प.ने आपल्या मालकीच्या या तलाव परिसराचे सौंदर्र्यीकरण करून जि.प.सदस्यासांठी निवासाची चांगली इमारत तयार केल्यास ५३ सदस्यांसाठी एक हक्काचे राहण्याचे ठिकाण उपलब्ध होणार असल्याचेही पत्रात म्हटले आहे.यासंबंधीचा ठराव येत्या स्थायी समितीच्या बैठकीनंतर सर्वसाधारण सभेत घेऊन शासनाला तसा प्रस्ताव सादर करावा असेही म्हटले आहे.
जि.प.अध्यक्ष मेंढे यांचे आवाहन :गृहभेटीतून शौचालयाची जागृती
गोंदिया,दि.23 : शौच ही नैसर्गिक क्रिया आहे. उघड्यावर शौच केल्यामुळे अनेक प्रकारचे आजार पसरतात. एका व्यक्तीच्या उघड्यावर शौचास जाण्यामुळे संपूर्णगावात आजार पसरू शकतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने शौचालयातच शौचास गेले पाहिजे. सुज्ञ व धनाढय़ लोक उघड्यावरच शौचास जातात, ही बाब चिंताजनक आहे.विष्ठेमुळे होणार्या आजारांबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गृहभेटीतून जनजागृती करा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या स्व.वसंतराव नाईक सभागृहात सोमवारी (दि.२२) कुटूंबस्तर संवाद कार्यशाळेत त्या बोलत होत्या. २२ऑगस्ट ते २ऑक्टोबरदरम्यान स्वच्छ महाराष्ट्रासाठी १८लाख गृहभेटी अभियानांतर्गत कुटुंबस्तर संवाद उपक्रम राबविण्यात येत आहे.
गोंदिया पंचायत समिती अंतर्गत पिंडकेपार ग्रामपंचायत येथे जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए.देशमुख यांनी गृहभेटी करून शौचालय बांधकाम करणार्या लाभार्थ्याना पुष्पगुच्छ देवून त्यांचे कौतुक केले. भेटीदरम्यान शौचालय बनवून त्याचा वापर करणार्या कुटूंबियांच्या घरावर ‘लय भारी’ तर बांधकाम न करणार्या घरावर ‘खतरा/धोका’ हे स्टीकर लावण्यात आले.गृहभेटीत मेंढे यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यांना शौचालयाचे महत्व पटवून देत शौचालयाचे बांधकाम व त्याचा वापर करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाला अतिरिक्त मुकाअ जयवंत पाडवी, आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती पी.जी.कटरे, महिला व बालकल्याण सभापती विमल नागपुरे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल.पुराम, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए.देशमुख, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शर्मा उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. विष्ठेमुळे आजार होतात, हे गृहभेटीतून लोकांना समजावून सांगितले तर लोक शौचालय बांधण्यास तयार होतील. सध्या बांधकामाच्या कोणत्याच साहित्याचा तुटवडा नाही.त्यामुळे शौचालय बांधकामास गती यायला पाहिजे.डिसेंबर अखेर पर्यंत जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे आवाहन आरोग्य व शिक्षण समिती सभापती पी.जी.कटरे यांनी केले. पाणी धावतो, त्यामुळे त्याला मार्ग सापडतो. आपण सुध्दा तशाच प्रकारे कार्यप्रवण असलो पाहिजे. गृहभेटीच्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वच्छ भारत मिशनची योजना पोहचविण्याचे मत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती विमल नागपूरे यांनी केले. जिल्ह्यातील विभाग प्रमुखांना तालुका वाटप करण्यात आला आहे. निधी आहे, लाभार्थीआहेत, प्रशिक्षीत गवंडी आहेत. आता केवळ नियोजनबध्द कार्यकेल्यास जिल्हा हागणदारीमुक्त करणे सोपे होईल, असे मत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल.पुराम यांनी व्यक्त केले.आरोग्याकडे कुणीच लक्ष देत नाही. शौचालय हा आरोग्यासाठी आवश्यक आहे. शौचालयाचे बांधकाम व्हावे, यासाठीच कुटूंबस्तरावर संवादाचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. भेट दिल्यानंतर कुटूंबाला जिंकूनच येईन, असा सकारात्मक दृष्टीकोण असायला हवा, असे जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.ए.देशमुख म्हणाले.
आयकर के फर्जी अधिकारी गिरफ्तार
– वाशिम में की थी प्रापर्टी डीलर के यहां रेड
नागपुर. अक्षय कुमार की फिल्म स्पेशल 26 से नागपुर के ठगों को प्रेरणा मिली. फर्जी आयकर अधिकारी बनकर बड़े लोगों के यहां छापेमारी की. वाशिम में एक प्रापर्टी डीलर के यहां छापा मारने पर उनका भांडा फोड़ हुआ. इस गैंग में शामिल नागपुर के 3 युवकों को वाशिम पुलिस ने गिरफ्तार कर लिया है. पकड़े गए आरोपियों में पुलिस लाइन टाकली निवासी सूरज सुरेंद्र कोड़े, अनंतनगर, बोरगांव रोड निवासी संदीप रत्नाकर देशमुख और रामनगर निवासी प्रसाद अशोक आष्टीकर का समावेश है. वाशिम के थानेदार रविंद्र देशमुख ने इसकी पुष्टि की. देशमुख ने बताया कि पकड़े गए 3 आरोपी अपने अन्य 4-5 साथियों के साथ मिलकर वाशिम आए थे. आरोपियों ने सोपान काशीराम कंवर नामक प्रापर्टी डीलर के यहां छापा मारा. खुदको आयकर विभाग का अधिकारी बताकर आरोपी सोपान के घर में घुसे. सोपान ने उनसे आईडी पूछी तो उन्हें धमकाने लगे. कुछ ने फर्जी आईडी कार्ड भी बताए. सोपान के यहां आरोपियों को कुछ नहीं मिला तो वापस लौट गए, लेकिन उनकी गतिविधि संदेहास्पद थी.
आयकर विभाग से ली जानकारी
जांच अधिकारी सब इंस्पेक्टर अमित जाधव ने बताया कि सोपान ने शक होने पर नागपुर स्थित आयकर विभाग के कार्यालय में फोन किया. उनसे अपने घर हुई रेड की जानकारी मांगी. विभाग ने बताया कि इस तरह की कोई रेड नहीं हुई है और ना ही अधिकारी वाशिम गए हैं. सोपान का शक सही निकला और उन्होंने वाशिम थाने में शिकायत की. आरोपी 2 कारों में उनके घर पहुंचे थे. सोपान को उनकी एक कार क्र. एम.एच.49-बी.9381 का नंबर याद था. गाड़ी का नंबर मिलते ही पुलिस ने जांच शुरु की. उपरोक्त गाड़ी किसी मोरे नामक व्यक्ति के नाम पर थी. सूरज उनकी कार किराए पर ट्रिप मारने के लिए ले गया था. सब इंस्पेक्टर श्रीकांत विखे अपने दल के साथ नागपुर पहुंचे. सबसे पहले पुलिस ने सूरज को पूछताछ के लिए हिरासत में लिया. उसने अन्य 2 के नाम बताए. तीनों को जांच के लिए वाशिम ले जाया गया. सोपान ने उन तीनों की शिनाख्त की. 20 अगस्त को वाशिम पुलिस ने उनके खिलाफ मामला दर्ज किया.
आरोपियों को 4 दिन की पुलिस हिरासत मंजूर की है.
इस्तारी पूल प्रकरणः कारवाई दडपण्याच्या मार्गावर
गोंदिया- देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाèया इस्तारी ग्राम पंचायतीच्या वतीने हेरपार येथे पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. सदर पूल जूनच्या पहिल्याच पावसात वाहून गेले. असे असताना या प्रकरणी दोषींवर कारवाई करून आदिवासींना न्याय देण्याचे सोडून प्रकरण दडपण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चांना वेग आला आहे.
देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाèया इस्तारी ग्रामपंचायती अंतर्गत गेल्या आर्थिक वर्षात हेरपार येथील नाल्यावर २२ लाख खर्च करून पक्का पूल बांधण्यात आला. इस्तारी ग्राम पंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेवकाने ग्रामसभेत प्रस्ताव करून नियमबाह्यरीत्या हे काम मग्रारोहयो अंतर्गत मंजूर करवून घेतले. मोठ्या पुलाचे बांधकाम हे मग्रारोहयो अंतर्गत करता येत नसल्याचे नियम सांगणाèया अधिकाèयांनीच या बांधकामाला मंजुरी कशी दिली, हे एक कोडेच आहे. एकूण २८ मीटर लांबीच्या पूल बांधकामावर तब्बल २२ लाखाचा निधी उधळला गेला. उल्लेखनीय म्हणजे, अशोक राऊत या कंत्राटदाराने हे काम फेब्रुवारी महिन्यात सुरू करून जूनच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण केल्याचा आरोप यापूर्वीच गावकèयांनी केला होता. सदर पूल वाहून गेल्यावर कोणीही या पुलाची दखल घेण्यास तयार नव्हते. यासंबंधी साप्ताहिक बेरारटाईम्सने वृत्त प्रकाशित करताच सर्वत्र खळबळ माजली होती. यानंतर कंत्राटदाराने सारवासारव करण्याचा प्रयत्न देखील केला होता. सदर कामात अंदाजपत्रक तयार करण्यापासून तर मोजमाप पूर्ण करण्यापर्यंत अनियमितता झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले होते.
या कामाची तांत्रिक बाजूची जबाबदारी असणाèया एकाही अधिकाèयाने सदर कामाला एकदाही भेट दिली नसल्याचे गावकèयांनी सांगितले होते. या कामाच्या मस्टरवर बांधकामाचे वेळी गावात हजर नसलेल्या मजुरांच्या नावाने मजुरी वाटप केल्याचा सुद्धा आरोप करण्यात आला होता.
प्रकरण एवढे गंभीर असताना सुद्धा या कामाशी संबंधित अभियंते आपल्याच मग्रुरीत वावरताना दिसत आहेत. चौकशी सुरू असताना मनरेगामध्ये अशी बरीच कामे जिल्हाभर झाल्याने आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही, याच तोèयात संबंधित अभियंते व कंत्राटदार बोलताना दिसत होते.
या प्रकरणाची प्राथमिक चौकशी तहसीलदार देवरी, गटविकास अधिकारी देवरी व कार्यकारी अभियंता यांच्या त्रिसदस्यीय समितीने करून बांधकामात त्रुट्या असल्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला होता. मात्र, अद्यापही दोषींवर कार्यवाही करण्यात आली नाही वा पुलाच्या दुरुस्तीचे आदेश सुद्धा देण्यात आले नसल्याचे कळते. दरम्यान, इस्तारीच्या काही मोजक्या लोकांना पैशाचे आमिष दाखवून तक्रार न करण्याविषयी दबाव आणल्याचे बोलले जात आहे. यावरून सदर प्रकरण थंड बासनात गुंडाळण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, देवरी येथे झालेल्या आमदार संजय पुराम यांच्या आढावा बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याचे व आमदार महोदयांनी अधिकाèयांना कार्यवाहीचे तोंडी आदेश दिल्याचे वृत्त आले आहे. असे असले तरी ते लोकांना शांत करण्याचा एकूण प्रकार असून दोषींना वाचविण्यासाठी संबंधितांची हालचाल सुरू असल्याने आमदारांच्या आदेशाचे पालन अधिकारी करतात की त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवितात, हे येणारा काळच सांगेल. एवढे मात्र नक्की, आदिवासींचा विकास निधी पाण्यात जाण्याचीच शक्यता जास्त आहे.
प्रकाश जावडेकरांचा जावईशोधः नेहरूंना ठरविले हुतात्मा
छिंदवाडा (मध्य प्रदेश) – नेत्यांच्या वाचाळपणामुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या भाजपला आता केंद्रीय मनुष्यबळविकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी अडचणीत आणले आहे. येथे तिरंगा यात्रेमध्ये भाषण करताना जावडेकरांनी पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि सरदार पटेल यांना चक्क हुतात्मा ठरविले आहे. जावडेकरांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.
तिरंगा यात्रेत उत्साहाच्या भरात भाषण करताना जावडेकर म्हणाले, की 1857 मध्ये जी लढाई सुरू झाली ती पन्नास वर्षे चालली. पुढे ब्रिटिशांना हाकालून दिल्यानंतर देश स्वतंत्र झाला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व वीरांना माझा सलाम. मी त्यांना प्रणाम करतो. किती वीर झाले. सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, पंडित नेहरू, भगतसिंग, राजगुरू हे सर्वजण देशासाठी फासावर चढले. क्रांतिवीर सावरकर आणि आणखी अनेक स्वातंत्र्यसेनानींनी देशासाठी प्राणाचा त्याग केला.‘‘