नागतलावाच्या परिसरात करा जि.प.सदस्यांच्या निवासासाठी इमारत

0
10

shekhar patleतलावातील अतिक्रमण काढून सौंदर्यींकरणाचीही जि.प.सदस्य पटले यांची मागणी
गोंदिया,(berartimes.com)दि.२४-जिल्हा परिषद गोंदियाच्या सदस्यांकरीता निवासस्थानाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असलेल्या गोqवदपूर भागातील नागतलाव परिसरात शासकीय निवासस्थान तयार करण्यात यावे.त्यासोबतच या जिल्हा परिषदेच्या तलावाचे सौंदर्यिकरण करण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य व समाजकल्याण समितीचे सदस्य शेखर पटले यांनी केली आहे.
पटले यांनी यासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्षासह बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना २३ ऑगस्ट रोजी पत्र दिले.या पत्रात गोंदिया जिल्हा हा अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्हा असून जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी म्हणून काम करताना अनेकदा वेळ होते.त्यावेळी मुख्यालयात मुक्काम करण्यासाठी कुठलीच व्यवस्था उपलब्ध नसते.आणि रात्रीच्यावेळी दुर्गम व नक्षलग्रस्त भागात जाण्यासाठी सोय उपलब्ध होत नाही.त्यामुळे आमदारांसाठी ज्यापध्दतीने आमदार निवासाची सोय केलेली असते ,त्याच धर्तीवर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद सदस्यासांठी जि.प.सदस्य निवास इमारत उपलब्ध करून द्यावे असे म्हटले आहे.पटले यांनी यासाठी जिल्हा परिषदेच्या मालकीचा गोqवदपूर भागातील साई मंदिराला लागून असलेल्या नागतलाव परिसरात ही इमारत तयार करून नागतलावाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे असे म्हटले आहे.पाच ते सहा एकर क्षेत्रफळ असलेला जिल्हा परिषदेचा हा नागतलाव आज राईसमिलर्स सह अनेकांनी अतिक्रमण करून नष्ट करण्यास सुरवात केली आहे.त्यासोबतच या तलावात दूषित पाणी सोडले जात असल्याने मत्स्यव्यवसायही मोडकळीस आला आहे.त्यामुळे या तलावातील अतिक्रमण तातडीने काढून जि.प.ने आपल्या मालकीच्या या तलाव परिसराचे सौंदर्र्यीकरण करून जि.प.सदस्यासांठी निवासाची चांगली इमारत तयार केल्यास ५३ सदस्यांसाठी एक हक्काचे राहण्याचे ठिकाण उपलब्ध होणार असल्याचेही पत्रात म्हटले आहे.यासंबंधीचा ठराव येत्या स्थायी समितीच्या बैठकीनंतर सर्वसाधारण सभेत घेऊन शासनाला तसा प्रस्ताव सादर करावा असेही म्हटले आहे.