39.1 C
Gondiā
Thursday, May 15, 2025
Home Blog Page 6488

हिंमत असेल तर पुन्हा बहुमत सिद्ध करा- रामदास कदम

0

मुंबई-बहुमत नसून देखील केवळ आवाजी मतदानाने भाजपने विधानभवानात विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घटनेचा खून केला असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. भाजप विधानसभेत बहुमत सिद्धच करू शकलेले नाही, हिंमत असेल तर पुन्हा विश्वासदर्शक ठराव मांडून बहुमत सिद्ध करून दाखवा असे आव्हान रामदास कदम यांनी केले आहे.
आवाजी मतदानानंतर मतविभाजनाची मागणी विरोधीपक्ष म्हणून आमच्याकडून करण्यात आली होती परंतु, विधानसभा अध्यक्षांनी ही मागणी फेटाळून लावली आणि फडणवीस सरकारला मंजूरी दिली. हे घटनेच्या विरोधात आहे, असे रामदास कदम यांनी सांगितले.
राज्यपालांकडे विश्वासदर्शक ठराव विधानसभेत पुन्हा मांडण्यात यावा अशी मागणी शिवसेना करणार आहे. नियम धाब्यावर बसवून मंजूर करण्यात आलेल्या विश्वासदर्शक ठरावाविरोधात राज्यपालांची भेट घेणार असून यासाठी काँग्रेस नेत्यांनाही सोबत घेण्याबाबत चर्चा करणार असल्याचे रामदास कदम म्हणाले.
भाजपचेच ४० आमदार त्यांच्यासोबत नव्हते म्हणून आपले भांडे फूटू नये यासाठी भाजपने केवळ आवाजी मतदानाने ठराव मंजूर करून घेतल्याचा गौप्यस्फोट देखील रामदास कदम यांनी यावेळी केला.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी हरीभाऊ बागडे

0

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार हरीभाऊ बागडे यांची एकमताने निवड झाली आहे. हंगामी विधानसभा अध्यक्ष जीवा पांडू गावित यांनी विधानसभा अध्यक्षपदी हरीभाऊ बागडे यांची निवड झाल्याची घोषणा केली.
बागडे औरंगाबाद जिल्ह्यातील फुलांब्री विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच पक्षाचे प्रमुख नेते हरिभाऊ बागडे यांना अध्यक्षाच्या आसनापर्यंत घेऊन गेले. विधानसभा अध्यक्षांची एकमताने निवड करण्याची परंपरा कायम राखल्याबद्दल फडणवीस यांनी सर्व पक्षांचे आभार मानले.

बागडे यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करुन, फडणवीस सरकारने पहिला अ़डथळा पार केला आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.

राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपला अनुकूल असलेली भूमिका तसेच संख्याबळ पाहता काँग्रेस आणि शिवसेनेचा उमेदवार निवडून येणे कठिण होते तशीच शिवसेनेला काही मते फुटण्याचीही भिती होती. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसने आपले उमेदवार मागे घेतले. विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून विजयाराज औटी आणि काँग्रेसतर्फे वर्षा गायकवाड यांनी अर्ज दाखल केले होते.

विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेले हरिभाऊ बागडे हे सभागृहातील ज्येष्ठ सदस्य आहेत. शाळेत असताना पेपर विक्री, आमदार, मंत्री आणि विधानसभा अध्यक्ष असा बागडेंचा आजवरचा प्रवास राहिला आहे. त्यामुळे बागडेंच्या रूपाने सर्वसामांन्यांशी नातं सांगणारा नवा विधानसभेचा अध्यक्ष महाराष्ट्राला मिळाला आहे.

भाजपच्या हरिभाऊ बागडेंची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड

सत्तर वर्षीय बागडेंची राहणी आजही अत्यंत साधी आहे. पांढरा सदरा, धोतर आणि डोक्यावर गांधी टोपी हा त्यांचा ठरलेला पोषाख. सुरूवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करणा-या बागडे यांनी १९८५ साली पहिल्यांदा आमदारकीची म्हणून निवडणुक लढवली आणि ते विजयी झाले. त्यानंतर सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघातून पाचव्यांदा विधानसभेवर ते निवडून आलेले आहेत.

हरिभाऊ बागडे मराठा समाजाचे असून त्यांच्या निमित्ताने विधानसभेचे अध्यक्षपद मराठवाडय़ाला मिळाले आहे. १९९५ ते ९७ दरम्यान ते मंत्री होते आणि १९९७ ते ९९ दरम्यान अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपददेखिल त्यांनी सांभाळले. बागडे यांनी राजकारणात असूनही कधीच राजकारण न करता केवळ गुणवत्तेला महत्त्व दिले, असं त्यांचे कुटुंबिय सांगतात.

बालस्वच्छता मोहीम १४ तारखेपासून

0

गोंदिङ्मा – शाळांमध्ये स्वच्छता आणि आरो१⁄२य विषयाकडे विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी बालस्वच्छता मोहीम राज्यात १४ ते १९ नोव्हेंबरदरम्यान राबवण्यात येणार आहे. बालदिनी शाळांना सुटी असल्यास मोहिमेची सुरवात १३ नोव्हेंबरपासून करावयाची आहे. राज्याच्या शालेय शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांनी या मोहिमेंतर्गतच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक पाठविले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून स्वच्छ भारत हे ध्येय २०१९ पर्यंत साध्य करण्यात बालकांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. ङ्मा मोहिमेत जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालङ्मांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, म‘ुख्ङ्म काङ्र्मकारी अधिकारी डी.डी. qशदे ङ्मांनी केले आहे.
मोहिमेद्वारे स्वच्छ पाणी, परिसर स्वच्छता आणि त्याद्वारे शाळेत आरो१⁄२यदायी व प्रफुल्लित वातावरण निर्माण होईल, असे सरकारला अभिप्रेत आहे. मोहिमेंतर्गत जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रम घ्यावयाचे आहेत. वातावरणनिर्मितीसाठी स्वच्छता व आरो१⁄२यविषयक संदेश देणारे बॅनर, होर्डिं१⁄२ज, डिजिटल इलेक्टड्ढॉनिक्स फलक कल्पकरित्या तयार करून विविध कार्यालयांच्या मुख्यालयी आणि कार्यालयाच्या दर्शनी भागात लावायचे आहेत.
मोहिमेच्या प्रारंभी अथवा मोहिमेत स्वच्छता व आरो१⁄२यविषयक जनजागृती करणारे संदेश देणाèया विविध स्पर्धा घ्यावयाच्या आहेत. त्यात चित्रकला, निबंध, घोषवाक्ये, गायन, रांगोळी आदींचा समावेश असेल. शिक्षक व मुख्याध्यापकांनी स्वच्छता आणि आरो१⁄२यविषयक संदेश, त्यावर आधारित गोष्टी नियमित परिपाठावेळी सांगायच्या आहेत. स्वच्छताविषयक प्रार्थना, गीते, क्रमिक पुस्तकांमधील स्वच्छताविषयक संदर्भ याद्वारे मुलांशी संवाद साधायचा आहे. बालके जेवणापूर्वी व नंतर, स्वच्छतागृहाचा वापर केल्यावर हात स्वच्छ धूत असल्याची खात्री करावयाची आहे. हात धुण्याच्या जागी साबण, पाणी, हातरुमाल उपलब्ध असल्याची खात्री करावयाची आहे.
स्वच्छतादूत
प्रत्येक घरात स्वच्छताविषयक संदेश पोचवण्यासाठी मुलांची स्वच्छतादूत म्हणून निवड करावयाची आहे. त्यात प्रत्येक बालकाला तीन ते चार कुटुंबांना भेटी देऊन सदस्यांना स्वच्छता, आरो१⁄२य, नीटनेटकेपणा आदी माहिती देण्यासाठी प्रेरित करावयाचे आहे. हे काम स्वयंस्फूर्तीने व्हावे. कोणत्याही प्रकारची बंधने घालण्यात येऊ नयेत, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. या मोहिमेत ग्रामपंचायत सदस्यांपासून मंत्र्यांपर्यंतच्या लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्यावयाचे आहे.
मोहिमेचे वेळापत्रक
या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यानुसार दिवसनिहाय कार्यक्रम असे :
१४ नोव्हेंबर : स्वच्छ शाळा व परिसर
१५ नोव्हेंबर : स्वच्छ व संतुलित आहार
१७ नोव्हेंबर : स्वच्छ मी- वैयक्तिक स्वच्छता
१८ नोव्हेंबर : स्वच्छ पाणी
१९ नोव्हेंबर : स्वच्छ शौचालय

नरेंद्र मोदी सरकारने ओबीसी जनगणना नाकारली

0

नवी दिल्ली- जातीवर आधारित जनगणना करण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश रद्दबातल करण्याची केंद्र सरकारची मागणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मान्य केल्याने गेली काही वर्षे राज्यात या मागणीसाठी धडपड करणाèया सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांना अपयश आले आहे. देशात १९३१ नंतर जातीवर आधारित ओबीसींची जनगणना झालेली नाही. जनगणना करताना फक्त अनुसूचित जाती आणि जमातीच्या सदस्यांची नोंद केली जाते. सर्वच जातींची जनगणना केली जावी, अशी इतर मागासवर्गीय समाजाच्या नेत्यांची मागणी होती.
२०१० मध्ये ओबीसी समाजाच्या नेत्यांनी जातीनिहाय जनगणनेसाठी पुढाकार घेतला होता. संसदेचे अधिवेशन सुरु असतांना भाजपचे नेते स्व. गोपीनाथ म‘ुंडे ङ्मांनी पोटतिडकीने ओबीसींची जनगणना करण्ङ्मात ङ्मावी असा मद्दा रेटून धरला होता. ङ्मा जनगणनेसाठी मुलायमसिंग यादव, लालूप्रसाद यादव, शरद यादव, छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे आदींसह देशातील ओबीसी नेते यासाठी आघाडीवर होते. जातीनिहाय जनगणना केली जावी म्हणून २००८ आणि २०१० मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने जनगणना आयुक्तांना आदेश दिला होता. देशात इतर मागासवर्र्गीङ्म समाजाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्या तुलनेत या समाजासाठी तरतूद केली जावी, असा युक्तिवाद करण्यात आला होता.
केंद्र सरकारने मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्या. दीपक मिश्रा, रोहि१⁄२टंन नरिमन आणि यू. यू. लळित यांच्या खंडपीठाने मद्रास उच्च न्यायालयाचा जातीनिहाय जनगणनेचा आदेश रद्दबातल ठरविला. त्ङ्माम‘ुळे देशातील म‘ुळ निवासी असलेल्ङ्मा ओबीसी सम‘ाजाची संघप्रणित भाजपच्ङ्मा मोदी सरकारने जनगणनाच न करण्ङ्माचा घेतलेला निर्णङ्म ङ्मा स‘ाजाला भारतीङ्म राज्ङ्मघटनेने दिलेल्ङ्मा संवैधानिक अधिकारापासून वंचित ठेवण्ङ्माचा डाव आहे.
ओबीसी सम‘ाजाला धार्मक अंधश्रद्धेत गुंतवून ठेवून त्ङ्मांच्ङ्मा जनगणनेला संघाच्ङ्मा विचारधारेतून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र ‘ोदी ङ्मांच्ङ्मा सरकारने केलेला विरोध म्हणजे ओबीसी सम‘ाजाच्ङ्मा विकासाचे खच्चीकरण न्ङ्माङ्मालङ्माच्ङ्मा म‘ाध्ङ्मम‘ातून केला आहे.

अखेर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारले

0

नवी दिल्ली- मनोहर पर्रीकर, जे.पी.नड्डा, मुक्तार अब्बास नकवी यांच्यासह २१ नव्या चेहèयांचा मंत्रिमंडळात समावेश करत पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार अखेर पार पडला. १४ राज्यमंत्री, चार कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्यमंत्र्यांनी(स्वतंत्र प्रभार) यावेळी शपथ घेतली.
राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये रविवारी हा शपथविधीचा हा सोहळा पार पडला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या सर्व मंत्र्यांना शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचेसह केंद्रीय मंत्री, भाजपचे खासदार उपस्थित होते.

२१ नव्या मंत्र्यांचा समावेश

गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह जे.पी.नड्डा, सुरेश प्रभू, वीरेंद्र सिंह चौधरी यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. बंडारू दत्तात्रेय, राजीव प्रताप रुडी, महेश शर्मा यांनी राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार)पदाची शपथ घेतली. यासोबतच गिरिराज सिंग, मोहन कुंदारिया, सनवर लाल जट, हरिभाई पार्थीभाई चौधरी, राम कृपाल यादव, मुख्तार अब्बास नकवी, हंसराज आहिर ,डॉ. रामशंकर कटेरिया, वाय.एस.चौधरी (इंग्रजीमध्ये शपथ घेतली), जयंत सिन्हा, राजवर्धन सिंग राठोड, बाबूल सुप्रियो (इंग्रजीमधून शपथ घेतली), साध्वी निरंजन ज्योती, विजय सम्पला यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
शिवसेनेचा सहभाग नाही
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तार कार्यक्रमास रविवारी शिवसेनेने मात्र अनुपस्थिती दर्शवली.

विधानसभा अध्यक्षपदासाठी तिहेरी लढत

0

मुंबई- विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि काँग्रेसने आपले उमेदवार उभे केल्याने तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून ज्येष्ठ आमदार हरिभाऊ बागडे, शिवसेनेकडून आमदार विजय औटीं तर काँग्रेसकडून आमदार वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.वर्षा गायकवाड या मुंबईतील धारावी मतदारसंघाच्या आमदार आहेत. तर विजय औटी हे पारनेरचे आणि हरिभाऊ बागडे हे फुलंब्रीचे आमदार आहेत.
विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड बुधवारी होणार आहे. यासाठी मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. मात्र मुदत वाढवून देण्याबाबत शिवसेने सभागृहात गोंधळ घातल्याने ही मुदत तीन वाजेपर्यंत वाढवून देण्यात आली होती.
याआधी विधानसभा अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही तर काँग्रेस आपला उमेदवार देईल असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार न दिल्याने काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांनी अर्ज दाखल केला आहे.आता राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्ङ्मक्षाच्ङ्मा निवडणुकीत कुणाच्ङ्मा बाजूने जाते ङ्माकडे लक्ष लागले आहे.

बँक कर्मचा-यांचा बुधवारी देशव्यापी संप

0

नवी दिल्ली – वेतनावाढीसंदर्भातील मागणीवर कोणताही तोडगा न निघाल्याने बँकातील कर्मचा-यांनी बुधवारी देशव्यापी संप पुकारला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (यूएफबीयू) आणि इंडियन बँक्स असोसिएशन्स (आयबीए) यांच्यात सोमवारी वेतनवाढीसंदर्भात चर्चेची १४ वी फेरी पार पडली. मात्र या चर्चेत काहीही निष्पन्न न झाल्याने १० लाख बँक कर्मचा-यांनी देशव्यापी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
बुधवारी १२ नोव्हेंबरला हे सर्व कर्मचारी देशव्यापी संप करणार आहेत. यामुळे चेक वठवणे तसेच एटीएम सेवांवर या संपाचा परिणाम होऊ शकतो. वेतनवाढीसाठी गेले वर्षभर बँक संघटना आंदोलन करत आहेत. बँक संघटनाकडून २३ टक्के वेतनवाढीची मागणी केली जात आहे. मात्र आयबीएङ्कने ११ टक्के वाढीचाच प्रस्ताव कायम ठेवल्याने बँक संघटनांनी संप करण्याचे ठरवले आहे.
आम्ही वेतनवाढीची मागणी २५ टक्क्यांवरुन २३ टक्क्यांवर आणली. मात्र त्यानंतरही आयबीए ही मागणी मान्य करत नाही. आयबीए त्यांच्या ११ टक्के वाढीच्या प्रस्तावावर कायम आहे जे पुरेसे नाही असे नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्सचे सरचिटणीस अश्विनी राणा यांनी सांगितले.
१२ नोव्हेंबरला होणा-या देशव्यापी संपासंदर्भातील नोटीस यूएफबीयूने आयबीएला दिली असून ऑल इंडिया स्टेट बँक ऑफिसर फेडरेशन आणि ऑल इंडिया स्टेट बँक स्टाफ फेडरेशनही या संपात सहभागी होणार असल्याचे नोटिशीमध्ये नमूद करण्यात आले आहे. देशभरात सार्वजनिक क्षेत्रातील २७ बँका असून यात आठ लाख कर्मचारी काम करीत आहेत. संपूर्ण देशभरात या बँकांच्या ५० हजार शाखा आहेत.

आतातरी भाजप आमदारांना ‘यश मिळेल काय?

0

गोंदिया- गोंदिया जिल्हा परिषदेतील वर्ग-४ चे पदभरती प्रकरणी विरोधी पक्षात असताना भाजपच्या आमदारांनी चांगलेच आकाशपाताळ एक केले होते. तरीही तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाèयांच्या बेलगाम कार्यशैलीला आवर घालण्यात त्यांना यश आले नव्हते. या भरती संदर्भात चौकशी समितीने त्यांचेवर कार्यवाही संदर्भात अनुकूल अहवाल दिला असताना सुद्धा शासन-प्रशासनाने मुकाअवर कोणतीही कार्यवाही केली नाही. आता केंद्रासह राज्यातील सत्ता हातात आल्याने भाजपच्या आमदारांना त्या गैरमार्गाने केलेल्या भरतीप्रकरणी कार्यवाही करण्यात यश मिळेल का? असा सवाल जिल्हावासीयांना पडला आहे.

गोंदिया जिल्हा परिषदेतील नियमबाह्य पदभरती प्रकरण

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागांतर्गत वर्ग ४ची ३५ पदे जाहिरातीनुसार भरावयाची होती. मात्र, प्रत्यक्षात ३१ पद भरण्याची कारवाई करण्यात आली. परंतु, याव्यतिरिक्त प्रतीक्षायादीवर असलेल्या १३ उमेदवारांना नियमबाह्य प्रवर्गनिहाय नियुक्ती देण्याचा प्रकार तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.यशवंत गेडाम यांनी करून नोकरभरतीतील मोठा घोटाळा केला. या घोटाळ्याची सखोल चौकशी विभागीय आयुक्तांच्या समितीने केली. मात्र, त्या चौकशी समितीने दिलेल्या अहवालावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. विरोधी पक्षात असताना भाजपचे आमदार हे प्रकरण उचलून धरत सरकारची कोंडी करीत होते. आता तेच सत्तेत असल्याने याप्रकरणातील दोषी अधिकारी व त्या प्रकरणात सहभागी पदाधिकारी कोण होता, याचा शोध घेऊन त्यांची चौकशी होईल काय? अशा प्रसन्न उपस्थित झाला आहे.
वर्ग ४ संवर्गामध्ये परिचर भरतीमध्ये ३५ पदाची जाहिरात देऊन प्रत्यक्षात ४५ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहे. अतिरिक्त भरलेल्या पदामध्ये अजा १, अज २, भजब १, भजक १ , भजड १ , इमाव १ महिला, खुला ६ (२ महिला) अशा १३ पदाचा समावेश आहे. विशेष म्हणजे अधिकची पदे रिक्त होती, याची माहितीच प्रशासनाला नाही. या पदांना जिल्हा निवड समितीची मंजुरी नसताना त्या १३ जणांना गेल्या दोन वर्षापासून देण्यात येणारे वेतन कुठल्या निधीतून दिले जात आहे. जर त्यांची नियुक्ती अवैध असेल तर त्यांच्या वेतनाचा पैसा कुणाच्या वेतनातून कपात केला जाणार आहे.
विशेष म्हणजे ४४ परिचर पदासाठीची कुठलीही नस्ती सामान्य प्रशासन विभागाने सादर केली नसल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट आहे. त्यातही ज्या सि१⁄२मा टेक इंडिया कंपनी मुंबई मार्फत नोकरभरती करण्यात आली त्या संस्थेला कुठल्या शासन तरतुदीनुसार आदेश देण्यात आले, असा प्रश्न उपस्थित झाल्याने त्या काळातील सर्वच नोकरभरतीची प्रकिया संशयाचा भोवèयात आली आहे. ही प्रकिया चुकीची असल्याचे लक्षात असतानाही सत्तेत असलेल्या भाजपने यावर अंकुश लावला नाही.
त्यातच लेखा संवर्गात कनिष्ठ लेखा अधिकारी या पदावर पदोन्नतीच्या कोट्यातील २ पदांवर सरळसेवेने नियमबाह्य नियुक्ती सुद्धा याच काळात देण्यात आली असून या पदावरील उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याचे स्पष्ट निर्देश ग्रामविकास मंत्रालयाने सप्टेंबरमध्ये तर आयुक्तांनी मे मध्येच जिल्हा परिषदेला पत्र दिल्यानंतरही वित्तविभागातील तत्कालीन अधिकाèयाने त्या दोन उमेदवारांचा बचाव करण्यासाठी कारवाई केली नसल्याचे दिसून आले. सरळसेवा भरतीने कनिष्ठ लेखा अधिकारी या संवर्गातील प्रवर्गात १ पद खुल्या प्रवर्गातील रिक्त होते. ते पद भरण्यासाठी जाहिरातही देण्यात आली होती. त्यानुसार, पद भरण्यात आले. परंतु, पद भरलेले असतानाही तत्कालीन सीईओ यांनी स्वपातळीवर गोपाल शर्मा व कु. पायल मोर यांची क.ले.अ पदावर नियुक्ती केली. वित्त विभागाने पद रिक्त नसल्याचे २१ जुलै १२ रोजी कळविल्यानंतरही १८/१०/१२ रोजी सदर पदे रद्द करण्यासंबंधीची विनंतीही करण्यात आली होती. तरीही ते नियुक्ती आदेश रद्द करण्यात आले नाही. त्यामुळे चौकशी समितीने स्पष्टपणे आयुक्तांनी पद रद्द करण्याचे निर्देश द्यावे, असा उल्लेख असतानाही त्याकडे काणाडोळा करण्यात आला आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून बागडे

0

मुंबई-विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी भाजपने फुलंब्रीतून निवडून आलेले पक्षाचे ज्येष्ठ आमदार हरिभाऊ बागडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी मंगळवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला.विधानसभा अध्यक्षाची बुधवारी निवड होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार दिल्यास त्याला आम्ही पाठिंबा देऊ, अशी भूमिका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी घेतली आहे. शिवसेनेच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवार दिला नाही, तर कॉंग्रेस विधानसभा अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार देईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत मंगळवारी दुपारी बारा वाजेपर्यंत होती. मात्र, शिवसेनेनी त्याला आक्षेप घेतला. दुपारी बारा वाजेपर्यंत सदस्यांचा शपथविधी पूर्ण होणार नाही. त्यामुळे अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवा, अशी मागणी शिवसेनेनी केली. त्यांनी या मागणीवरून सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर अर्ज भरण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत वाढविण्यात आली.

बोइंग एमआरओ, टीसीएसचे जानेवारीत उद्‌घाटन!

0

नागपूर – मिहानमधील महत्त्वाकांक्षी प्रकल्प बोइंगच्या देखभाल आणि दुरुस्ती केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) काम अंतिम टप्प्यात आहे. बोइंगच्या टॅक्‍सी वेचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण होणार असल्याने नवीन वर्षाच्या प्रारंभी या दोन्ही प्रकल्पांचा श्रीगणेशा होण्याची दाट शक्‍यता आहे. बोइंगच्या विमानाच्या देखभाल व दुरुस्तीच्या परिचालनासाठी लागणाऱ्या टॅक्‍सी वेचे कामात शिवणगाववासींनी अडथळा आणला होता. त्यामुळे हे काम रखडले असताना आता ते काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकल्पातील अडचणी त्वरित सोडविण्याचा विडा उचलला आहे. वीजपुरवठ्यासह सर्वच तांत्रिक अडचणी सोडविण्याचा सपाटा सुरू झाला आहे. यामुळेच कंपन्यांच्या संचालकांमध्ये चैतन्य निर्माण झाले असून, बोइंग आणि टीसीएसने लवकरात लवकर उद्‌घाटन करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीए भारतातील इतर ठिकाणांसह नागपुरातील प्रकल्पात युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने मुलाखती घेत असल्याची माहिती आहे. बोइंगच्या मुख्य इमारत आणि ऍपरॉनचे काम पूर्णत्वाकडे आहे.
जागतिक मंदीसह अनेक तांत्रिक कारणांमुळे आधीच मिहान प्रकल्पाच्या कामाच्या प्रारंभाला उशीर झाला आहे. बोइंगच्या एमआरओने 50 एकर जागा घेतली. तेव्हा 2012 मध्ये एमआरओचे बांधकाम पूर्ण करणार असल्याचे जाहीर केले होते. त्या मुहूर्तानंतर तीन मुहूर्त जाहीर केले. तेही हुकले. आता जानेवारी महिन्याचा मुहूर्त सापडला आहे. या प्रकल्पासाठी 500 कोटींची गुंतवणूक केली आहे. यामुळे या मुहूर्ताकडे सर्वांचेच लक्ष्य आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) प्रकल्पात आठ इमारती बांधणार आहे. त्यातील एका इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या इमारतीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पहिल्या इमारतीत 1200 जणांना बसण्याची सोय आहे. त्याचा पायाभूत सुविधा पूर्ण झाल्या आहेत. अंतर्गत सजावटीचे कामही पूर्ण झालेले आहे. विजेच्या प्रश्‍नासह काही तांत्रिक अडचणी सुटल्यानंतर या युनिटमधील एका इमारतीतील कामाचा श्रीगणेशा होण्याची शक्‍यता एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. टीसीएसचे पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर चार हजार लोकांना रोजगार देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. यामुळे नागपूरसह विदर्भातील युवकांना रोजगार मिळेल आणि बांधकाम क्षेत्रालाही सुगीचे दिवस येण्याचे संकेत आहे.