दरोडा घालणार्या 5 आरोपींना 22 लाखाच्या मुद्देमालासह अटक,देवरी पोलिसांची कारवाई

0
215

सुभाष सोनवणे
चिचगड,दि.१५ः- मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील देवरी पोलीस ठाणे हद्दीतील मिलन ढाब्याजवळ नागपूरवरुन गडचिरोलीला जाणार्या ट्रकला थांबवून ट्रकचालकासह ट्रकमधील मजुरांचे मोबाईल हिसकावून ट्रक ताब्यात घेऊन पळविणार्या आरोपींना देवरी पोलिसांनी शिताफिने पकडून 5 आरोपीसह सुमारे 22 लाखाचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी शुभम सोनकर 29 वर्षे , विशाल कुशवाहा 22 वर्ष ,रोशन सिंग 25 वर्ष ,करण सिंग 25 वर्ष , लोकेश सिंग  24 वर्षे सर्व राहणार भिलाई यांना दि. 15/9/2021 सकाळी सहा वाजून बारा वाजता अटक करुन त्यांच्याकडून चोरी गेलेला ट्रक क्रमांक MH 42 G 6617 मोबाईल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले टाटा झेस्ट वाहन क्रमांक CG 07BK 5180 असा एकूण 22 लाख 23 हजार रुपये जप्त करण्यात आले आहे.
सविस्तर असे की 14 सप्टेंबरच्या दुपारी 12 वाजेच्या सुमारास फिर्यादी मोहम्मद इरशाद मोहम्मद फारुक कुरेशी (वय 28,सिवनी मध्यप्रदेश) हा ट्रक क्रमांक MH 42 G 6617 ने दोन मजूरासह नागपूर येथून गडचिरोली जिल्ह्यातील बोरी येथे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 ने जात असताना सायंकाळी 16:00 वाजेच्या सुमारास देवरी येथे मिलन ढाब्याजवळ एका पांढर्‍या रंगाची टाटा कंपनीची झेस्टा चारचाकी वाहन क्रमांक CG-07 BK 5180 ट्रकच्या जवळ येऊन ट्रक थांबवण्याचा इशारा केला.त्यावर ट्रकचालकांने ट्रक बाजूला घेत ट्रक थांबवला असता सदर चारचाकी वाहनातील एक इसम ट्रकमध्ये चढून ट्रकची चाबी ताब्यात घेत ट्रकचालकास उतरवले.यावर फिर्यादी ट्रकचालकाने सदर इसमास आपण कोण आहात व ट्रक का थांबविले असे विचारले असता आम्ही गाडी सीज करणारे असल्याचे सांगितले.परंतु गाडीचे फायनान्स इंस्टॉलमेंट 5 सप्टेंबर 2021 लाच भरले असल्याचे फिर्यादीच्या लक्षात येताच त्या इसमावर संशय आल्याने ट्रक मालकाच्या मुलाला फोन लावले असता सदर इसमाने फिर्यादीचे मोबाईल हिसकावून मारहाण केली.सोबतच ट्रकमधील मजुरांचेही मोबाईल हिसकावून आपल्याकडे ठेवले.त्या चारचाकी वाहनातील एकाने ट्रक ताब्यात घेतले व ट्रक डायव्हरला चारचाकीवाहनात बसवून छत्तीसगडच्या दिशेने निघाले. दरम्यान ट्रक मालकाने फिर्यादीला फोन लावले असता तो फोन उचलत नसल्याने व नंतर चालक व मजुरांचे फोन बंद आल्याने ट्रक मालकाने देवरी येथे राहणारा भाऊ रियाज कुरेशीला सांगितले.रियाजने सदर बाब देवरी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरिक्षकांना सांगितली.त्यानंतर पोलीस निरिक्षक सिंगणजुडे यांनी पोलीस अधिक्षक व अप्पर पोलीस अधिक्षकांना झालेल्या प्रकरणाची माहिती दिली.वरिष्ठांच्या सुचनेनंतर पोलीस निरिक्षक सिंगणजुडे यांनी पोलीसांचे तपास पथक तयार करुन छत्तीसगडकडे जाणार्या राष्ट्रीय महामार्गावर रवाना केले.दरम्यान सदर ट्रक छत्तीसगड राज्यातील चिचोला गावापुढे जात असल्याचे लक्षात येताच ट्रक थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला असता चारचाकी वाहनातील लोकांनीही ट्रक न थांबविता तो पळवून नेण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलिसांनी योग्य नियोजनाच्या माध्यमातून चारचाकी झेस्टावाहनाला आधी ताब्यात घेत हायवेवरील धाब्यावर नेले.आणि चिचोला पोलिसांना सदर प्रकरणाची माहिती देत त्यांच्या मदतीने ट्रकसह चारचाकी वाहनातील आरोपींना ताब्यात घेतले. जाण्याचा प्रयत्न करीत होता. ट्रक सोबत जात असलेले टाटा झेस्ट वाहनाच्या सुद्धा संशय आल्याने ट्रक व झेस्टा वाहन यांना मोठ्या शिताफीने थांबून जवळच्या धाब्यावर घेऊन गेले त्यांनंतर पोलीस स्टेशन चीचोला येथील ठाणेदारांना माहिती देऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने ट्रक व झेस्टा वाहन व त्यातील इसमांना व आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर ट्रक व वाहन व त्यातील इसमांना पोलीस स्टेशन देवरी येथे आणण्यात आले.फिर्यादी नामे मोहम्मद इरशाद मोहम्मद फारुक कुरेशी 28 वर्ष राहणार शिवनी मध्य प्रदेश यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन देवरी येथे आज 15 सप्टेंबरला कलम 395, 365 भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नरेश उरकुडे हे करीत आहेत. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर उपविभागीय पोलिस अधिकारी जालंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, पोलीस उपनिरीक्षक नरेश उरकुडे , पोलीस शिपाई हातझाडे ,पोलीस शिपाई जागळे पोलीस स्टेशन यांनी केली.