घरफोडीतील 2 आरोपींना अटक ,44,500 चा माल केला हस्तगत

0
36

गोंदिया,दि.03ः- अर्जुनी मोरगाव पोलीस ठाणेतंर्गत येत असलेल्या शहरातील चिंतेश्वर सदाशिव लंजे यांच्या नवीन घराचे बांधकामावरील खोलीचे दार तोडून सुमारे 45 हजाराचा मुद्देमाल लंपास करण्याची घटना 25 आँक्टोबंर ते दि.01/11/2022 दरम्यान दिवाळीच्या सुट्टीत घडली.फिर्यादी हे गावावरुन परतल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या नविन घराचे बांधकामावरील एका खोलीचा ताला तोडुन लोखंडी ऍगल पाईप मोठे 2.5 बाय 1 ईंचचे 10 नग किमत 28000/- रु 2) लोखंडी ऍगल पाईप लहान 1 बाय 1 ईंचचे तीन बंडल किमती 16500/रु चा माल असे एकुण 44,500/- रु. चे साहित्य चोरून नेल्याची तक्रार नोंदवली.त्या तक्रारीच्या आधारे ठाणेदार सोमनाथ कदम यांच्या निर्देशावर पोलिसांनी शोध मोहिम सुरु करीत दोन आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून सर्वमुद्देमाल हस्तगत करुन न्यायालयात हजर केले.

अर्जुनी मोर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांमध्ये दोन आरोपी  योगेश घनश्याम डोंगरवार वय 21 वर्ष रा. अर्जुनी मोरगाव ल अन्वेष चंद्रशेखर सोनवणे वय 23 वर्ष रा. अर्जुनी मोरगाव यांना अटक केली.अटक आरोपींकडे कसून तपास करून चोरी केलेला सर्व मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल जप्त करण्यात आलेली आहे.

दोन्ही आरोपींविरोधात सक्षम पुरावा गोळा करून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी अर्जुनी मोर यांच्या न्यायालयात 24 तासाच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे.या गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगळे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर व उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनी मोर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोमनाथ कदम, परि. पोउपनि. संतोष गुट्टे, पोहवा रोशन गोंडाने, पोना. रमेश सेलोकर, पोना. राहुल चिचमलकर, पोशि.श्रीकांत मेश्राम, पोशि. गौरीशंकर कोरे, पो. ना. विजय कोठांगले, सायबर सेल गोंदियाचे पोलीस नाईक दीक्षित दमाहे यांनी केृला आहे.