ब्रेकींगः जावयाने सासऱ्यासह पत्नी मुलाला पेट्रोल टाकून जाळले,सासऱ्याचा मृत्यू

0
129

गोंदिया,दि.15ः– गोंदिया शहरानजीक असलेल्या रामनगर पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या सुर्याटोला येथे जावयाने आपल्या सासऱ्यासह पत्नी व मुलाला पेट्रोल घालून जाळल्याची घटना बुधवारच्या रात्री 1 वाजेदरम्यान घडली.या घटनेत आरोपीचा सासर देवानंद मेश्राम वय 52 रा.सुर्याटोला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर आरोपीची पत्नी आरती किशोर शेंडे(वय 35,रा.भिवापूर,ता.तिरोडा) व मुलगा जय किशोर शेंडे(वय 5 रा.भिवापूर,ता.तिरोडा) हे 90 टक्के जळाल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात उपचाराकरीता हलविण्यात आले आहे.आरोपी जावई किशोर श्रीराम शेंडे(वय 40रा.भिवापूर,ता.तिरोडा)हा घटनास्थळावरून फरार झालेला आहे.मिळालेल्या माहितीनुसार आरोपी किशोर शेंडे यांच्यासोबत दररोज भांडण होत असल्याने व मारहाण होत असल्याने पत्नी आरती हिने सासर सोडून गेल्या वर्षभरापासून माहेरी सुर्याटोला येथे राहत होती.या दरम्यान पोटापाण्याची सोय व्हावी याकरीता येथील सहयोग रुग्णालयात ती नोकरी करीत होती.घटनेच्या दिवशी जेवण करुन आरोपीचे सासरे देवानंद मेश्राम हे बाहेर व पत्नी व मुलगा आत झोपले असताना आधी सासऱ्याच्या अंगावर पेट्रोल घालून आग लावली.त्यानंतर आत झोपलेल्या पत्नी व मुलाच्या अंगावरही पेट्रोल घालून आग लावून पसार झाल्याचे वृत्त आहे.याप्रकरणात रामनगर पोलिसांनी तपास सुरु केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.या घटनेने संपुर्ण सुर्याटोला परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.