पॅराडाईज रिसॉर्टमध्ये अश्लिल नृत्य पोलिसांची कारवाई,६ मुलींसह १२ जणांना अटक

0
29

भंडारा येथील प्रतिष्ठित डाँक्टरासह अनेकांचा समावेश

उमरेड- शहरापासून सहा कि.मी अंतरावर असलेल्या तिरखुरा येथील कन्हांडला अभयारण्य परिसरात असलेला पॅराडाईज रिसोर्ट मध्ये ३१ मे च्या मध्यरात्री सहा मुली डिजे तालावार नृत्य सादर करीत होते. तर भंडारा व नागपूर येथील प्रतिष्ठीत व्यापारी वर्ग पैशाची उधळण करीत असल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी १२ जण व सहा मुलीवर कारवाई करीत ३,७२,३२४ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
पॅराडाईज रिसॉर्ट हे जंगल व्याप्त परिसरात असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने मोठया प्रमाणात गैरप्रकार होत असल्याची माहीती पोलिसांना मिळत होती. यावर पोलिस विभाग लक्ष ठेवून होते. दी. ३१ मे च्या मध्यरात्री १.४५ ते ३ वाजताच्या सुमारात सहा मुली डीजे च्या तालावर अश्लील नृत्य सादर करीत होते. तर नागपूर, वर्धा, मौदा, भंडारा येथील प्रतिष्ठीत मंडळी दारु पिवून पैशाची उधळण करीत धिंगाणा घालत होते. या प्रकाराची गुप्त माहीती स्थानिक गुन्हे शाखेला माहित होताच पोलिसांनी ताफ्यासह कारवाई करीत सहा नृत्यांगंणा मूली व १२ जंणावर धाडसाची कारवाई केल्याने उपस्थिता ची एकच तारबळ उडाली. कारवाई करण्यात आलेल्या आरोपी मध्ये ललीत (गुड्डू) नंदलाल बैस, भंडारा, अभय (बाल्या) भागवत, भंडारा, डाॅ. गोपाल सत्यनारायण व्यास, भंडारा, समिर कमलाकर देशपांडे, नागपूर, पंकज तुळशिदास हाठीठेले, जरीपटका नागपूर, मनिष ओमप्रकाश सराफ वर्धा, रजत कोलते मौदा, मंगेश सुरेश हरडे, नागपूर, आशुतोष शेषराव सुखदेवे, केशव रविंद्र तरडे मौदा, पारस ज्ञानेश्वर हाठीठेले, नागपूर, अरुण अभय मुखर्जी मनिष नगर, नागपूर यांचेवर विविध भादवि कलमान्वये कारवाई करीत घटना स्थळ वरून डिजे साहित्य, लॅपटॉप विदेशी दार बाटल व नगढी १ लाख ३० हजार ३०० रुपये असा एकून ३,७२,३०० रुपयाचा चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई पो. उपनिरीक्षक आशिष मोरघडे यांचा पुढारात करण्यात आली. पुढिल तपास ठाणेदार प्रमोद घोंगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक रविद्र वाघ करीत आहे.