सीसीटीव्हीच्या आधारे चोर अटकेत

0
20

अजुर्नी-मोर(संतोष रोकडे),दि.29ः : तालुक्यातील महागाव येथील सिध्दी सिध्दी बीअरबार फोडून चोरी करणाड्ढया तीन आरोपींना अजुर्नी-मोर पोलीसांनी २४ जून रोजी चंद्रपूर येथून अटक केली. तीनही आरोपी सराईत गुन्हेगार असून सीसीटीव्ही फुटेजच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. मनी कालीपद बिश्‍वास, रा. श्यामनगर, रोहीत उर्फ राजू दिनेश शर्मा, रयतवाडी वॉर्ड व हसंराज उर्फ शुभम वसंत त्रिसुले रा. जयतवाडी वॉर्ड अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून १ लाख १२ हजार रुपयांचा मुद्येमाल जप्त केला आहे. महागाव येथील रिध्दी सिध्दी बारचे मेन गेट तोडून आरोपींनी गल्ल्यातील ३ हजार रोख व इंग्रजी दारूच्या १0 पेट्या चोरी केल्या होत्या. याप्रकरणी फियार्दी ईश्‍वरदास बडवाईक यांच्या तक्रारीवरून अजुर्नी-मोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, पोलीसांनी आरोपींना पकडण्यासाठी बारमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये मिळालेले माहिती चंद्रपूर, गडचिरोली आदी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात पाठविली. यादरम्यान, आरोपी हे चंद्रपूर येथील असल्याचे निष्पन्न होताच पोनि शिवराम कुंभरे यांच्या मार्गदर्शनात सहा. पोनि अनिल कुंभरे, सहा. फौजदार माणिक खरकाटे, पो.हवा. राजेंद्र मिश्रा, नापोशि विजय कोटांगले यांनी चंद्रपूर गाठून तीनही आरोपींना ताब्यात घेतले. तसेच आरोपींकडून चोरी केलेल्या दारूच्या पेट्या आणि चोरीसाठी वापरलेली इंडिका कार असा एकूण १ लाख १२ हजार रूपयांचा मुद्येमाल ताब्यात घेतला. दरम्यान, आरोपींनी सदर दारू जिल्ह्यात विक्रीकरीता चोरी केल्याचे कबूल केले. विशेष म्हणजे तीनही आरोपी हे अट्टल गुन्हेगार आहे.