खवल्या मांजरच्या नावावर व्यवहार करणारे आरोपी गजाआड

0
50

सडक अर्जुनी,दि.११ : तालुक्यातील कोका अभियारण्य दुधारा येथून  सहा आरोपींनी पैसे अधिक मिळण्याच्या नादात खवल्या मांजर पकडून त्याला व्यवहार धानोरा येथे करीत होते, ही माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाने त्या आरोपींना पकडून वन्यजीव  कायद्यातंर्गत कारवाई केल्याची घटना ९ जुलै रोजी घडली.

ग्रामीण भागात वन्यप्राणी तसेच ग्रामीण परिसरात मुक्तसंचार करणार्‍या अनेक प्राण्यांपासून गुप्तधन मिळते, या कल्पनेतून वन्यप्राण्यांची शिकार अथवा चोरी होत असते. असाच प्रकार ९ जुलै रोजी धानोरा येथे उघडकीस आला. आरोपी राजेश रामु टेकाम (३५), ता.जि.भंडारा, सेवकराम लक्ष्मण पेंदाम (४१) रा.धानोरी, योगराज रामप्रसाद मस्करे (३८) रा.कामठा ता.गोंदिया, अमित अर्जुन सलामे (१८) रा.कामठा ता.गोंदिया, सुनिल श्रीराम सतीमेश्राम (४१) रा. खडकी ता.मोहाडी जि.भंडारा, देवाजी हरीभाऊ पंचधरे (४७) रा. खडकी, जि.भंडारा यांनी कोका अभयारण्य दुधारा येथून खवल्या मांजर पकडला. खवल्या मांजरवर पैशाचा व्यवहार करण्यासाठी धानोरा येथे हे आरोपी आले असता वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाचे एम.आर.शेख, जी.एस.राठोड, पी.व्ही.खुले, एस.के.खांडेकर, वाय.झेड.वलथरे, अरविंद बडगे, आर.आर.काळबांधे, के.एस.भोयर, के.झेड.बिजेवार, संगीता काटेवार, कोमल हत्तीमारे, देवानंद कोसबे, जागेश्वर भोंडे, भरत बहेकार, मुलचंद मडावी आदिंनी या आरोपींना पकडून वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा नोंद केला