दोन पॉकीटमार आरपीएफच्या ताब्यात

0
6

गोंदिया,दि.03ः-  सिंदेवाही ते डोंगरगढ प्रवासादरम्यान प्रवासी मोहन देव्हारी रा.राजोली ता.मुल यांचे पॉकीट १ नोव्हेंबर रोजी दोन संशयास्पद चोरट्यांनी उडविले होते. याप्रकरणाची नोंद रेल्वे पोलिसात करण्यात आली. या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरपीएफच्या टास्क फोर्सने आज (ता.२) शोधमोहीम राबविली. दरम्यान, डोंगरगढ ते गोंदिया प्रवासदरम्यान दोघे जण संशयास्पद हालचाल करताना दिसून आले. त्यांना ताब्यात घेवून फियार्दीकडून ओळख पटविली असता ते चोरटे असल्याचे निष्पन्न झाले. खेमू दुलीचंद नागपुरे (३३) रा.भिलाई, करमसिंह कालासिंह पंजाबी (५२) रा. खुर्शिपार शिवाजीनगर, दुर्ग असे ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
सविस्तर असे की, १ नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील राजोली येथील मनोहर देव्हारी व त्यांची पत्नी मंगला देव्हारी हे दोघे जण सिंदेवाही ते डोंगरगढपयर्ंत प्रवास करीत होते. कुर्ला-शालिमार रेल्वेगाडीवर चढत असताना दोन संशयित चोरट्यांनी मनोहर देव्हारीच्या खिश्यातील पाकीट मारले. दरम्यान त्यात दोन हजार रूपयाचे दोन नोट उडविले होते. या घटनेची नोंद गोंदिया रेल्वे पोलिसात करण्यात आली. पोलिसांनी घटनेची गांभीयार्ने दखल घेत गोंदिया रेल्वे स्थानकाचे प्रधान आरक्षक मडावी यांनी गोंदिया रेल्वे स्थानकावर दोन लोक संशयास्पद हालचाल करीत असल्याची माहिती आरपीएफला दिली.
या माहितीच्या आधारावर आरपीएफच्या टास्क फोर्सने रॉकेश खेमू दुलीचंद नागपुरे (३३) व करमसिंह कालासिंह पंजाबी (५२) या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, माहिती देण्यास ते टाळाटाळ करू लागले. यावरून फियार्दी देव्हारी यांना बोलाविण्यात आले. फियार्दीकडून पॉकीटमारांची ओळख पटविण्यात आली असता ते दोघे पाकीट असल्याचे निष्पन्न झाले. यावरून कसून चौकशी केली असता आरोपीच्या खिश्यात २ हजाराची नोट व आधार कार्ड प्राप्त झाले. याप्रकरणी गोंदिया रेल्वे पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.