अवैधरित्या शस्त्र बाळगणार्या दोघांना उमदी पोलिसांनी केली अटक

0
29

संख(राजेभक्षर जमादार),दि.01ः– जत तालुक्यातील उमदी  बस स्थानक परिसरात अवैधरित्या शस्त्र(बंदुक)बाळगल्याप्रकरणी उमदी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.ताब्यात घेतलेल्यामध्ये राकेश मधुकर कदम(वय 32, रा.लांडगेवाडी ता.कवठेमंकाळ) व रोहित अंकुश मंडले(वय 20,रा.खरशिंग,ता. कवठेमंकाळ) यांचा समावेश असून त्यांच्याकडून तीन पिस्तुलासह जिवंत काडतुसे असा एकूण दिड लाख(1,50,000) रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
उमदी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरिक्षक भगवान शिंदे यांनी 31 जानेवारीच्या सायकांळी साडेसात वाजेच्या सुमारास पेट्रोलिंगवर असताना ही कारवाई केली.याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगलीचे पोलीस अधिक्षक यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक सांगली व जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी  अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये गावठी बनावटीचे 3पिस्तूल ,त्याचे मुठठे दोन्ही बाजूस प्लास्टिकचे काळे रंगाची पट्टी असलेलेआहेत. स्टेनलेस स्टीलचे कव्हर असलेले तीन जिवंत काडतुसाचा समावेश आहे.युएसए बनावटीची पिस्तुल असल्याचा उल्लेख आहे.ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे, उपनिरीक्षक नामदेव दाडंगे, उपनिरीक्षक प्रवीण संपागे, पोलिस हवालदार बामणे, पोलिस हवालदार शिवाजी दिघे, पोलिस नाईक सचिन आटपाडकर, पोलिस नाईक अर्जुन सगर, नितीन पलुस्कर यांनी संयुक्तपणे केली. अधिक तपास सचिन आटपाडकर करत आहेत.