हभप महादेव बाबा बडनेरकर यांचे निधन

0
11

अमरावती,दि.01ःःविदर्भातील प्रसिद्ध किर्तनकार किर्तनभूषण हभप महादेवबाबा बडनेरकर यांचे आज सायंकाळी ६ वाजता दिर्घ आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. महादेवबाबा यांची अंत्य यात्रा उद्या शनिवारी सकाळी ११ वाजता जुनीवस्ती बडनेरा ब्रह्मणपूरा येथील निवासस्थानाहून निघणार आहे.
गाडगेबाबा यांचे कार्य आणि विचारांनी प्रेरित होवून शालेय जीवनातच वयाच्या नवव्यि वर्षापासून महादेवबाबांनी किर्तनसेवेला सुरुवात केली. अमरावती जिल्ह्यासह विदर्भाच्या कानाकोप-यात आणि महाराष्ट्रातही अनेक किर्तने झालीत. त्यांच्या किर्तनाची शैली हुबेहुब गाडगेबाबांप्रमाणे असल्याने सर्वदूर ते किर्तनकार म्हणून लोकप्रिय होते. समाजातील अनिष्ठ रुढी-प्रथा, अंधश्रद्धा यावर ते किर्तनातून प्रहार करायचे. स्वतः गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, लहरीबाबा, लहानूजी महाराजांसारख्या संतांनी समोर बसून महादेवबाबांची किर्तने ऐकली आहेत. तिर्थक्षेत्र कोंडेश्वर मंदिराच्या जिर्णोद्धाराला प्रारंभ करण्याचे खरे श्रेय महादेवबाबांना जाते.महादेवबाबा बडनेरकर यांच्या निधनाने बडनेरा शहरात शोककळा पसरली आहे. माजी प्राचार्य मधुकर बडनेरकर यांचे ते वडिलबंधू होते. त्यांच्या पश्चात २ मुले, १ मुलगी, सूना, जावाई, पुतण्या, नातू व आप्त परिवार आहे.