छत्रपती विद्यालयाचे तीन दिवसीय स्नेहसंमेलन थाटात

0
20
आमगाव,दि.01ः- तालुक्यातील सितेपार येथील छत्रपती विद्यालयात २५ ते २७ जानेवारीपर्यंत शालेय वार्षिक स्नेहसंमेलन थाटात पार पडले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन उपसभापती जयप्रकाश शिवणकर यांनी केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प.स.सदस्य ओमप्रकाश मटाले हे होते.
तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान पालक मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. याशिवाय दहावीच्या परीक्षेत सन २०१८ मध्ये विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी उमेंद्र पारधी, वैष्णवी राणे, अविनाश कावळे यांचा माजी जि.प.सभापती पी.जी.कटरे,उपजिल्हाधिकारी राहुल खांडेभराड, यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. तसेच २६ जानेवारी रोजी सितेपार ग्राम पंचायतीचे सरपंच गोपाल मेश्राम यांच्या हस्ते गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून वैयाक्तीक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. शालेय वार्षिक स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक एम.एस.पटले, ओ.एम.बोपचे, जे.डी.कटरे,कु.बी.एस.मेश्राम, एस.एम.सुर्यवंशी,एल.सी.नागपुरे, हिरा मरकाम, व्ही.आर.बिसेन यांच्यासह विद्याथ्र्यांनी सहकार्य केले.