शिक्षक संघातर्फे ३३ शिक्षकांचा सत्कार

0
18

गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका गोंदिया, लायंस संजीवनीतर्फे बुधवारी कटंगी गोंदिया येथे तालुक्यातील ३३ शिक्षकांना उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. १९ शिक्षकांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे ह्रोत्या. त्या म्हणाल्या, माझ्या गुरुजीमुळेच मला ज्ञान प्राप्त झाले. गुरुजी शिवाय जगात कुणीही मोठे नाही असे म्हणाल्या. सत्कारकर्ते जि.प. उपाध्यक्षा रचनाताई गहाणे म्हणाल्या भारतीय संस्कृतीचे जडण घडण प्राथमिक शिक्षणामधूनच घडत असते. उद्घाटक पी.जी. कटरे सभापती शिक्षण व आरोग्य जि.प. गोंदिया यांनी सांगितले शिक्षणामुळेच समाजाची व देशाची प्रगती होते. विशेष बाल कल्याण सभापती विमल नागपुरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती छाया दसरे, पं.स. सभापती स्नेहा गौतम, आत्माराम दसरे, गटशिक्षणाधिकारी अशोक बरईकर, जिल्हाध्यक्ष विरेंद्र कटरे, नूतन बांगरे, शाखाध्यक्ष नागसेन भालेराव, एस.यू. वंजारी, नानन बिसेन, उमाशंकर पारधी, बी.बी. ठाकरे, यशवंत भगत, अजय चौरे, केदार गोटेफोडे उपस्थित होते.
याप्रसंगी गोंदिया तालुक्यातील विविध क्षेत्रात सामाजिक कार्यकरणार्‍या शिक्षकांचा उत्कृष्ठ शिक्षक म्हणून प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष , संचालन सरचिटणीस गणेश चुटे, यशोधरा सोनेवाने यांनी तर आभार विनोद लिचडे यांनी मानले.
यशस्वीतेसाठी नरेंद्र डहाके, विनोद लिचडे, जे.एस. ठुले, मोरेश बडवाईक, सचिन वडीचार, करुणा मानकर, पी.आर. घारपिंडे, के.एल. कावळे, डी.एस.कोल्हे, सी.एस. सूर्यवंशी, मनीष राठोड, राजेश मोहनकर, माणिक घाटघुमर, जे.एस. ठुले, यू.एन. उपवंशी, शैलेश गौतम, मनीष राठोड, राजेश मोहनकर, के.आर. मानकर, नरेंद्र कटरे, एस.एम. रहांगडाले, एस.एम. बिसेन, आनंद मेश्राम, कृष्णा कापसे, सी.एस. कोसरकर, ओ.आय. रहांगडाले, दुर्गेश रहांगडाले, नरेंद्र आगाशे, दिलीप हरिणखेडे, शिवचंद शरणागत, सुनील सोनेवाने, कैलास डुंबरे, किशोर रहांगडाले, लखनलाल लिल्हारणे, हेमंत पटले, अरुण राहुलकर, सचिन वडीचार, के.एल. कावळे, श्याम बिसेन, हर्ष पोवार, तुलशी कटरे, विलास धकाते, वाय.बी.चावके, डी.एम. दखने, मोहन शहारे, राजेश निबार्ते, आर.एन. घारपिंडे, एम.डी. फड, मानसिंह परिहार, सुनील पाटील, संदीप सोमवंशी, लिकेश हिरापुरे, मोरेश हरिणखेडे, के.एन. जनबंधू, के.के. पटले, अरुण राहुलकर, चंदु दुर्गे यांनी सहकार्य केले.