शिक्षक परिषदेच्या शहर अध्यक्षपदी राजेंद्रसिंह तोमर

0
12

गोंदिया दि.२६: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शहर कार्यकारीणीची निवडणूक पार पडली असून परिषदेच्या शहर अध्यक्षपदी राजेंद्रसिंह तोमर यांची निवड करण्यात आली आहे.
उर्वरीत कार्यकारिणीत, कार्यवाहपदी भोजराज मेंढे, उपाध्यक्ष माधन चचाणे, हरिष खत्री, सहकार्यवाह प्रशांत वासनिक, झनकलाल रहांगडाले, कोषाध्यक्ष खेमचंद हनवते, संघटनमंत्री मंगेश पटले, कार्यालय मंत्री नरेश खांडवाये, महिला आघाडी प्रमुख अनिता तुरकर, प्रवक्ता प्रेमचंद सेवईवार, शिक्षक संदेश प्रमुख संजय शिवरकर, प्रसिद्धीप्रमुख कालीदास सूर्यवंशी, संघटनमंत्री यादवराव बोरकर, महिला आघाडी सहप्रमुख हर्षीला वैद्य, सदस्य निरज नागपुरे, शालिनी परशुरामकर, नमिता बघेले, कार्याध्यक्ष प्रमोद बिसेन, भुवन बिसेन यांची अविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी गुणेश्‍वर फुंडे यांनी कार्य पार पाडले. नवनिर्वाचित कार्यकारीणीचा शिक्षक मतदार संघाचे आ. ना.गो. गाणार यांनी सत्कार केला.