प्रोगेसिव्ह शाळेत राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात

0
11

गोंदिया,दि.३-येथील श्रीमती उमादेवी बहुउद्देशिय शिक्षण संस्थेद्वारे संचालित प्रोग्रेसिव्ह शाळेत लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४० वीं जयंती साजरी करण्यात आली. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ३१ ऑक्टोबरला ङ्कराष्ट्रीय एकता दिवसङ्करूपात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष पंकज कटकवार यांनी भारताला जगावर आपली महती टिकवुन ठेवायची असेल तर देशातील प्रत्येक नागरिकांनी लोहपुरूषांनी सांगितलेल्या मार्गाला स्विकारले पाहिजे, ही २१ व्या शतकाची गरज आहे. त्याचप्रमाणे संस्था सचिव निरज कटकवार यांनी आप-आपसातील मतभेद दूर सारून तसेच लहान मोठा हा अंतर विसरून सर्वांनी एकोप्याची भावना अंगीकारली तरच देशाचा विकास साध्य करता येईल. विद्याथ्र्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर पेटींग स्पर्धा, सुविचार स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.तसेच विद्याथ्र्यांसाठी वतृत्व स्पर्धा, पोस्टर पेटींग स्पर्धा, सुविचार स्पर्धा आयोजित करण्यात आली. तसेच देशहितासाठी व देशाच्या रक्षणासाठी प्रत्येक विद्यार्थी सदैव तत्पर राहील या आशयाचे शपथ विधी कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाला यशस्वी बनविण्यासाठी प्राचार्य ओ.टी. राहांगडाले, कुमुदिनी तावाडे, आशा राव, वीणा कावडे, निधी व्यास, अभय गुरव, क्रिष्णा चव्हाण, विलास नागदेवे, असि पसिने, वर्षा सतदेवे, प्रमोद वाडी, सुषमा वर्षिकर, महेन्द्र हरिणखेडे, दुर्गा रामटेक्कर, नगमा शाहा, रूपकला राहांगडाले, तुमेश पारधी आदिंनी सहकार्य केले.