देवरी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्या

0
6

देवरी- स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन उद्या (ता.२६) पासून करण्यात आले आहे. या विज्ञानप्रदर्शनाचे उद्घाटन देवरी पंचायत समितीच्या उपसभापती संगीता भेलावे यांचे अध्यक्षतेखाली सभापती यावे देवकी मरई यांचे हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, उषा शहारे, सरिता रहांगडाले, हमीद अली, माधुरी कुंभरे गटविकास अधिकारी मेश्राम, सहायक गटविकास अधिकारी एस एन पांडे, आर एस येटरे, डी बी दिघोरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विजेत्यांना कल्पवृक्ष शिक्षण संस्थेचे संस्थापक निर्मल अग्रवाल यांचे हस्ते शुक्रवारला (ता.२७) पारितोषिक प्रदान करण्यात येतील. यावेळी मनोहरभाई विद्यालयाचे के.सी. शहारे, छत्रपती विद्यालयाचे मनोज भुरे, कु. रजिया बेग, आर. एस गायधने आधी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या विज्ञान प्रदर्शनाला जास्तीत जास्त संख्येने भेट देण्याचे आवाहन देवरीचे गटशिक्षणाधिकारी किशोर भांडारकर यांनी केले आहे.