शिक्षक समितीच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप

0
13

सडक अर्जुनी:–महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सडक अर्जुनी च्या वतीने स्थानिक तेजस्विनी लॉन येथे शैक्षणिक किट वाटप व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले दत्तक योजना व नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती ,नगरपंचायत पदाधिकारी यांचा सत्कार व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संघटनेच्या वतीने राबविण्यात आलेल्या काव्यलेखन व गितगायन स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा मोरगाव अर्जुनीचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते सडक अर्जुनीचे तहसीलदार किशोर बागडे यांच्या प्रमुख उपस्थित पी एन बडोले माजी तालुकाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

यावेळी प्रमुख्याने कवीता रंगारी , डॉ.भूमेश्वर पटले, सुधा रहांगडाले , चंद्रकला डोंगरवार , निशा जनबंधू , तेजराम मडावी नगराध्यक्ष, वंदना किशोर डोंगरवार उपनगराध्यक्ष , शालिंदर कापगते , डॉ , रूकीराम वाढई , चेतन वडगाये , शिवाजी गहाणे , अल्लाउद्दीन राजानी , निशा काशिवार , संगीता खोबरागडे , वर्षा शहारे , सपना नाईक , शुभाष बागडे गटशिक्षणाधिकारी , संदिप मेश्राम , संदीप तिडके , एन बि बिसेन , रमेश गहाने नरेश मेश्राम , जयंत रंगारी, दिक्षा फुलझेले , बी के चांदेकर , कैलाश हांडगे , जी एम बैस ,उमेश रहांगडाले , डी डी बिसेण , बी एस केसाळे उपस्थित होते

शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार यांनी प्रास्ताविकातून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा गोंदिया च्या वतीने जिल्ह्यातील 2800 गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून सडक अर्जुनी तालुक्यात त्याचा शेवट होत असुन सामाजिक बांधिलकी जपणारी संघटना म्हणून नावारूपास आहे .
आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी शैक्षणिक किट वाटप हे सामाजिक कार्य असून याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या जीवनात शैक्षणिक प्रेरणा ठरेल , सोबतच शिक्षक समितीच्या माध्यमातून अनेक प्रलंबित शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले .
संघटनेच्यावतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य भूमेश्वर पटले, कविताताई रंगारी, सुधा रहांगडाले , चंद्रकला डोंगरवार , निशा जनबंधू , तेजराम मडावी नगराध्यक्ष , वंदना किशोर डोंगरवार उपनगराध्यक्ष , शालीनदर कापगते , डॉ. रुकीराम वाढई , चेतन वडगाये , शिवाजी गहाणे ,अल्लाउद्दीन राजानी , निशा काशिवार , संगीता खोबरागडे ,वर्षा शहारे , सपना नाईक या पंचायत समिती सदस्यांचा शाल श्रीफळ व स्मृतचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.सत्कार प्रसंगी कविता रंगारी , तेजरांम मडावी , चंद्रकला डोंगरवार , डॉ वाढई , शालिंदर कापगते , अल्लाउद्दिन राजानी यांनी मनोगत व्यक्त करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्याची व संघटनेची स्तुती केली.कार्यक्रमाचे संचालन जी.आर. गायकवाड तर आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष प्रदीप बडोले यांनी केले.