गोंडवाना विद्यापीठाचा पदवीदान समारंभ गुरुवारला

0
11

गडचिरोली, ता.२२: येथील गोंडवाना विद्यापीठाचा तिसरा पदवीदान समारंभ २५ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या आवारात आयोजित करण्यात आल्याची माहिती कुलगुरु डॉ.एन.व्ही.कल्याणकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विनायक इरपाते उपस्थित होते. कुलगुरु डॉ.कल्याणकर यांनी सांगितले की, यंदाचा पदवीदान समारंभ कुलपती व महामहीम राज्यपाल विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत. या समारंभात २०५ विद्यार्थ्यांना पदवी बहाल करण्यात येणार असून, सुमारे ५४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे., ता.२२: येथील गोंडवाना विद्यापीठाचा तिसरा पदवीदान समारंभ २५ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या आवारात आयोजित करण्यात आल्याची माहिती कुलगुरु डॉ.एन.व्ही.कल्याणकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विनायक इरपाते उपस्थित होते. कुलगुरु डॉ.कल्याणकर यांनी सांगितले की, यंदाचा पदवीदान समारंभ कुलपती व महामहीम राज्यपाल विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत. या समारंभात २०५ विद्यार्थ्यांना पदवी बहाल करण्यात येणार असून, सुमारे ५४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.