दिव्यांग सप्ताहात घेतलेल्या विविध स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान

0
17

.- समग्र शिक्षा चा उपक्रम.

गोंदिया,दि.14ः-  3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये दिनांक 3 ते 9 डिसेंबर या कालावधी मध्ये समान संधी सप्ताह साजरा करण्यात आला. या मध्ये समग्र शिक्षा च्या दिव्यांग विभागामार्फत इयत्ता निहाय तीन टप्प्यात स्पर्धा घेण्यात आल्या. इयत्ता पहिली ते पाचवी साठी चित्रकला, इयत्ता सहावी ते आठवी साठी वक्तृत्व स्पर्धा तर इयत्ता नववी ते बारावी साठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. या तीनही स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थांना काल 13 रोजी पार पडलेल्या दिव्यांग मुलींच्या प्रबोधन कार्यशाळेत प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  शितल पुंड, विशेष समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त  विनोद मोहतूरे, डायटचे प्राचार्य नरेश वैद्य, शिक्षणाधिकारी कादर शेख व डॉ महेंद्र गजभिये, जलसंपदा विभागाच्या सहाय्यक अभियंता  शिखा पिपलेवार यांचे सह प्रबोधनसाठी बाल कल्याण समिती अध्यक्ष श्रीमती डी बी खोब्रागडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्नेहा लांडे व वैद्यकीय अधिकारी डॉ राणा खान या मान्यवरांच्या हस्ते प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
पहिल्या गटात प्रथम श्रुती संतोष मेश्राम इयत्ता तिसरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रिसामा, आमगाव द्वितीय अनुराग निलेश्वर मोटघरे इयत्ता चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकरीटोला, तालुका, सालेकसा. तृतीय श्रेयस सुभाष डोंगरे इयत्ता तिसरी,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा फत्तेपुर, तालुका गोदिया.
दुसऱ्या गटात प्रथम आयुष संजय बघेल वर्ग सातवा शारदा इंटरनॅशनल शाळा नागरा, द्वितीय अथर्व रुपेश मेंढे ,वर्ग सातवा , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पदमपुर, तालुका आमगाव आणि तृतीय कुमारी प्रणाली मनोज शिंदे,वर्ग सातवा महाविद्यालय सौंदड तालुका सडक/अर्जुनी. तर तिसऱ्या गटात इयत्ता नववी ते बारावी साठी घेतलेल्या निबंध स्पर्धेत श्रीमती बी ए डी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नवेगाव बांध येथील कुमारी प्राची पुरुषोत्तम आगाशे इयत्ता बारावी तिने प्रथम क्रमांक पटकावला तर गोंदिया शहरातील महावीर मारवाडी जुनियर कॉलेजची अक्षता धनेश बोपचे इयत्ता अकरावी ने द्वितीय आणि जिल्हा परिषद हायस्कूल व जुनियर कॉलेज नवेगाव बांध ची गायत्री राधेश्याम कावरे हिने तृतीय क्रमांक पटकावला. सर्व मुलांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी त्यांचे सोबत वर्ग शिक्षक व रिसोर्स टीचर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु कुलदिपिका बोरकर, जिल्हा समन्वयक, प्रास्ताविक जिल्हा समन्वयक विजय ठोकणे यांनी तर आभारप्रदर्शन प्रदर्शन श्रीमती सविता बेदरकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समग्र शिक्षा, समाज कल्याण विभाग व नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द ब्लाइंड संस्था गोंदिया च्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.