सिद्धार्थ कनिष्ट महाविद्यालयात निरोप समारंभाचे आयोजन

0
13

देवरी,दि.१८- तालुक्यातील डवकी येथील सिद्धार्थ कनिष्ट महाविद्यालय येथे इयत्ता १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी गेल्या गुरूवारी (दि.१६) निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पा. महेंद्र मेश्राम हे होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलिस निरीक्षक आनंद घाडगे, देवरीच्या महिला महाविद्यालयाचे संचालक  चरण उंदीरवाडे, देवरी येथील हास्यकवी पवन अग्रवाल, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल कळंबकर, सहायक शिक्षक जागेश्वर ठवरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांना विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना भविष्यात सामोरे जाण्यासाठी काय करावे, या विषयी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना सल्ला देत त्यांना भविष्यातील उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी योगेंद्र बोरकर, सुषमा जवंजार,ममता टेंभूर्णीकर, सरीता मेश्राम, धर्मेंद्र भोवते, हिना बडगे, या शिक्षकांसह प्रेरणा लांजेवार,दिव्या भुरकुडे,विंकल घासले,हर्षाली कुरसुंगे,अश्विन परिहार या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन हीना बडगे यांनी केले. उपस्थितांचे आभार श्री बोरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.