एक्यूट पब्लिक शाळेत उत्साहात साजरा

0
10

गोंदिया,दि.10 जागतिक महिला दिवसानिमित्त दि.०९ गुरूवारला एक्यूट पब्लिक शाळेत क्रांतिज्योति सावित्री बाई फुले, सरस्वती माता, सामाजिक कार्यकर्ता मदर टेरेसा यांचा प्रतिमेला माल्यार्पण करण्यात करुन महिला दिवस साजरा करण्यात आला.याप्रसंगी शाळेतील शिक्षकांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले,यात नृत्य,गाणी, भाषणातून स्त्रीजिवनाचे महत्त्व सांगत मनोगत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ‘संज्योत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या’ सह सचिव श्रीमती शुभा शहारे उपस्थित होत्या. त्यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व स्त्री विषयी आपले मानोगत व्यक्त केले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उज्वला,अध्यापिका श्रीमती एकता, शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.