मॉडेल कॉन्वेंट एण्ड सायन्स ज्यू. कॉलेजच्या प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार

0
22

गोरेगांव :- स्थानीय मॉडेल कॉन्वेंट एण्ड सायन्स ज्यू. कॉलेज गोरेगावच्या इयत्ता 10 वी च्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या व गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला. यामध्ये कु. तनवी डी कावळे हिने 90.60 % गुण घेत शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. कु वैशाली ज. बोपचे ही 90.00 % घेत दुसरी तर रॉकी डी चौधरी हा 88.00% घेत शाळेतून तिसरा आलेला आहे. शाळेचे संस्थापक प्रा.आर. डी. कटरे, प्रशासकीय अधिकारी सी.बी.पटले, प्राचार्य सौ सी. पी.मेश्राम, पर्यवेक्षक कु.एस. डी. चीचामे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेचे संस्थापक, प्रशासकीय अधिकारी, प्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व शिक्षकवृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच आपल्या आई वडिलांना दिले.