पदोन्नतीऐवजी पदस्थापना : शिक्षकांत नाराजी; ज्येष्ठांना डावलले

0
6

गोंदिया- : जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदलीचा गुंता सुटता सुटेना अशी अवस्था झाली. जिल्ह्यात विषयतज्ज्ञ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्या शिक्षकांधून पदोन्नतीने भरण्याची तरतूद आहे. परंतु, गोंदिया जिल्हा परिषदेने विषय शिक्षक म्हणून शिक्षकांची पदस्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यातही सेवाज्येष्ठता नोकरीची ग्राह्य धरण्यात आली नाही. आज, सोवारी ४९७ शिक्षकांची कार्यशाळा पार पडली. ही बाब शिक्षकांकरिता अन्यायकारक असल्याचे शिक्षकांचे म्हणणे असून प्रसंगी न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आला.
जिल्हा परिषद नवनवीन उपक्र राबवित आहे. राज्य शासनाने देखील दिवसेंदिवस बंद पडत असलेल्या सरकारी शाळांना पुन्हा भरभराटी यावी, याकरिता विविध क्लृप्त्या शोधून काढल्या. त्याची अ‘लबजावणी देखील सुरू आहे. मात्र, ज्या शिक्षकांच्या भरवशावर हे सर्व करायचे आहे, त्यांच्यावरच अन्याय होत असल्याची बाब प्रकर्षाने पुढे आली. ३० सप्टेंबर रोजी शाळांची पटपडताळणी करण्यात येते. त्यानुसार पटनिर्धारण आणि संच‘ान्यता होते. परंतु, जिल्ह्यात ज्ञानरचनावाद कार्यक्रमात शिक्षण विभाग गुंतल्याळे यावर्षी शिक्षकांचे पटनिर्धारण झाले नाही. परिणा शिक्षकांचे समायोजन रखडले. त्याचा परिणा बदल्यांवर झाला. जिल्ह्यात पदवीधर शिक्षकांच्या गणीत आणि विज्ञान विषयाच्या ४१० आणि भाषा व स‘ाजशास्त्र विषयाच्या ८१ जागा रिक्त आहेत. त्या जागा शिक्षकांधून पदोन्नतीने भरण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली. परंतु, शिक्षण विभागाने आज, सो‘वारी घेतलेल्या ४९७ शिक्षकांच्या कार्यशाळेत शिक्षकांची विषय शिक्षक या नावाने पदस्थापना करण्यात येणार आहे.

या संवर्गात शिक्षकांचे नाव विषय शिक्षक असे होणार असून वेतन मात्र, शिक्षकाचेच राहणार आहे. त्याचबरोबर विषय शिक्षक म्हणून ने‘णूक करताना शिक्षकांची सेवाज्येष्ठता लक्षात न घेता पदवी ‘िमाळाल्याची तारीख ग्राह्य धरण्याचा अङ्कलातून प्रयोग शिक्षण विभागाने केला. ज्याअर्थी विषयतज्ज्ञांची पदे रिक्त असताना आणि शिक्षक पदोन्नतीकरिता पात्र असताना ती पदे का भरण्यात आली नाही. नोकरीची सेवाज्येष्ठता का धरण्यात आली नाही. शिक्षकांची ङ्कसवणूक करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप शिक्षक संघटना करत आहेत. या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे देखील शिक्षकांनी सांगीतले.